(PNB Recruitment 2024)Punjab National Bank मध्ये विविध पदासाठी १०२५ जागांवर भरती

(PNB Recruitment 2024) Punjab National Bank मध्ये विविध पदांसाठी १०२५ जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. इच्छुक उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून २५/०२/२०२४ पूर्वी भरायचे आहेत. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

PNB Recruitment 2024

जाहिरात क्र

रिक्त पदांचा तपशील

अ क्र पदाचे नाव पद संख्या
ऑफिसर (क्रेडीट)१०००
मॅनेजर-(फॉरेक्स)१५
मॅनेजर-(सायबर सेक्युरिटी)०५
सिनीअर मॅनेजर (सायबर सेक्युरिटी)०५
एकूण १०२५
(PNB Recruitment 2024)

शैक्षणिक अर्हता (PNB Recruitment 2024)

  • पद क्र-१
    • उमेदवार हा चार्टर्ड अकाउंटनट्स ऑफ इंडिया या संस्थेचा CA परीक्षा उत्तीर्ण असावा. किंवा
    • उमेदवार हा कॉस्ट अकाउंटनट्स ऑफ इंडिया या संस्थेचा CMA (ICWA) उत्तीर्ण असावा. किंवा
    • उमेदवार हा CFA (USA) या संस्थेचा CFA उत्तीर्ण असावा. किंवा
    • उमेदवार हा सरकारी/AICTE/UGC मान्यताप्राप्त संस्थेचा/विद्यापीठचा वित्त या विषयासह पूर्ण वेळ MBA किंवा Management विषयातील पदव्युत्तर डिप्लोमा किंवा समतुल्य परीक्षा किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण असावा.
    • अनुभव असल्यास प्राधान्य
  • पद क्र २
    • उमेदवार हा सरकारी/AICTE/UGC मान्यताप्राप्त संस्थेचा/विद्यापीठचा वित्त किंवा आंतरराष्ट्रीय व्यवसाय या विषयासह पूर्ण वेळ MBA किंवा Management विषयातील पदव्युत्तर डिप्लोमा किंवा समतुल्य परीक्षा किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण असावा.
    • संबंधित क्षेत्रातील किमान २ वर्षे अनुभव असणे आवश्यक.
  • पद क्र ३
    • उमेदवार हा कॉम्पुटर सायन्स/माहिती तंत्रज्ञान /इलेक्ट्रोनिक्स and कॉम्यूनिकेशन या शाखेचे मान्यताप्राप्त विद्यापीठाचे BE/B.tech परीक्षा किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण असावा. किंवा
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेचा MCA परीक्षा किमान ६०% गुणांसह असावा. किंवा
    • मान्यताप्राप्त संस्थेचे किंवा विद्यापीठाचे कॉम्पुटर सायन्स/माहिती तंत्रज्ञान /इलेक्ट्रोनिक्स and कॉम्यूनिकेशन या शाखेचे M.tech परिक्षा उत्तीर्ण असल्यास प्राधान्य.
    • किमान २ वर्ष अनुभव आवश्यक.
  • पद क्र ४
    • उमेदवार हा कॉम्पुटर सायन्स/माहिती तंत्रज्ञान /इलेक्ट्रोनिक्स and कॉम्यूनिकेशन या शाखेचे मान्यताप्राप्त विद्यापीठाचे BE/B.tech परीक्षा किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण असावा. किंवा
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेचा MCA परीक्षा किमान ६०% गुणांसह असावा. किंवा
    • मान्यताप्राप्त संस्थेचे किंवा विद्यापीठाचे कॉम्पुटर सायन्स/माहिती तंत्रज्ञान /इलेक्ट्रोनिक्स and कॉम्यूनिकेशन या शाखेचे M.tech परिक्षा उत्तीर्ण असल्यास प्राधान्य.
    • किमान ४ वर्षे अनुभव असणे आवश्यक.

वयोमर्यादा (PNB Recruitment 2024)

  • पद क्र १ – ०१/०१/२०२४ उमेदवाराचे किमान वय २१ वर्षे आणि कमाल वय २८ वर्षे असावे.
  • पद क्र २ – ०१/०१/२०२४ उमेदवाराचे किमान वय २५ वर्षे आणि कमाल वय ३५ वर्षे असावे.
  • पद क्र ३ – ०१/०१/२०२४ उमेदवाराचे किमान वय २५ वर्षे आणि कमाल वय ३५ वर्षे असावे.
  • पद क्र ४ – ०१/०१/२०२४ उमेदवाराचे किमान वय २७ वर्षे आणि कमाल वय ३८ वर्षे असावे.
  • वरील पदांसाठी अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ५ वर्षे शिथिलता राहील.
  • इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ३ वर्षे शिथिलता राहील.
  • अपंग उमेदवारांना कमाल वयात १० वर्षे शिथिलता राहील.
  • माजी सैनिक उमेदवारांना कमाल वयात ५ वर्षे शिथिलता राहील.

