PM Surya Ghar Yojana – घरच्या छतावर सोलर बसवा आणि वीज बिल शून्य करा

भारत सरकारने PM Surya Ghar Yojana ची सुरुवात केली आहे. ज्याच्या सहाय्याने घराच्या छपरावर सौर ऊर्जा पॅनल बसवून वीज बिल कमी करता येईल आणि हरित आणि स्वच्छ ऊर्जेचा वापर करता येईल.PM Surya Ghar Yojana बाबतची सविस्तर माहिती उद्दिष्ट्ये,,फायदे,अर्ज कसा करावा,पात्रता याबाबतची सेवा माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा,

Table of Contents

PM Surya Ghar Yojana उद्देश

PM Surya Ghar Yojana ही घरांच्या छतावर सोलर पॅनल लावण्यास आर्थिक सहाय्य तसेच सबसिडी देते. या योजनेची प्रमुख उद्देश पुढीलप्रमाणे,

  • या योजने अंतर्गत घरांना दर महिन्याला ३०० युनिट पर्यंत मोफत वीज देणे.
  • वीज बिलामध्ये बचत
  • स्वच्छ आणि हरित ऊर्जा वापरण्यास प्रोत्साहन
  • १ कोटी घरांना लक्ष्य करून सौर ऊर्जा प्रणाली बसवणे

ही योजना ही १५ फेब्रुवारी २०२४ पासून सुरू केलेली असून या योजनेअंतर्गत सबसिडी, आर्थिक सहाय्य,लोन या सुविधा पुरवल्या जातात.

योजनेचे प्रमुख फायदे

  • सोलर च्या इन्स्टॉलेशन साठी सबसिडी.
    • सरकार घराच्या छतावर सोलर पॅनल बसवण्यासाठी पुढे नमूद केल्याप्रमाणे अनुदान देते.
      • १ किलो वॅट क्षमता – ₹३०,०००/-
      • २ किलो वॅट क्षमता – ₹६०,०००/-
      • ३ किलो वॅट क्षमता – ₹७८,०००/-
      • सबसीडी ही थेट बँक खात्यात जमा होते.
    • महिन्याला ३०० युनिट मोफत वीज
      • PM Surya Ghar Yojana अंतर्गत बसवलेल्या सोलर सिस्टम मुळे ३०० युनिट प्रती महिना वीज तयार होते यामुळे घराचे वीज बिल भरपूर प्रमाणात कमी होते.
    • पर्यावरणातील फायदा
      • सौर ऊर्जेच्या वापरामुळे CO2 उत्सर्जन कमी होते तसेच हरित ऊर्जेचा वापर वाढतो. यामुळे पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम कमी होतो.
    • कर्ज तसेच आर्थिक सहाय्य मिळते
      • सरकारी बँकेद्वारे कमी व्याजदरासह कर्ज मिळते.

पात्रता

  • अर्ज करणारा उमेदवार हा भारताचा नागरिक असावा.
  • स्वतःचे घर असावे.
  • वीज कनेक्शन असणे आवश्यक आहे.
  • या याआधी कधी रूफ टॉप सोलर सबसिडी घेतलेली नसावी.
  • घरच्या छतावर सोलर पॅनल बसवण्यास पुरेशी जागा असणे आवश्यक

PM Surya Ghar Yojana मध्ये काय मिळते ?

  • सरकार ₹३०,०००/- ते ₹७८,०००/- सबसिडी लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करते.
  • कर्ज – कमी व्याजदरात लाभार्थी या योजनेसाठी सरकारी बँकेतून कर्ज घेऊ शकतील.

अर्ज कसा करावा?

  • उमेदवारांनी प्रथम अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी.
  • त्यातील Apply for Rooftop Solar या पर्यायावर क्लिक करा.
  • राज्य तसेच वीज वितरक निवडा
  • अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरून घ्या.
  • आवश्यक ती सर्व कागदपत्र अपलोड करून घ्या.
  • अर्ज सबमिट करा.
  • अर्जाच्या छाननी मध्ये पात्र ठरल्यास सोलर पॅनल बसविण्याची प्रक्रिया सुरू होईल.

