(SAIL Operator cum Technician Bharti)Steel Authority of India (SAIL) मध्ये Operator cum Technician पदासाठी ३१४ जागांवर भरती

(SAIL Operator cum Technician Bharti) भारत सरकारची महारत्न कंपनी असलेल्या अग्रगण्य स्टील निर्माता कंपनी Steel Authority of India (SAIL) मध्ये Operator cum Technician(Trainee)-(OCTT)पदासाठी ३१४ जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने १८/०३/२०२४ पूर्वी जमा करायचे आहेत. सविस्तर माहिती खालील प्रमाणे,

SAIL Operator cum Technician Bharti

जाहिरात क्र – ०१/२०२४

रिक्त पदांचा तपशील (SAIL Operator cum Technician Bharti)

अ. क्र पदाचे नाव पद संख्या
OCTT -METALLURGY५७
OCTT- Electrical ६४
OCTT- Mechanical १००
OCTT-Instrumentation १७
OCTT-Civil२२
OCTT- Chemical १८
OCTT -Ceramic०६
OCTT -Electronics ०८
OCTT -Computer/IT (For Mines only)२०
१०OCTT- Draughtsman ०२
एकूण ३१४
SAIL Operator cum Technician Bharti

शैक्षणिक अर्हता (SAIL Operator cum Technician Bharti)

  • पद क्र १-उमेदवार हा १० वी सह सरकारी मान्यताप्राप्त ३ वर्ष कालावधीचा पूर्ण वेळ Metallurgy Engineering मधील Diploma परीक्षा उत्तीर्ण असावा.
  • पद क्र २ – उमेदवार हा १० वी सह सरकारी मान्यताप्राप्त ३ वर्ष कालावधीचा पूर्ण वेळ Electrical /Electrical & Electronics Engineering मधील Diploma परीक्षा उत्तीर्ण असावा.
  • पद क्र ३– उमेदवार हा १० वी सह सरकारी मान्यताप्राप्त ३ वर्ष कालावधीचा पूर्ण वेळ Mechanical Engineering मधील Diploma परीक्षा उत्तीर्ण असावा.
  • पद क्र ४– उमेदवार हा १० वी सह सरकारी मान्यताप्राप्त ३ वर्ष कालावधीचा पूर्ण वेळ Instrumentation/Instrumentation & Electronics/Instrumentation & Control/Instrumentation & Automation Engineering मधील Diploma परीक्षा उत्तीर्ण असावा.
  • पद क्र ५ – उमेदवार हा १० वी सह सरकारी मान्यताप्राप्त ३ वर्ष कालावधीचा पूर्ण वेळ Civil Engineering मधील Diploma परीक्षा उत्तीर्ण असावा.
  • पद क्र ६ – उमेदवार हा सरकारी मान्यताप्राप्त ३ वर्ष कालावधीचा पूर्ण वेळ Chemical Engineering मधील Diploma परीक्षा उत्तीर्ण असावा.
  • पद क्र ७– उमेदवार हा सरकारी मान्यताप्राप्त ३ वर्ष कालावधीचा पूर्ण वेळ Ceramic Engineering मधील Diploma परीक्षा उत्तीर्ण असावा.
  • पद क्र ८– उमेदवार हा सरकारी मान्यताप्राप्त ३ वर्ष कालावधीचा पूर्ण वेळ Electronics /Electrical & Electronics/Electronics & Telecommunication/Electronics & Communication/Electronics & Instrumentation Engineering मधील Diploma परीक्षा उत्तीर्ण असावा.
  • पद क्र ९– उमेदवार हा सरकारी मान्यताप्राप्त ३ वर्ष कालावधीचा पूर्ण वेळ Computer Science/Information Technology Engineering मधील Diploma परीक्षा उत्तीर्ण असावा.
  • पद क्र १०
    • उमेदवार हा १० वी सह सरकारी मान्यताप्राप्त ३ वर्ष कालावधीचा पूर्ण वेळ Diploma in Civil Engineering /Electrical Engineering/Mechanical Engineering/Architectural Assistantship परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • उमेदवारास १ वर्षाचा Draughtsman/Design Assistant पदावरील Autocad चा अनुभव असावा.
  • वरील सर्व पदांसाठी पात्रता परीक्षेत खुल्या/इतर मागासवर्गीय /आर्थिक मागास प्रवर्गातील उमेदवार किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण असावेत.
  • अजा/अज/अपंग/विभागीय उमेदवार हे किमान पात्रता परीक्षेत किमान ४०% गुणांसह उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा (SAIL Operator cum Technician Bharti)

  • वरील सर्व पदांसाठी १८/०३/२०२४ पर्यंत उमेदवाराचे किमान वय १८ वर्षे आणि कमाल वय २८ वर्षे असावे.
  • अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ५ वर्षे शिथिलता राहील.
  • इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ३ वर्षे शिथिलता राहील.
  • खुल्या आणि आर्थिक दुर्बल घटकातील अपंग उमेदवारांना कमाल वयात १० वर्षे शिथिलता राहील तसेच अजा/अज प्रवर्गातील अपंग उमेदवारांना १५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय प्रवर्गातील अपंग उमेदवारांना १३ वर्षे कमाल वयात शिथिलता राहील.
  • माजी सैनिक उमेदवारांना सरकारी नियमाप्रमाणे कमाल वयात शिथिलता राहील.

