(NIACL Recruitment 2024)न्यू इंडिया एशोरेंस सहाय्यक पदासाठी ३०० जागांवर भरती

(NIACL Recruitment 2024) भारतातील अग्रगण्य इन्शुरन्स कंपनी असणाऱ्या न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी मध्ये सहाय्यक या श्रेणी ३ पदासाठी ३०० जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. इच्छुक उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून १५/०२/२०२४ पूर्वी जमा करणेच आहे. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे

NIACL Recruitment 2024

जाहिरात क्र -CORP.HRM/ASST/2023

रिक्त पदांचा तपशील (NIACL Recruitment 2024)

पदाचे नाव सहाय्यक (श्रेणी ३)

अ.क्र ठिकाण पद संख्या
आंध्र प्रदेश
आसाम
चंदीगड
छत्तीसगड१०
दिल्ली २३
गोवा
गुजरात२४
हरयाणा
जम्मू आणि काश्मीर
१०कर्नाटक१७
११केरळ २४
१२मध्य प्रदेश
१३महाराष्ट्र८१
१४मिझोराम
१५ओडिसा
१६पंजाब
१७राजस्थान
१८तामिळनाडू३२
१९तेलंगाना
२०त्रिपुरा
२१उत्तर प्रदेश १४
२२उत्तराखंड
२३पश्चिम बंगाल
एकूण ३००
(NIACL Recruitment 2024)

शैक्षणिक अर्हता (NIACL Recruitment 2024)

  • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेचा पदवीधर किंवा समतुल्य अर्हता धारक असावा.
  • उमेदवाराचा SSC किंवा HSC किंवा पदवी परीक्षा इंग्रजी विषयासहित उत्तीर्ण असावा.
  • उमेदवारास ज्या राज्याच्या किंवा ठिकाणच्या पदासाठी अर्ज केला असेल तेथील भाषा लिहिता,वाचता आणि बोलता येणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा (NIACL Recruitment 2024)

  • वरील पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे दि ०१/०१/२०२४ पर्यंत किमान वय २१ वर्षे आणि कमाल वय ३० वर्षे असावे.
  • उमेदवाराचा जन्म हा दि.०२/०१/१९९४ पूर्वी आणि ०१/०१/२००३ नंतर झालेला नसावा.
  • अजा/ अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ५ वर्षे शिथिलता राहील.
  • इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ०३ वर्षे शिथिलता राहील.
  • अपंग उमेदवारांना कमाल वयात १० वर्षे शिथिलता राहील.
  • विधवा,घटस्फोटित,नवऱ्यापासून कायदेशीर वेगळे झालेल्या आणि पुन्हा लग्न न केलेल्या महिला उमेदवारांना कमाल वयात ५ वर्षे शिथिलता राहील.
  • न्यू इंडिया एशुरन्सच्या कर्मचाऱ्यांना कमाल वयात ०५ वर्षे शिथिलता राहील.

श्रेणी प्रमाणे जागांची संख्या

अजा अज इ. मा .वआ. दु .घखुला एकूण
६८४३१०३०१४९३००
(NIACL Recruitment 2024)

वेतन श्रेणी

निवड झालेल्या उमेदवारांना नोकरीत रुजू झाल्यानंतर सुरुवातीला ₹३७०००/- प्रती महिना अदा केले जातील.

अर्ज शुल्क(NIACL Recruitment 2024)

  • अजा/अज आणि अपंग प्रवर्गातील उमेदवारांना ₹१००/- अर्ज शुल्क भरावा लागेल.
  • वरील प्रवर्गाव्यतिरिक्त इतर सर्व प्रवर्गातील उमेदवारांना ₹ ८५०/- अर्ज शुल्क भरावा लागेल.
  • वरील व्यवहारादरम्यान बँक शुल्क तसेच इतर शुल्क हे उमेदवारांना भरावे लागेल.
  • अर्ज शुल्क हे ना परतावा आहे.
  • अर्ज शुल्क हे ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे.

अर्ज कसा करावा (NIACL Recruitment 2024)

वरील पदासाठी उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने विहित केलेल्या कालावधीमध्ये अधिकृत संकेतस्थळावरून जमा करायचा आहे.

अर्ज करण्याचे टप्पे (NIACL Recruitment 2024)

१)नोंदणी करून घेणे-
  • उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन रिक्रुटमेंट सेक्शनमधील ‘Apply Online’ टॅब वर क्लिक करणे.
  • ‘Click here for New Registration’ वर क्लिक करणे.
  • उमेदवाराने विचारलेली सर्व माहिती भरणे जस की नाव, कॉन्टॅक्ट डिटेल्स, इ मेल आयडी, मोबाईल नंबर.
  • Provisional Registration Number आणि पासवर्ड स्क्रीन वर दिसेल तो नमूद करून घेणे.
  • सेव्ह आणि नेक्स्ट बटन वर क्लिक करून भरलेली माहिती बरोबर असल्याची खात्री करून Final Submit बटन वर क्लिक करणे.
  • Final Submit बटन वर क्लिक केल्यानंतर अर्जात कोणत्याही प्रकारचा बदल करता येणार नाही.
२)अर्ज शुल्क भरणे.
  • अर्ज भरून झाल्यानंतर पेमेंट टॅब वर क्लिक करणे.
  • उमेदवारांनी डेबिट कार्ड/क्रेडिट कार्ड/इंटरनेट बँकिंग/IMPS/कॅश कार्ड /मोबाईल वॉलेट यांच्या साहाय्याने अर्ज शुल्क भरून घेणे.
  • अर्ज भरण्याची प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर इ- रिसिट तयार होईल ती उमेदवारांनी डाऊनलोड करून घ्यावी.
३)फोटो,सही,डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा,हस्तलिखित घोषणा अपलोड करणे.
  • फोटो अपलोड-
    • फोटो हा अलीकडील काळातील पासपोर्ट आकाराचा रंगीत असावा.
    • कॅमेराकडे सरळ पाहत असलेला असावा.
    • फोटो काढताना फ्लॅश लाईट चालू ठेवली असेल तर फोटोत लाल डोळे नसल्याची खात्री करून घेणे.
    • फोटो काढताना चष्मा घातलेला असेल तर डोळे स्पष्ट दिसत आहेत आणि प्रतिबिंब दिसत नाही याची खात्री करून घेणे.
    • टोपी, गॉगल घातलेला फोटो नसावा.
    • फोटो हा २००x २३० पिक्सल चा असावा.
    • फोटोची साईझ ५० के बी पेक्षा जास्त नसावी.
  • सही,डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा,हस्तलिखित घोषणा अपलोड
    • उमेदवारांनी पांढऱ्या कागदावर काळ्या शाईच्या पेनने सही करणे.
    • उमेदवारांनी पांढऱ्या कागदावर काळ्या शाईने पांढऱ्या कागदावर डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा उमटवने.
    • उमेदवारांनी पांढऱ्या कागदावर काळ्या शाईच्या पेनने हस्तलिखित घोषणा इंग्रजी मध्ये लिहणे.
    • सही,डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा,हस्तलिखित घोषणा ही उमेदवाराने स्वतः करायचे आहे दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीने नाही.
    • उमेदवारांची ही सही कॉल लेटर आणि जिथे जिथे गरजेची आहे तिथे वापरली जाईल.
    • परीक्षेच्या वेळी केलेली सही जर कॉल लेटर वर असलेल्या सही शी जुळली नाही तर उमेदवारास अपात्र ठरवले जाईल.
    • स्कॅन करताना वरील कागदपत्रांची साइज १४०x ६० पिक्सल असावी.
    • अपलोड करताना सही आणि अंगठ्याचा ठास्याची साईज १० ते २० kb असावी तसेच हस्तलिखित घोषणा ची साईज २०ते ५० kb इतकी असावी.
    • सही आणि हस्तलिखित घोषणा कॅपिटल लेटर मध्ये असेल तर ग्राह्य धरली जाणार नाही.

कागदपत्रे स्कॅन करण्याच्या सूचना(NIACL Recruitment 2024)

  • प्रथम स्कॅनर रेसोल्युशन कमीत कमी २०० dpi वर आणि कलर तो ट्रू कलर वर सेट करणे.
  • स्कॅन केलेले कागदपत्र क्रॉप करून घेणे.
  • स्कॅन केलेली कागदपत्रे ही jpg/jpeg फॉरमॅट मध्ये असावी.
  • स्कॅन केलेल्या कागदपत्र नमूद केलेल्या साइझ मध्ये असावीत नसतील तर एरर मेसेज स्क्रीन वर दिसेल.
  • अर्ज भरताना उमेदवारांना सही,डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा,हस्तलिखित घोषणा अपलोड करण्यासाठी लिंक मिळेल.

कागदपत्र अपलोड करण्याच्या स्टेप्स (NIACL Recruitment 2024)

  • सही,डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा,हस्तलिखित घोषणा अपलोड करण्यासाठी लिंक मिळेल.
  • त्या लिंक वर क्लिक करणे.
  • लिंक वर क्लिक करून स्कॅन केलेले सही,डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा,हस्तलिखित घोषणा असलेली सेव्ह केली फाईल निवडून ओपन किंवा अपलोड बटन वर क्लिक करणे.
  • जोपर्यंत उमेदवार हा सही,डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा,हस्तलिखित घोषणा अपलोड करत नाही तोपर्यंत अर्ज भरण्याची प्रक्रिया अपूर्ण राहील.

