(SBI Specialist Officer Bharti 2025) State Bank of India मध्ये Specialist Officer पदासाठी कंत्राटी तत्वावर 996 जागांवर भरती

भारतातील सर्वात मोठ्या सरकारी बँक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये Specialist Cadre Officer पदासाठी कंत्राटी तत्वावर 996 जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.इच्छुक पात्र उमेदवारांनी SBI Specialist Officer Bharti 2025 साठी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने 02/12/2025 ते 23/12/2025 या दरम्यान जमा करायचे आहेत. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

SBI Specialist officer Bharti

जाहिरात क्र

रिक्त पदांचा तपशील (SBI Specialist Officer Bharti 2025)

अ.क्रपदाचे नावपद संख्या
01VP Wealth (SRM)506
02AVP Wealth (RM)206
03Customer Relationship Executive 284
एकूण996

शैक्षणिक अर्हता (SBI Specialist Officer Bharti 2025)

  • पद क्र 1-
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • MBA (Banking/Finance/Marketing) परीक्षा किमान 60% गुणांसह उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
    • Bank/Wealth Management Firm/AMC मध्ये Sales & Marketing मधला किमान ६ वर्ष कालावधीचा अनुभव असावा.
  • पद क्र 2
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • Finance/Marketing/Banking विषयातील पदव्युत्तर पदवी परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
    • बँक /Wealth Management Firm/AMC मध्ये Sales & Marketing क्षेत्रातील किमान ३ वर्ष कालावधीचा अनुभव असावा.
  • पद क्र ३
    • उमेदवारहा मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा (SBI Specialist Officer Bharti 2025)

01/05/2025 रोजी उमेदवाराचे वय हे खाली नमूद केल्याप्रमाणे असावे.

  • पद क्र 1- उमेदवाराचे किमान वय 26 वर्ष आणि कमाल वय42 वर्ष असावे.
  • पद क्र 2- उमेदवाराचे किमान वय 23 वर्ष आणि कमाल वय 35 वर्ष असावे.
  • पद क्र 3- उमेदवाराचे किमान वय 20 वर्ष आणि कमाल वय 35 वर्ष असावे.
  • अजा अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात 5 वर्ष शिथिलता राहील.
  • इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात 3 वर्ष शिथिलता राहील.

वेतन श्रेणी

  • पद क्र1- उमेदवारांना नोकरीत रुजू झाल्यानंतर ₹44.70 लाख प्रती वर्ष CTC वेतन अदा केले जाईल.
  • पद क्र 2- उमेदवारांना नोकरीत रुजू झाल्यानंतर ₹30.20/- लाख प्रती वर्ष CTC वेतन अदा केले जाईल.
  • पद क्र 3- उमेदवारांना नोकरीत रुजू झाल्यानंतर ₹6.20/पी लाख प्रती वर्ष CTC वेतन अदा केले जाईल.

अर्ज कसा करावा

  • इच्छुक पात्र उमेदवारांनी SBI Specialist Officer Bharti 2025 साठी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावर 02/12/2025 ते 23/12/2025 या दरम्यान जमा करायचे आहेत.
  • अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत. इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.
  • अर्ज करण्यासाठीच्या स्टेप्स
    • रजिस्ट्रेशन – उमेदवारांनी प्रथम स्वतःला अधिकृत संकेतस्थळावर रजिस्टर करून घ्यावे.
    • अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरावी.
    • आवश्यक ती सर्व कागदपत्र अपलोड करून घ्यावी.
    • अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करून घ्यावे.

अर्ज शुल्क

  • खुल्या/आर्थिक दुर्बल घटक/इतर मागासवर्गीय प्रवर्गातील SBI Specialist Officer Bharti 2025 साठी उमेदवारांनी ₹750/- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
  • अजा/अज/अपंग उमेदवारांना अर्ज शुल्क माफ राहील.
  • अर्ज शुल्क हे ना परतावा असून एकदा भरलेले अर्ज शुल्क हे कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.
  • अर्ज शुल्क हे उमेदवारांनी क्रेडिट कार्ड/ डेबिट कार्ड/इंटरनेट बँकिंग यांच्या साहाय्याने ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत. इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज शुल्क स्वीकारले जाणार नाही.

निवड प्रक्रिया

  • उमेदवारांचे अर्ज मिळाल्यानंतर वैयक्तिक/टेलिफोनिक/व्हिडिओ मुलाखतीद्वारे उमेदवारांच्या अर्जाची छाननी केली जाईल.
  • अर्ज छाननी नंतर पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. मुलाखत ही एकूण 100 गुणांची असेल.
  • उमेदवारांची निवड ही त्यांना मुलाखतीत मिळालेल्या गुणांच्या आधारे केली जाईल.

कागदपत्र(SBI Specialist Officer Bharti 2025)

  • अलिकडील काळातील फोटो
  • सही
  • Brief Resume
  • ओळखपत्र
  • पॅन कार्ड
  • अपंग असल्याचे प्रमाणपत्र
  • सर्व शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र व गुणपत्र
  • अनुभवाचे प्रमाणपत्र
  • ना हरकत प्रमाणपत्र
  • Bio Data आणि CTC format
  • Form 16 /Offer Letter/Latest Salary Slip of Current Employee

महत्वाच्या सूचना

  • उमेदवारांनी SBI Specialist Officer Bharti 2025 साठी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • रजिस्टर करताना दिलेला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
  • चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्धवट भरलेला अर्ज तसेच अर्ज शुल्क न भरलेले अर्ज रद्द करण्यात येईल.
  • जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे/वाढवणे तसेच भरतीप्रक्रिया रद्द करणे/पुढे ढकलणे/ स्थगित करणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
  • भरती करण्याबाबत कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.

महत्वाच्या तारखा

अर्ज करण्यासाठी सुरुवातीची तारीख – 02/12/2025

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख -23/12/2025

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

जाहिरातीसाठी – इथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा

नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा

व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी- इथे क्लिक करा


Articles

मंत्रिमंडळ सचिवालयामध्ये डेप्युटी फील्ड ऑफिसर पदासाठी २५० जागांवर भरती

Oriental Insurance Company Limited मध्ये AdministrativeOfficer पदासाठी ३०० जागांवर भरती

स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत जनरल ड्युटी कॉन्स्टेबल पदासाठी २५,४८७ जागांवर भरती

Indian Oil Coprporation Limited मध्ये अप्रेंटीस पदासाठी २७५६ जागांवर भरती

महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकारी पदासाठी १४४० जागांवर भरती

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top