वेतन श्रेणी (SAIL Operator cum Technician Bharti)

  • वरील पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांचा पहिले २ वर्ष प्रशिक्षण कालावधी असेल.
    • पहिल्या वर्षासाठी ₹१६,१००/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
    • दुसऱ्या वर्षासाठी १८,३००/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
  • २ वर्षाचा प्रशिक्षण कालावधी यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर उमेदवारास नियमित कर्मचारी केले जाईल आणि त्यांना ₹२६,६००/- ते ₹३८,९२०/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.

अर्ज शुल्क (SAIL Recruitment)

  • (SAIL Recruitment 2024) वरील पदांसाठी अर्ज करण्यासाठी खुल्या/इतर मागासवर्गीय प्रवर्ग/आर्थिक दुर्बल घटक प्रवर्गातील उमेदवारांना रु ५००/- अर्ज शुल्क भरावा लागेल.
  • अजा/अज/अपंग/माजी सैनिक/विभागीय उमेदवारांना रु २००/- अर्ज शुल्क भरावा लागेल.
  • उमेदवार हे अर्ज शुल्क इंटरनेट बँकिंग/क्रेडीट कार्ड/डेबिट कार्ड यांच्या सहाय्याने ऑनलाईन पद्धतीने भारता येईल.
  • अर्ज शुल्क हे ना परतावा आहे.कोणत्याही कारणास्तव भरलेले अर्ज शुल्क परत मिळणार नाही.
  • अर्ज शुल्क व्यतिरिक्त इतर अधिकचे शुल्क हे उमेदवारांना भरावे लागेल.

अर्ज कसा कराल (SAIL Operator cum Technician Bharti)

  • इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून २६/०२/२०२४ ते १८/०३/२०२४ दरम्यान भरायचा आहे.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठीच्या स्टेप्स (SAIL Operator cum Technician Bharti)

  • इमेल आय डी आणि मोबाईल नंबर च्या सहाय्याने उमेदवारांनी रजिस्टर करून घ्यायचे आहे.
  • लॉग इन वर क्लिक करून New User वर क्लिक करून पहिल्यांदा one time Registration करून घेणे.
  • जर पहिल्यापासून रजिस्टर असाल तर Registered User वर क्लिक करून User ID आणि Password च्या सहाय्याने लॉग इन करून घेणे.
  • अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक आणि योग्य माहिती भरून घ्यावी.
  • नमूद केलेली कागदपत्रे अपलोड करून घ्यावी.
  • अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरून घ्यावे.
  • अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांनी त्याची प्रिंटआउट काढून घ्यावी.

निवड प्रक्रिया (SAIL Operator cum Technician Bharti)

  • पात्र उमेदवारांची Computer Based Test(CBT) हिंदी /इंग्रजी भाषेत असेल.
  • Computer Based Test(CBT) हि १०० वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नांची असेल.हि परीक्षा २ टप्प्यात होईल ज्यात ५० हे Domain Knowladge आणि ५० प्रश्न हे Aptitude Test अशी असेल. या परीक्षेचा कालावधी हा ९० मिनिटे कालावधीची असेल.
  • Computer Based Test(CBT) मधून पात्र ठरण्यासाठी या परीक्षेत खुल्या आणि आर्थिक दुर्बल घटक प्रवर्गातील उमेदवारांना किमान ५०% तसेच अजा/अज/इतर मागास प्रवर्गातील/अपंग उमेदवार यांना किमान ४०% गुण मिळवणे अनिवार्य आहे.
  • Computer Based Test(CBT) परीक्षेमध्ये किमान पात्रता गुण मिळालेल्या उमेदवारांना गुणवत्तेच्या आधारे Skill Test साठी बोलावले जाईल. Skill Test हि कंपनी च्या कोणत्याही प्लांट/कार्यालय /माइन मध्ये होईल.
  • Skill Test हि फक्त पात्रता परीक्षा असेल अंतिम निवड हि Computer Based Test(CBT) मधील गुणांच्या आधारे असेल.
  • Computer Based Test(CBT) मध्ये समान गुण असतील तर किमान पात्रता परीक्षेक अधिक गुण असणार्या उमेदवारास प्राधान्य दिले जाईल.