निवड प्रक्रिया (NIACL Recruitment 2024)

  • निवड प्रक्रिया ही खाली नमूद केलेल्या पद्धतीने होईल.
    • १)ऑनलाईन परीक्षा पूर्व
    • २)ऑनलाईन परीक्षा मुख्य
    • ३)प्रादेशिक भाषा परीक्षा

ऑनलाईन पूर्व परीक्षा

अ.क्र विषय प्रश्नांची संख्या गुण कालावधी परीक्षेची भाषा
इंग्रजी भाषा ३०३०२० मिनिटेइंग्रजी
रिझनिंग ३५३५२० मिनिटे इंग्रजी/हिंदी
संख्यात्मक क्षमता ३५३५२० मिनिटे इंग्रजी/हिंदी
एकूण १००१००६० मिनिटे
NIACL Recruitment 2024
  • वरील प्रत्येक परीक्षेमध्ये कंपनीने ठरवलेल्या किमान गुणांवर मुख्य परीक्षेसाठी उमेदवार पात्र ठरतील.
  • राज्य स्तरीय तसेच श्रेणी स्तरीय येणाऱ्या अर्जांवर पुढील परीक्षेसाठी पात्र उमेदवारांची गुणवत्ता यादी बनवली जाईल.

मुख्य परीक्षा (NIACL Recruitment 2024)

अ. क्र विषय प्रश्नांची संख्या गुण परीक्षेतील भाषा
इंग्रजी भाषा४०५०इंग्रजी
रिझनिंग४०५०इंग्रजी/हिंदी
संख्यात्मक क्षमता ४०५०इंग्रजी/हिंदी
संगणक ज्ञान ४०५०इंग्रजी/हिंदी
सामान्य जागरूकता ४०५०इंग्रजी/हिंदी
एकूण २००२५०
NIACL Recruitment 2024
  • या परीक्षेत उमेदवारांना कंपनीने ठरवलेले किमान गुण मिळवावे लागतील.
  • मुख्य परीक्षेतून पात्र ठरलेल्या उमेदवारांना प्रादेशिक भाषा परीक्षेसाठी बोलावले जाईल. या परीक्षा पात्रतेच्या निकषावर असेल यात कोणत्याही पद्धतीचे वेगळे गुण मिळणार नाहीत.
  • अंतिम निवड ही मुख्य परीक्षा आणि प्रादेशिक भाषा परीक्षेतील गुणवत्तेवर होईल.
  • दोन पेक्षा अधिक उमेदवारांना समान गुण असतील तर वयाने मोठा असणाऱ्या उमेदवारास प्राधान्य दिले जाईल.
  • वरील दोन्ही परीक्षेमध्ये प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी उमेदवार १/४ नकारात्मक गुण मिळतील.
  • मुख्य परीक्षा आणि प्रादेशिक भाषा यात मिळालेल्या गुणांच्या उतरत्या क्रमाने गुणवत्ता यादी अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध होईल.

प्रदेशिक भाषा परीक्षेच्या वेळी उमेदवारांनी सादर करण्याची कागदपत्रे

१)प्रादेशिक भाषा परीक्षेसाठी मिळालेले कॉल लेटर २)ऑनलाईन अर्जाची प्रत ३)जन्म तारखेचा पुरावा ४)फोटो ओळखपत्र मूळ आणि प्रत ५) सर्व शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र आणि गुणपत्र ६)जात प्रमाणपत्र ७)नॉन क्रिमी लेयर प्रमाणपत्र ८) अपंग असल्याचा पुरावा ९) आर्थिक दुर्बल घटक असल्याचा पुरावा १०)माजी सैनिक असल्याचा पुरावा ११)सरकारी/निमसरकारी संस्थेत काम करत असल्यास “ना हरकत प्रमाणपत्र”१२) अनुभवाचे प्रमाणपत्र (असेल तर) १३)इतर अर्हतेशी संबंधित कागदपत्र

महत्वाच्या सूचना (NIACL Recruitment 2024)

  • अर्ज करताना उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • रजिस्टर करताना उमेदवारांनी जो ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर दिला असेल तो भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वैध असणे गरजेचे आहे.
  • भरती बाबतचे सर्व निर्णय हे कंपनी कडे राखून असतील. याबाबतचे कंपनीने घेतलेले सर्व निर्णय हे अंतिम असतील.
  • कोणत्याही टप्प्यावर भरती रद्द करण्याचा निर्णय हा कंपनीने राखून ठेवला आहे.

महत्वाच्या तारखा (NIACL Recruitment 2024)

अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख -०१/०२/२०२४

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख -१५/०२/२०२४

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

जाहिरातीसाठी – इथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा

नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून फॉलो किंवा जॉईन करा

व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

इंस्टाग्राम पेज फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा

Article

एज्युकेशन कन्सल्टंट इंडिया लिमिटेड (EdCIL) अंतर्गत विविध पदांसाठी भरती

भारत डायनॅमिक्स लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी ३६१ जागांवर भरती

NTPC Limited मध्ये सहाय्यक कार्यकारी (ऑपरेशन) पदासाठी २२३ जागांवर भरती

अकोला जिल्हा मध्यवर्ती बँक मध्ये कनिष्ठ लिपिक पदासाठी १०० जागांवर भरती

(NDA) राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी,पुणे विविध पदांसाठी १९८ जागांवर भरती