Pradhanmantri Aawas Yojana Gramin भारतातील ग्रामीण गरीब तसेच बेघर लोकांचे पक्क्या घराचे स्वप्न साकार करणारी योजना

घर हे सामान्यतः मूलभूत गरजांपैकी एक गोष्ट आहे. पण बहुतांश भारतातील ग्रामीण भागातील गरीब आणि सामान्य कुटुंबासाठी स्वतःचे घर बांधणे हे स्वप्नच राहते. कच्चे घर, झोपड्या अश्या घरांमध्ये या देशातील ग्रामीण भागातील लाखो कुटुंबे वास्तव्य करत आहे. या परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी भारत सरकारने या योजनेची सुरुवात केली आहे. ही योजना Pradhanmantri Aawas Yojana Gramin या नावाने ओळखली जाते.

या लेखात आपण या योजनेबाबतची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. या योजनेचा प्रमुख उद्देश हा ग्रामीण भागातील गरीब ,बेघर कुटुंबांना पक्के घर बांधून देण्यासाठी आर्थिक स्वरूपात मदत करणे हा आहे. सविस्तर माहिती पुढे आपण पाहणार आहोतच.

Pradhanmantri Aawas Yojana Gramin

Table of Contents

Pradhanmantri Aawas Yojana Gramin काय आहे ?

भारत सरकारच्या अंतर्गत ग्रामीण भागातील लोकांसाठी गृहनिर्माणासाठी आर्थिक मदत देण्यासाठी सुरू केलेल्या या योजनेचे नाव Pradhanmantri Aawas Yojana-Gramin असे आहे. ही योजना ही पूर्वीच्या इंदिरा आवास योजनेची सुधारित आवृत्ती आहे. २०१६ साली ही योजना लागू करण्यात सुरुवात झाली आहे.

योजनेचा इतिहास

  • १९८५ – इंदिरा आवास योजना या नावाने ही योजना तत्कालीन सरकारने सुरू केली.
  • २०१६ – इंदिरा आवास योजनेत काही बदल करून या योजनेचे रुपांतर प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण असे करण्यात आले.
  • Direct Benifit Transfer प्रणाली लागू करण्यात आली.

Pradhanmantri Aawas Yojana Gramin मुख्य उद्दिष्ट्ये

  • ग्रामीण भागातील बेघर तसेच गरीब कुटुंबांना पक्की घर उपलब्ध करण्यास आर्थिक मदत देणे.
  • कच्ची घरे असतील तर त्याचे पक्की घरात रुपांतर करण्यास मदत करणे.
  • महिलांच्या नावावर घर देऊन महिला सक्षमीकरणास प्रोत्साहन देणे.
  • शौचालय बांधण्यास आर्थिक सहाय्य पुरवणे.
  • ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान सुधारणे.

या योजनेस पात्र असण्याच्या अटी

  • अर्जदार हा ग्रामीण भागातील रहिवाशी असावा.
  • अर्जदाराचे स्वतःचे पक्के घर नसावे.
  • काकच्च्या घरात राहत असावा.
  • SECC 2011 च्या यादीत नाव असावे.
  • SC/ST/OBC/अल्पसंख्याक तसेच BPL प्रवर्गातील कुटुंब असावे.
  • अर्जदार हे विधवा, अपंग,निराधार असावे.
  • शहरी भागातील नागरिक या योजनेसाठी पात्र असणार नाहीत.

Pradhanmantri Aawas Yojana Gramin अंतर्गत मिळणारे लाभ

या योजने अंतर्ग मिळणारा आर्थिक लाभ हा क्षेत्राप्रमाणे वेगवेगळा आहे.

  • सामान्य ग्रामीण क्षेत्रासाठी ₹१,२०,०००/- अनुदान मिळते.
  • डोंगराळ/आदिवासी/दुर्गम क्षेत्रातील लाभार्थ्यांना ₹१,३०,०००/- अनुदान मिळते.
  • याव्यतिरिक्त शौचालयासाठी ₹१२,०००/- काही राज्यात मनरेगा अंतर्गत काही राज्यात अनुदान मिळते.

या योजने अंतर्गत घरसाठीचे निकष काय आहेत?

  • किमान क्षेत्रफळ हे २५ चौरस मीटर असावे.
  • पक्क्या भिंती आणि छप्पर असावे
  • स्वयंपाकघराची सोय असावी.
  • वीज जोडलेली असावी.
  • पिण्याच्या पाण्याची सोय असावी.
  • शौचालय असणे आवश्यक

Pradhanmantri Aawas Yojana Gramin साठी लागणारे कागदपत्र

  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • SECC 2011 प्रमाणपत्र
  • रहिवाशी दाखला
  • बँक पासबुक
  • मोबाईल नंबर
  • पासपोर्ट आकाराचे फोटो

अर्ज कसा करावा ?

  • ऑफलाईन पद्धत
    • Pradhanmantri Aawas Yojana Gramin साठी अर्जदाराने प्रथम ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन देऊन ग्रामसेवक/पंचायत सचिव यांची भेट घ्यावी.
    • ग्रामसेवक /पंचायत सचिव यांच्याकडून या योजनेची माहिती घ्यावी.
    • ग्रामसेवक /पंचायत सचिवांकडून अर्ज घेऊन अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरून घ्यावी
    • आवश्यक ती सर्व कागदपत्र अर्जासोबत जोडावी.
    • SECC च्या माहितीनुसार अर्जदाराची पात्रता तपासली जाते.
    • ग्रामसभेमध्ये लाभार्थी यादी मंजूर केली जाते.
  • ऑनलाईन पद्धत
    • या याजेनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध नाही.

Pradhanmantri Aawas Yojana Gramin साठी पात्र झाल्याची तपासणी कशी करावी?

  • अर्जदारांनी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
  • स्टेकहोल्डर पर्यायावर क्लिक करावे.
  • IAY/PMAYG Beneficiary या पर्यायावर क्लिक करा.
  • राज्य,जिल्हा,तालुका,गाव ही सर्व माहिती निवडा.
  • योजनेस पात्र लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध होईल.

Pradhanmantri Aawas Yojana Gramin फायदे

  • या योजनेच्या सहाय्यानं गरीब आणि गरजू कुटुंबांना सुरक्षित आणि पक्की घरे मिळतात.
  • महिलांच्या नावावर घर असल्याने महिला सक्षमीकरणावर भर.
  • पाउस आणि इतर नैसर्गिक आपत्तीपासून सुरक्षा मिळते.
  • आरोग्यात सुधारणा होते.
  • रक्कम थेट बँक खात्यात जमा होत असल्याने व्यवहार पारदर्शकता.

Pradhanmantri Awas Yojana Gramin ही प्रामुख्याने ग्रामीण भागातील गरीब ,बेघर तसेच कच्च्या घरात राहणाऱ्या BPL लोकांना पक्की घरे बांधण्यास अर्थासह करण्याच्या दृष्टीने भारत सरकारने सुरू केलेली योजना आहे. ही योजना फक्त घरच नाही तर सुरक्षितता,सन्मान आणि स्थैर्य देते. जर तुमच्या गावात किंवा ओळखीत अजूनही कोणी कच्च्या घरात किंवा बेघर असेल तर त्यांना या योजनेचा लाभ होऊ शकतो.ही माहिती गरजू लोकांपर्यंत नक्की पोहोचवा.

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

जाहिरातीसाठी – इथे क्लिक करा

योजनेच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा

व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा


FAQ

Pradhanmantri Aawas Yojana Gramin काय आहे?

ही केंद्र सरकार अंतर्गत असणारी ग्रामीण गृहनिर्माण योजना आहे.जी ग्रामीण भागातील गरीब ,बेघर आणि कच्च्या घरात राहणाऱ्या कुटुंबं पक्की घरे बांधण्यास अनुदान देते.

PMAY-G साठी कोण पात्र असेल?

उमेदवार हा ग्रामीण भागातील रहिवासी असावा,त्याचे स्वतःचे पक्के घर नसावे, SECC 2011 या यादीत नाव असावे, SC/ST/OBC/BPL कुटुंबे,विधवा /अपंग/निराधार व्यक्ती पात्र असतील.

शहरी नागरिक या योजनेस पात्र असतील का?

नाही ही योजना फक्त ग्रामीण भागातील लोकांसाठी आहे. शहरी भागातील लोकांसाठी PMAY-URBAN ही योजना आहे.

अनुदान किती मिळते?

समान क्षेत्रासाठी – ₹१,२०,०००/-
डोंगराळ/आदिवासी दुर्गम भागासाठी-₹१,३०,०००/-
शौचालयासाठी ₹१२,०००/-

या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा आहे का?

नाही

लाभार्थ्यांची यादी कशी तपासावी?

पात्र लाभार्थ्यांची यादी ही अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केले जाते.


Articles

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (MGNREGA)- ग्रामीण बेरोजगारांना वर्षाला १०० दिवस रोजगाराची हमी

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना – महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलासा देणारी कर्जमाफी योजना

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना – रुग्णांना मिळणार आता 2 लाखांपर्यंत मोफत उपचार

श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती धन योजना – महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांना मासिक पेन्शनचा लाभ देणारी योजना

प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना – सर्व सामान्य लोकांना परवडणारी विमा योजना

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top