प्रवर्ग निहाय पद संख्या (PNB Recruitment 2024)

पदाचे नाव अजा अज इ. मा .व आ. दु .घखुला एकूण
ऑफिसर (क्रेडीट)१५२७८२७०१००४००१०००
मॅनेजर-(फॉरेक्स)०२०१०४०१०७१५
मॅनेजर-(सायबर सेक्युरिटी)०१०००१०००३०५
सिनीअर मॅनेजर (सायबर सेक्युरिटी)०००१०१०००३०५
एकूण१५५८०२७६१०१४१३१०२५

अर्ज शुल्क (PNB Recruitment 2024)

  • अजा/अज/अपंग प्रवर्गातील उमेदवारांना रु ५०/- +GST १८% =रु ५९/- भरावे लागतील.
  • इतर सर्व प्रवर्गातील उमेदवारांना रु १००० +GST १८%=रु ११८०/- अर्ज शुल्क भरावा लागेल.
  • अर्ज शुल्क हे ना परतावा तत्वावर आहे.
  • ऑनलाईन शुल्क भरताना जे अधिकचे शुल्क असेल ते उमेदवारांना भरावे लागेल.

अर्ज कसा कराल

  • इच्छुक उमेदवारांनी त्यांचे अर्ज विहित केलेल्या तारखे दरम्यान अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे.
  • अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. दुसऱ्या कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारला जाणार नाही.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठीचे स्टेप्स (PNB Recruitment 2024)

  • उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ‘Click Here for New Registration’ वर क्लिक करणे.
  • त्यानंतर विचारलेली माहिती अर्जामध्ये भरणे.
  • उमेदवारास रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड मिळेल. हा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड उमेदवारांनी नमूद करून घेणे.
  • उमेदवारांनी भरलेली माहिती योग्य आणि अचूक असल्याची खात्री करून सेव्ह अँड नेक्स्ट वर क्लिक करणे.
  • Complete Registration वर क्लिक करण्यापूर्वी माहिती अचूक असल्याची खात्री करणे आणि मगच Complete Registration वर क्लिक करणे.
  • Complete Registration वर केल्यानंतर अर्जामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करता येणार नाही.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून घ्यावी आणि अर्ज करावा.
  • रजिस्टर करताना उमेदवारांनी जो ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर दिला असेल तो भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
  • अर्धवट भरलेला अर्ज रद्द करण्यात येतील.

ऑनलाईन अर्ज शुल्क भरण्याची प्रक्रिया(PNB Recruitment 2024)

  • उमेदवारांनी अर्ज शुल्क हे ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे.
  • उमेदवार अर्ज शुल्क हे डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग,IMPS,कॅश कार्ड, मोबाईल वॉलेट, UPI यांच्या साहाय्याने उमेदवारांना जमा करता येईल.
  • रजिस्ट्रेशन ची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पेमेंट लिंक वरून वरील दिलेल्या पर्यायांपैकी एक पर्याय निवडून अर्ज शुल्क भरू शकतील.
  • जर व्यवहार रद्द झाला असा मेसेज आल्यास उमेदवारांनी पुन्हा लॉग इन करून अर्ज शुल्क भरण्याची व्यवहार पूर्ण करावा.
  • अर्ज शुल्क भरल्याचा व्यवहार पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांनी त्याची प्रिंट काढून घ्यावी.
  • अर्ज भरण्याची आणि अर्ज शुल्क भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर उमेदवारांनी ऑनलाईन अर्जाची आणि पैसे भरल्याची रिसट यांची प्रिंट काढून घ्यावी.

अर्ज करताना लागणारी कागदपत्रे (PNB Recruitment 2024)

१)अलीकडील काळातील पासपोर्ट आकाराचा रंगीत फोटो २)सही ३)डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा ४) हस्तलिखित घोषणा ५) सर्व शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र आणि गुणपत्र ६) जात प्रमाणपत्र ७)वयाचा पुरावा ८)अनुभवाचे प्रमाणपत्र ९)आर्थिक दुर्बल घटक असल्यास पुरावा १०)माजी सैनिक असल्यास पुरावा ११) अपंग असल्यास पुरावा १२)

कागदपत्र अपलोड करण्याची प्रक्रिया (PNB Recruitment 2024)

  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अलीकडील काळातील पासपोर्ट आकाराचा रंगीत फोटो,सही,डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा ,हस्तलिखित घोषणा आणि इतर सर्व कागदपत्र स्कॅन करून ठेवणे.
    • फोटो
      • फोटो हा अलीकडील काळातील पासपोर्ट आकाराचा कलर असावा.
      • फोटो काढताना जर फ्लॅश लाईट छा वापर केला असेल तर डोळे लाल दिसत नसल्याची खात्री करून घेणे.
      • फोटो काढताना जर चष्मा घातला असेल तर डोळे व्यवस्थित दिसत आल्याची खात्री करून घेणे.
      • टोपी, गॉगल असलेला फोटो ग्राह्य धरला जाणार नाही.
      • स्कॅनिंग करताना २००X२३० पिक्सल्स Dimension असावे.
      • फाईलची साइज २० kb ते ५० kb इतकी असावी.फाईलची साइज ५०kb पेक्षा जास्त नसावी.
    • सही
      • उमेदवारांनी काळ्या शाईच्या पेन ने पांढऱ्या कागदावर सही करून स्कॅन करणे.
      • फाईल चे Dimension १४०x ६० पिक्सल असावे.
      • फाईलची साइज १० kb ते २० kb इतकी असावी.फाईलची साइज २०kb पेक्षा जास्त नसावी.
    • डाव्या हाताचा ठसा
      • काळ्या किंवा निळ्या शाईच्या साहाय्याने उमेदवारांनी पांढऱ्या कागदावर डाव्या हाताचा ठसा उठवून स्कॅन करायचे आहे.
      • ह्या फाईल चा प्रकार हा jpg/jpeg असावे.
      • फाईल चे Dimension २४०x २४० पिक्सल २०० DPI असावे.
      • फाईलची साइज २० kb ते ५० kb इतकी असावी.
    • हस्तलिखित घोषणा
      • उमेदवाराने पांढऱ्या कागदावर निळ्या शाईच्या पेन ने हस्तलिखित घोषणा ही इंग्रजी मध्ये लिहून स्कॅन करणे.
      • ह्या फाईल चा प्रकार हा jpg/jpeg असावे.
      • फाईल चे Dimension ८००x ४०० पिक्सल २०० DPI असावे.
      • फाईलची साइज २० kb ते ५० kb इतकी असावी.
    • वयाचा पुरावा
      • उमेदवारांनी जन्माचा दाखला/SSLC/ ई.१० वी चे प्रमाणपत्र वयाचा पुरावा म्हणून जमा करायचा आहे.
      • ह्या फाईल चा प्रकार हा pdf असावे.
      • फाईलची साइज ही ५०० kb पेक्षा जास्त नसावी.
    • जात प्रमाणपत्र /सर्व शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र आणि गुणपत्र /अनुभवाचे प्रमाणपत्र
      • ह्या फाईल चा प्रकार हा pdf असावे.
      • फाईलची साइज ही ५०० kb पेक्षा जास्त नसावी.

निवड प्रक्रिया (PNB Recruitment 2024)

  • उमेदवारांची निवड ही ऑनलाईन लेखी परीक्षेसह मुलाखत घेऊन किंवा फक्त मुलाखतीने याचा निर्णय हा प्रत्येक पदासाठी किती अर्ज येतात यावर अवलंबून असेल. याचा निर्णय बँक घेईल.
  • ऑनलाईन लेखी परीक्षा
    • ही परीक्षा २ भागात होईल
      • भाग १
        • १)Reasoning -२५ प्रश्न,२५ गुण
        • २)इंग्रजी भाषा -२५ प्रश्न,२५ गुण
        • ३)Quantitative Aptitude -५० प्रश्न,५० गुण
      • भाग २
        • व्यवसायिक ज्ञान -५० प्रश्न,१०० गुण
      • परीक्षेचा कालावधी १२० मिनिटे असेल.
  • मुलाखत
    • ऑनलाईन लेखी परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार करून पात्र उमेदवाराची मुलाखत होईल.
    • मुलाखत ही ५० गुणांची असेल.मुलाखती मध्ये उमेदवारांना किमान ४५% गुण मिळवणे आवश्यक राहील.
    • उमेदवारांची अंतिम निवड ही उमेदवारांना मिळालेल्या व्यवसायिक ज्ञान मध्ये आणि मुलाखती मध्ये मिळालेले एकूण गुण यावर अवलंबून असेल.

महत्वाच्या सूचना (PNB Recruitment 2024)

  • भरती प्रक्रिया रद्द करणे,भरतीच्या जागा कमी किंवा जास्त करणे याबाबतचे सर्व निर्णय हे बँकेने राखून ठेवले आहेत.
  • ऑनलाईन लेखी परीक्षा तसेच मुलाखतीसाठी हजर राहण्यासाठी येणारा खर्च हा उमेदवारांनी स्वतः करायचा आहे.

महत्वाच्या तारखा (PNB Recruitment 2024)

अर्ज करण्यासाठी सुरुवातीची तारीख -०७/०२/२०२४

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख -२५/०२/२०२४

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

जाहिरातीसाठी- इथे क्लिक करा

नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून जॉईन किंवा फॉलो करा

व्हॉटस् ॲप ग्रुप – इथे क्लिक करा

टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

इंस्टाग्राम पेज ला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा

Article

केंद्रीय राखीव पोलीस दलात हवालदार (कॉन्स्टेबल)या पदासाठी गुणवंत खेळाडूंना नोकरीची संधी

सिडको सहाय्यक अभियंता पदासाठी १०१ जागांवर भरती

भारतीय रेल्वे मध्ये असिस्टंट लोको पायलट पदासाठी ५६९६ जागांवर भरती

National Institute Of Naturopathy विविध पदांसाठी भरती

स्पोर्टस अथॉरिटी ऑफ इंडिया (SAI) मध्ये विविध पदांसाठी २१४ जागांवर भरती