कागदपत्र(PM Surya Ghar Yojana)

  • फोटो ओळखपत्र -आधार कार्ड, पॅन कार्ड, निवडणूक ओळखपत्र
  • पत्ता पुरावा – आधार कार्ड , लाइट बिल ,रेशन कार्ड
  • वीज कनेक्शन – अलिकडील वीज बिल,Consumer Number किंवा Account नंबर
  • घरच्या मालकीचा पुरावा – Property Tax पावती,Sale Deed किंवा ७/१२
  • बँक – बँकेचे पासबुक
  • पासपोर्ट आकाराचे फोटो
PM Surya Ghar Yojana

वीज किती तयार होते ?

  • १ किलो वॅट सोलरला १२० युनिट प्रती महिना
  • ३ किलो वॅट सोलरला ३०० ते ३६० युनिट प्रती महिना

PM Surya Ghar Yojana ही केंद्र सरकारने सुरू केलेली हरित ऊर्जा बचत योजना आहे. ही योजना लोकांना वीज बिलात बचत, सबसिडी,पर्यावरण संरक्षण ,स्वच्छ वीज वापर,ऊर्जा आत्मनिर्भरता ही फायदे देते.ही योजना भविष्यात भारताला ऊर्जा सशक्त आणि स्वच्छ ऊर्जा आधारित राष्ट्र बनवण्यात महत्वाची भूमिका पार पाडेल.

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

जाहिरातीसाठी – इथे क्लिक करा

योजनेच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा

व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा


FAQ

Apartment मध्ये राहतो अर्ज करू शकतो का?

हो,पण Society किंवा Common Rooftop model लागू होते.

भाड्याच्या घरासाठी ही योजना आहे का ?

नाही,घर स्वतःच्या नावावर असणे आवश्यक आहे.

PM Surya Ghar Yojana अंतर्गत सबसीडी कधी मिळते?

Installation+ Net Metering पूर्ण झाल्यावर
साधारण ३० ते ४५ दिवसात

किती वीज माझ्या घराला मिळू शकते?

३०० युनिट पर्यंत सौर विजेचं उत्पादन मिळू शकते.

योजना फक्त विद्यमान घर मालकांसाठीच आहे का?

हो

या योजनेसाठी कर्ज मिळते का?

हो, सरकारी बँक मधून कमी व्याज दर कर्ज मिळते.
EMI वर सोलर बसवण्याची सुविधा उपलब्ध

अर्ज ऑनलाईन करता येतो का?

हो,अधिकृत संकेतस्थळावर जाऊन उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतील.

सोलर सिस्टम किती वर्ष टिकेल?

साधारण,२५ वर्ष
मेंटेनन्स खर्चही कमी.

पावसाळा किंवा ढगाळ वातावरणात सोलर चालते का?

हो, पण उत्पादन कमी होते.

नेट मीटरिंग म्हणजे काय?

अतिरिक्त तयार होणारी वीज ही सरकारच्या ग्रीड मध्ये पाठवली जाते. या विजेचे क्रेडिट हे तुमच्या वीज बिलात मिळते.


Articles

Sukanya Samruddhi Yojana – मुलींचे आयुष्य घडवण्यात मोलाची साथ देणारी योजना

(Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana)मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना -युवकांना आता मिळणार उद्योजाकांसोबत व्यवहारिक प्रशिक्षण

(MGNREGA Yojana) महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (MGNREGA)- ग्रामीण बेरोजगारांना वर्षाला १०० दिवस रोजगाराची हमी

(Mahatma Phule Jan Aarogya Yojana) महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना – रुग्णांना मिळणार आता 2 लाखांपर्यंत मोफत उपचार

(CSMSSY Shetkari Karjmukti Yojana) छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना – महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलासा देणारी कर्जमाफी योजना

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top