भारत सरकारच्या महारत्न कंपनीपैकी एक असणारी ऑईल इंडिया लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी २६२ जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. Oil India Limited Recruitment 2025 साठी इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून १८/०७/२०२५ ते १८/०८/२०२५ या दरम्यान जमा करायचे आहेत. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

जाहिरात क्र – HRAQ/REC-WP-B/2025-105
Table of Contents
रिक्त पदांचा तपशील (Oil India Limited Recruitment 2025)
अ.क्र | पदाचे नाव | पद संख्या |
१ | बॉयलर अटेंडंट (सेकंड क्लास) | १४ |
२ | ऑपरेटर -सिक्युरिटी ग्रेड III (कॉन्स्टेबल/एक्स सर्व्हिसमन बॅकग्राउंड) | ४४ |
३ | ज्युनियर टेक्निकल फायरमन | ५१ |
४ | पब्लिक हेल्थ सॅनिटरी इन्स्पेक्टर | ०२ |
५ | बॉयलर अटेंडंट (फर्स्ट क्लास ) | १४ |
६ | नर्स (ग्रेड V) | ०१ |
७ | हिंदी ट्रान्सलेटर | ०१ |
८ | केमिकल इंजीनिअरिंग असिस्टंट | ०४ |
९ | सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट | ११ |
१० | कॉम्प्युटर इंजिनिअरिंग असिस्टंट | ०२ |
११ | इन्स्ट्रूमेंटेशन इंजिनियरिंग असिस्टंट | २५ |
१२ | मेकॅनिकल इंजिनियरिंग असिस्टंट | ६२ |
१३ | इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग असिस्टंट | ३१ |
एकूण | २६२ |
शैक्षणिक अर्हता (Oil India Limited Recruitment 2025)
- पद क्र १ –
- उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून इयत्ता १० वी परीक्षा उत्तीर्ण असावा.
- मान्यताप्राप्त संस्थेतून सेकंड क्लास बॉयलर अटेंडंट प्रमाणपत्र परिक्षा उत्तीर्ण असावा.
- पद क्र २
- उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून इयत्ता १० वी परीक्षा उत्तीर्ण असावा.
- कॉन्स्टेबल पदापेक्षा कमी किंवा राज्य पोलीस /राज्य सशस्त्र दल /संरक्षण/CAPF मधील समकक्ष पदापेक्षा कमी नाही असा ०३ वर्ष कालावधीचा पूर्ण वेळ कामाचा अनुभव असावा.
- पद क्र ३
- उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून इयत्ता १२ वी परिक्षा उत्तीर्ण असावा.
- फायर आणि सेफ्टी विषयातून डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र परीक्षा किंवा सब ऑफिसर्स कोर्स परीक्षा उत्तीर्ण असावा.
- उमेदवाराकडे अवजड वाहन चालवण्याचा परवाना असावा.
- पद क्र ४
- उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून इयत्ता १२ वी परीक्षा उत्तीर्ण असावा.
- उमेदवार हा स्वच्छता निरीक्षक/आरोग्य निरीक्षक/स्वच्छता आरोग्य निरीक्षक /सार्वजनिक आरोग्य स्वच्छता विषयातून डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असावा.
- पद क्र ५
- उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून इयत्ता १० वी परीक्षा उत्तीर्ण असावा. आणि
- फर्स्ट क्लास बॉयलर अटेंडंट प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असावा.
- पद क्र ६
- उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची B.Sc Nursing पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
- उमेदवारास किमान २ वर्ष अनुभव असवा.
- पद क्र ७ (Oil India Limited Recruitment 2025)
- उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची हिंदी /इंग्रजी विषयासह पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
- एक वर्ष कालावधीची हिंदी किंवा इंग्रजी ट्रान्सलेशन कोर्स उत्तीर्ण असावा.
- उमेदवार हा सहा महिने कालावधीचा कॉम्प्युटर ॲप्लीकेशन डिप्लोमा /प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असावा.
- संबंधित कामाचा किमान १ वर्ष कालावधीचा अनुभव असावा.
- पद क्र ८
- उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून इयत्ता १० वी परीक्षा उत्तीर्ण असावा.
- उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून केमिकल इंजीनिरिंग शाखेतून डिप्लोमा अभियांत्रिकी परीक्षा उत्तीर्ण असावा.
- पद क्र९
- उमेदवार हा इयत्ता १० वी आणि सिव्हिल इंजिनिअरिंग शाखेतून डिप्लोमा अभियांत्रिकी परीक्षा उत्तीर्ण असावा.
- पद क्र १०
- उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून इयत्ता १० वी आणि कॉम्प्युटर इंजिनिअरिंग शाखेतून डिप्लोमा अभियांत्रिकी परीक्षा उत्तीर्ण असावा.
