(SSC Constable Bharti 2025) स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत जनरल ड्युटी कॉन्स्टेबल पदासाठी २५,४८७ जागांवर भरती

भारत सरकारच्या अंतर्गत असणाऱ्या स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत विविध फोर्स मध्ये जनरल ड्युटी कॉन्स्टेबल पदासाठी २५४८७ जागांवर मेगा भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.SSC Constable Bharti 2025 साठी इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून ०१/१२/२०२५ ते ३१/१२/२०२५ या दरम्यान जमा करायचे आहेत. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

SSC Constable Bharti 2025

जाहिरात क्र

रिक्त पदांचा तपशील (SSC Constable Bharti 2025)

पदाचे नाव – कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी)

अ. क्रपदाचे नावपदसंख्या
०१ बॉर्डर सिक्युरिटी फोर्स (BSF)६१६
०२सेंट्रल इंडस्ट्रीयल सिक्युरिटी फोर्स (CISF)१४५९५
०३सेंट्रल रिझर्व्ह पोलिस फोर्स (CRPF)५४९०
०४सशस्त्र सीमा बल (SSB)१७६४
०५इंडो तिबेटियन बॉर्डर पोलिस (ITBP )१२९३
०६आसाम रायफल्स (AR)१७०६
०७सेक्रेटेरिएट सिक्युरिटी फोर्स (SSF)२३
एकूण.२५४८७

शैक्षणिक अर्हता (SSC Constable Bharti 2025)

  • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून इयत्ता १० वी परीक्षा उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा

  • ०१/०१/२०२६ रोजी उमेदवाराचे किमान वय १८ वर्ष आणि कमाल वय २३ वर्ष असावे.
  • अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ५ वर्ष शिथिलता राहील.
  • इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ३ वर्ष शिथिलता राहील.
  • १९८४ च्या दंगलीत मारल्या गेलेल्यांचे पाल्य – खुल्या /आर्थिक दुर्बल घटक उमेदवारांना कमाल वयात ५ वर्ष ,इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ८ वर्ष , अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात १० वर्ष शिथिलता.

वेतन श्रेणी

उमेदवारांना नोकरीत रुजू झाल्यानंतर ₹२१,७००/- ते ₹६९,१००/- प्रति महिना वेतन अदा केले जाईल.

अर्ज कसा करावा

  • इच्छुक पात्र उमेदवारांनी SSC Constable Bharti 2025 साठी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून ०१/१२/२०२५ ते ३१/१२/२०२५ या दरम्यान जमा करायचे आहेत.
  • अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.
  • अर्ज करण्यासाठीच्या स्टेप्स
    • रजिस्ट्रेशन- उमेदवारांनी प्रथम स्वतःला अधिकृत संकेतस्थळावर रजिस्टर करून घ्यावे.
    • अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरावी.
    • आवश्यक ती सर्व माहिती अचूक भरावी.
    • अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करून घ्यावी.

अर्ज शुल्क

  • इच्छुक पात्र उमेदवारांनी SSC Constable Bharti 2025 साठी ₹१००/- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करावे.
  • अजा/अज/माजी सैनिक/महिला उमेदवारांना अर्ज शुल्क माफ राहील.
  • अर्ज शुल्क हे ना परतावा असून एकदा भरलेले अर्ज शुल्क कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.
  • अर्ज शुल्क हे उमेदवारांनी BHIM UPI/नेट बँकिंग /व्हिसा, मास्टर,Maestro, रूपे डेबिट कार्ड यांच्या साहाय्याने ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
  • अर्ज शुल्क हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज शुल्क स्वीकारले जाणार नाही.

निवड प्रक्रिया

  • SSC Constable Bharti 2025 साठी उमेदवारांची निवड ही पुढे नमूद केलेल्या परीक्षांच्या आधारे केली जाईल,
    • Computer Based Examination –
      • General Intelligence and Reasoning- 20 प्रश्न,40 गुण
      • General Knowledge and General Awareness -20 प्रश्न,40 गुण
      • Elementary Mathematics – 20 प्रश्न,40गुण
      • English /Hindi -20 प्रश्न,40 गुण
      • एकूण – 80 प्रश्न,160 गुण ,वेळ – 60 मिनिटे
      • प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.25 नकारात्मक गुण असेल.
    • Physical Efficiency Test
      • Race
        • लडाख वगळता इतर राज्य Race – पुरुष – 5 किमी 24 मिनिटे, महिला 1.6 किमी साडे आठ मिनिटे
        • लडाख मधील उमेदवार – पुरुष -1.6 किमी 7 मिनिटे ,महिला – 800 मीटर 5 मिनिटे
    • Physical Standard Test
      • उंची
        • पुरुष -170 cms
        • महिला – 157 cms
      • छाती
        • Un-Expanded- 80 cms
        • Minimum Expansion – 5 cms
    • वैद्यकीय चाचणी
    • कागदपत्र पडताळणी

कागदपत्र

  • सर्व शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र आणि गुणपत्र
  • जन्म तारखेचा पुरावा
  • जात प्रमाणपत्र
  • माजी सैनिक असल्याचा पुरावा
  • फोटो आणि सही
  • ओळखपत्र

महत्वाच्या सूचना

  • रजिस्टर करताना दिलेले ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
  • जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे /वाढवणे तसेच भरतीप्रक्रिया रद्द करणे/पुढे ढकलणे/स्थगित करणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
  • उमेदवारांनी SSC Constable Bharti 2025 साठी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा
  • चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्धवट भरलेला अर्ज किंवा अर्ज शुल्क न भरलेले अर्ज रद्द करण्यात येतील.
  • भरती करण्याबाबत कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.

महत्वाच्या तारखा

अर्ज करण्यासाठी सुरुवातीची तारीख – 01/12/2025

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख -31/12/2025

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

जाहीरातीसाठी – इथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा

नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा

व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा


Articles

Indian Oil Coprporation Limited मध्ये अप्रेंटीस पदासाठी २७५६ जागांवर भरती

महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकारी पदासाठी १४४० जागांवर भरती

बृहन्मुंबई महानगरपालीके अंतर्गत सार्वजनिक आरोग्य खात्यात विविध पदांसाठी भरती

Steel Authority of India मध्ये मॅनेजमेंट ट्रेनी पदासाठी १२४ जागांवर भरती

मंत्रिमंडळ सचिवालयामध्ये डेप्युटी फील्ड ऑफिसर पदासाठी २५० जागांवर भरती

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top