शारीरिक मानक (SAIL Recruitment 2024)

  • उंची – १)पुरुष उमेदवाराची किमान उंची १५५ से.मी असावी. २)महिला उमेदवारांची किमान उंची १४३ से.मी असावी.
  • वजन – १) पुरुष उमेदवाराचे किमान वजन ४५ कि.ग्रा असावे. २)महिला उमेदवाराचे किमान वजन ३५ कि. ग्रा असावे.
  • छाती -१) पुरुष उमेदवारांसाठी ७५ से.मी आणि ७९ से.मी Expansion सहित. २)महिला उमेदवारांसाठी ७० सेमी आणि ७३ से मी Expansion सहित.
  • दृष्टी –
    • १)दूरची दृष्टी – ६/१२ चष्मा न घालता
    • २)जवळची दृष्टी – J1 किंवा N6 दोन्ही डोळ्यांना. चष्म्याची शक्ती हि +/-४.०D पेक्षा जास्त नसावी.
    • ३)कलर व्हिजन -Normal Lantern Test with Maximum Aperture,रातआंधळे पणा असेल तर अपात्र ठरवले जाईल.
  • ऐकण्याची क्षमता- ऐक्स्न्याची क्षमता सामान्य असावी.

महत्वाची सूचना (SAIL Operator cum Technician Bharti)

  • (SAIL Recruitment 2024)अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • रजिस्टर करताना उमेदवारांनी नमूद केलेला इ मेल आय डी आणि मोबाइल नंबर दिला असेल तो भारती प्रक्रिया सुरु असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
  • उमेदवारांनी चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरवले जाईल.
  • CBT किंवा वैद्यकीय चाचणीस हजार राहिल्याबद्दल उमेदवारास कोणत्याही प्रकारचा भत्ता दिला जाणार नाही.
  • जे उमेदवार सरकारी/निमसरकारी /विभागीय असतील त्यांनी त्यांच्या विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र सदर करणे आवश्यक आहे.
  • निवड झालेल्या उमेदवारांना SAIL च्या भारतातील कोणत्याही प्लांट/युनिट/माइन मध्ये नोकरी करावी लागेल.
  • निवड प्रक्रीये दरम्यान उमेद्वारणाची बायोमेट्रिक रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफीकेशन होईल.
  • भरतीप्रक्रिया हि तात्पुरत्या स्वरुपाची आहे व्यवस्थापनाने भरती प्रक्रिया रद्द/प्रतिबंधित करण्याचे हक्क राखून ठेवले आहेत.
  • (SAIL Recruitment 2024) जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी/जास्त तसेच भारती प्रक्रिया रद्द करणे याचे सर्व अधिकार व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
  • परीक्षा केंद्र आणि परिसरात मोबाईल फोन किंवा कोणत्याही प्रकारचे इलेक्ट्रोनिक उपकरण आणण्यास सक्त मनाइ आहे.
  • कोणत्याही प्रकारचा वाद हा Rourkela, Odisha न्यायालयाच्या अधीन असेल.
  • अर्जाच्या वेळी उमेदवारांनी लाखात ठेवावे कि एकापेक्षा जास्त पदासाठी CBT/कौशल्य चाचणी परीक्षा तारीख एकसारखी असू शकते.
  • भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर उमेदवारांनी निवडीसाठी प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचे आढळल्यास उमेदवारास अपात्र ठरवले जाईल.
  • भरतीबाबत उमेदवारांशी पत्रव्यवहार हे फक्त इमेल/एस एम एस /सेल च्या अधिकृत संकेतस्थळाद्वारे केले जातील.

महत्वाच्या तारखा (SAIL Recruitment 2024)

अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख -२६/०२/२०२४

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख -१८/०३/२०२४

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

जाहिरातीसाठी -इथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी -इथे क्लिक करा

नोकरीच्या अश्याच नाव नवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून जॉईन किंवा फॉलो करा

व्हाॅट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

टेलीग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

इन्स्टाग्राम पेज ला फॉलो करण्यासाठी -इथे क्लिक करा

Article

भारतीय वायू सेनेत एअरमन पदासाठी भरती

Indian Navy मध्ये Short Service Commission Officer पदासाठी २५४ जागांवर भरती

NTPC मध्ये विविध शाखेच्या Deputy Manager पदासाठी भरती

Central Bank of India मध्ये ३००० जागांवर अप्रेंटिस पदाची भरती

भारतीय सैन्यात Sepoy Pharma Intake या पदासाठी भरती