- पद क्र ११ (Oil India Limited Recruitment 2025)
- उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून इयत्ता १० वी आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेली कम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेन्टेशन/इन्स्ट्रूमेंटेशन/इन्स्ट्रूमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग शाखेतून डिप्लोमा अभियांत्रिकी परीक्षा उत्तीर्ण असावा.
- पद क्र १२
- उमेदवार हा मान्यताप्राप्तबोर्ड मधून इयत्ता १० वी आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग शाखेतून डिप्लोमा अभियांत्रिकी परीक्षा उत्तीर्ण असावा.
- पद क्र १३
- उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून इयत्ता १० वी आणि इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग शाखेतून डिप्लोमा अभियांत्रिकी परीक्षा उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा(Oil India Limited Recruitment 2025)
- पद क्र १,३,५ आणि ८ ते १३ – उमेदवाराचे किमान वय १८ वर्ष आणि कमाल वय ३० वर्ष असावे.
- पद क्र २- उमेदवाराचे किमान वय १८ वर्ष आणि कमाल वय ३३ वर्ष असावे.
- पद क्र ४ ते पद क्र ७ – उमेदवाराचे किमान वय १८ वर्ष आणि कमाल वय ३१ वर्ष असावे.
- पद क्र ६- उमेदवाराचे किमान वय १८ वर्ष आणि कमाल वय ३२ वर्ष असावे.
- अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ५ वर्ष शिथिलता राहील.
- इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ३ वर्ष शिथिलता राहील.
- अपंग आणि माजी सैनिक उमेदवारांना सरकारी नियमानुसार वयोमर्यादेमध्ये शिथिल असेल.
वेतन श्रेणी
- पद क्र १ ते ४ – उमेदवारास नोकरीत रुजू झाल्यानंतर ₹२६,६००/- ते ₹९०,०००/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
- पद क्र ५ ते ७- उमेदवारास नोकरीत रुजू झाल्यानंतर ₹३२,०००/- ते ₹१,२७,०००/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
- पद क्र ८ ते १३ – उमेदवारास नोकरीत रुजू झाल्यानंतर ₹३७,५००/- ते ₹१,४५,०००/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
अर्ज शुल्क
- Oil India Limited Recruitment 2025 साठी खुल्या आणि इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांनी ₹२००/- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
- अजा/अज/आर्थिक दुर्बल घटक/अपंग /माजी सैनिक उमेदवारांना अर्ज शुल्क माफ आहे.
- अर्ज शुल्क हे ना परतावा असून एकदा भरलेले अर्ज शुल्क कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.
- अर्ज शुल्क हे उमेदवारांनी क्रेडिट कार्ड/ डेबिट कार्ड /इंटरनेट बँकिंग यांच्या साहाय्याने ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
अर्ज कसा करावा
- इच्छुक पात्र उमेदवारांनी Oil India Limited Recruitment 2025 साठी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून १८/०७/२०२५ ते १८/०८/२०२५ या दरम्यान जमा करायचे आहेत.
- अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.
- अर्ज करण्यासाठीच्या स्टेप्स
- रजिस्ट्रेशन – उमेदवारांनी प्रथम स्वतःला अधिकृत संकेतस्थळावर रजिस्टर करून घ्यावे.
- अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरावी.
- आवश्यक ती सर्व माहिती अचूक भरावी.
- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करून घ्यावे.
कागदपत्र(Oil India Limited Recruitment 2025)
- वैध एम्प्लॉयमेंट एक्सचेंज कार्ड /सैनिकांनी जिल्हा सैनिक वेलफेअर ऑफिस रजिस्ट्रेशन कार्ड
- सर्व शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र आणि गुणपत्र
- जात प्रमाणपत्र
- नॉन क्रिमी लेअर प्रमाणपत्र
- आर्थिक दुर्बल घटक असल्यास इन्कम प्रूफ
- अपंग असल्यास प्रमाणपत्र
- माजी सैनिक असल्यास सर्व्हिस बुक /डिस्चार्ज सर्टिफिकेट
- फोटो
- सरकारी नोकरदार असल्यास विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र
महत्वाच्या सूचना
- इच्छुक उमेदवारांनी Oil India Limited Recruitment 2025 साठी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
- चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्धवट भरलेला अर्ज रद्द करण्यात येईल.
- रजिस्टर करताना दिलेला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
- जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे /वाढवणे तसेच भरतीप्रक्रिया रद्द करणे/ पुढे ढकलणे/स्थगित करणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
- भरती करण्याबाबत कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
महत्वाच्या तारखा (Oil India Limited Recruitment 2025)
अर्ज करण्यासाठी सुरुवातीची तारीख -१८/०७/२०२५ दुपारी २.०० वाजल्यापासून
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख – १८/०८/२०२५ रात्री ११.५९ वाजेपर्यंत
अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा
नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा
व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा
आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा