महाराष्ट्र राज्यात लाखोंच्या संख्येने ज्येष्ठ नागरिक आहेत. या ज्येष्ठ नागरिकांनी शेती,मजुरी ,छोटे व्यवसाय केलेले आहेत. वयाच्या वाढीनुसार अश्या ज्येष्ठ नागरिकांना उत्पन्नाची साधने कमी होतात ,शरीराची ताकद कमी होते तसेच बर्याच ज्येष्ठ नागरिकांना मुलांकडून आधार मिळत नाही. ज्येष्ठ नागरिकांच्या याच समस्यांचे निवारण करण्यासाठी तसेच त्यांच्या आर्थिक सुरक्षेसाठी महाराष्ट्र सरकारने Shravan Bal Seva Rajya Nivrutti Dhan Yojana या योजनेची सुरुवात केली आहे.
या योजने अंतर्गत राज्य सरकार ६५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल ज्येष्ठ नागरिकांना प्रती महिना पेन्शन देते. या वयात काम करण्याची क्षमता कमी होते ,वैद्यकीय खर्च वाढतो,गरजा भागवणे कठीण होते या समस्यांच्या निवारणासाठी हि योजना उपयुक्त किंवा मदतीची ठरू शकते.
या लेखात आपण या योजनेची सविस्तर माहिती अट,लाभ ,अर्ज कसा करावा,कागदपत्र काय लागतील,पात्रता काय असेल पाहणार आहोत.

Table of Contents
Shravan Bal Seva Rajya Nivrutti Dhan Yojana काय आहे?
महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागाच्या अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक आधार देण्यासाठी सुरु केलेली ही एक योजना आहे. या योजनेस पात्र असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना दरमहा रु १५००/- पेन्शन च्या स्वरुपात दिले जातात.
योजनेची आवश्यकता काय ?
- ही योजना ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक आधार प्राप्त करते.
- ज्येष्ठ नागरिकांना वैद्यकीय खर्चासाठी लागणारी गरज भागवण्यास मदत करते.
- ग्रामीण भागातील तसेच ज्यांना वृधत्वाच्या काळात पैशाची गरज असेल त्यांना विशेष उपयुक्त आहे.
- ज्येष्ठ नागरिकांचे जीवनमान सुधारण्यास मदत होते.
Shravan Bal Seva Rajya Nivrutti Dhan Yojana साठीची पात्रता
- अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे ६५ वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असावे.
- अर्जदार हा किमान १५ वर्ष महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
- अर्जदार हा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक किंवा BPL श्रेणीतील असावा. (अर्ज्दारचे वार्षिक उत्पन्न हे रु २१,०००/- पेक्षा कमी असावे.
- अर्जदार हा इतर कोणत्याही सरकारी पेन्शन योजनेचा लाभ घेत नसावा.
- स्थिर उत्पन्न नसलेल्या ज्येष्ठ नागरिकास प्राधान्य.
अर्ज करण्यासाठी सदर करायची कागदपत्र
Shravan Bal Seva Rajya Nivrutti Dhan Yojana साठी लागणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे,
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- वयाचा पुरावा
- रहिवाशी पुरावा (पत्ता )
- उत्पन्नाचे प्रमाणपत्र
- BPL कार्ड असल्यास
- बँक पासबुक
- फोटो
- अर्ज
पेन्शन किती मिळते?
- या योजने अंतर्गत पात्र ज्येष्ठ नागरिकांना रु १५००/- प्रती महिना पेन्शन थेट बँक खात्यात (DBT) जमा केले जातील.
अर्ज कसा करावा?
ऑफलाईन पद्धत
- प्रथम जवळच्या ग्रामपंचायत /तलाठी कार्यालय /तहसील कार्यालय/सिव्हील सेवा केंद्र (CSC Centre) ला भेट द्या .
- श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती योजनेचा अर्ज घ्या.
- अर्जातील सर्व माहिती अचूक भरून आवश्यक त्या कागदपत्र जोडा.
- योग्य त्या अधिकाऱ्याकडे हे अर्ज जमा करावे.
- अर्ज आणि कागदपत्रांच्या पडताळणी नंतर अर्ज दाराची पेन्शन मंजूर होईल.
ऑनलाईन पद्धत
- Shravan Bal Seva Rajya Nivrutti Yojana इच्छुक उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन रजिस्टर करून घ्यावे.
- लॉग इन करून Shravan Bal Seva Nivrutt Yojana चा अर्ज निवडून त्यावर क्लिक करावे.
- अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरून घ्यावी.
- आवश्यक ती सर्व कागदपत्रे अपलोड करून घ्यावी.
- अर्ज सबमिट करावा.

पेन्शन सुरु होण्याचा कालावधी
- अर्ज केल्यानंतर पात्र असल्यास ३० ते ४५ दिवसात अर्ज आणि कागदपत्राची पडताळणी केली जाते.
- अर्ज आणि कागदपत्र पडताळणी नंतर अर्जदार पात्र असल्यास त्याच्या बँक खात्यात (DBT) म्हणजेच थेट खात्यात पेन्शन जमा होण्यास सुरुवात होते.
Shravan Bal Seva Rajya Nivrutti Dhan Yojana फायदे काय आहेत?
- गरजू वृद्धाना आर्थिक मदत मिळते.
- वैद्यकीय खर्चाचा थोडा का असेना भर कमी होतो.
- कौटुंबिक आधार नसलेल्या वृद्धाना आर्थिक सुरक्षा मिळण्यास मदत होते.
- थेट बँक खात्यात रक्कम जमा होत असल्यामुळे पारदर्शकता राहते.
- ग्रामीण भागातील वृद्धांच्या जीवनमान सुधारण्यास मदत.
- गरजू वृद्धांचा आर्थिक ताण कमी होण्यास मदत मिळते.
योजनेत होणाऱ्या चुका ज्यावर अर्जदाराने लक्ष देणे गरजेचे आहे?
- अर्जात अर्धवट माहिती भरणे.
- अपूर्ण कागदपत्र अपलोड किंवा जमा करणे.
- बँक खात्याची चुकीची माहिती देणे.
- कागदपत्र आणि अर्जातील माहितीतील तफावत. उदा. स्पेलिंग मधील चूक ,पत्ता चुकणे ई.
- फोटो किंवा सही न करणे.

Shravan Bal Seva Rajya Nivrutti Dhan Yojana ही महाराष्ट्र राज्यातील आर्थिक दुर्बल घटक प्रवर्गातील ज्यांचे वार्षिक उत्पन्न रु २१,०००/- पेक्षा कमी असेल अश्या ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक स्थैर्य देण्यासाठी सुरु केलेली एक योजना आहे. या योजनेंतर्गत उमेदवारांना मिळणारी पेन्शन ही थेट बँक खात्यात जमा होते. त्यामुळे वृद्ध व्यक्ती हे सन्मानाने ,स्वावलंबी राहतील. जर तुमच्या ओळखीत असे कोण गरजू ज्येष्ठ नागरिक असतील तर त्यांच्याशी ही माहिती नक्की Share करा. जेणेकरून या योजनेची माहिती प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचेल आणि त्याला या योजनेचा फायदा घेता येईल.
अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा
योजनेच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून जॉईन किंवा फॉलो करा
व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा
आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा
FAQ
पेन्शन किती मिळते ?
रु १५००/- प्रती महिना
वयाची मर्यादा किती आहे?
६५ वर्षे आणि त्यापेक्षा अधिक वयाचे ज्येष्ठ नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतील.
बँक खात्यात पैसे कधी आणि कसे जमा होतात?
प्रत्येक महिन्याला थेट बँक खात्यात पैसे जमा होतात.
विधवा महिला या योजनेसाठी अर्ज करू शकतील का?
नमूद केलेल्या पात्रतेस पात्र होत असल्यास विधवा महिलाही या योजनेस अर्ज करू शकतील.
अर्ज अपात्र होण्याची करणे?
अर्धवट भरलेले अर्ज/चुकीची माहिती अर्जात देणे /आवश्यक ती कागदपत्र न जोडणे
