(NABARD Assistant Manager Bharti 2025) NABARD मध्ये विविध पदांसाठी ९१ जागांवर भरती

राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक म्हणजेच NABARD मध्ये विविध विभागातील Assistant Manager पदासाठी ९१ जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. इच्छुक पात्र उमेदवारांनी NABARD Assistant Manger Bharti 2025 साठी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने ०८/११/२०२५ ते ३०/११२०२५ या दरम्यान जमा करायचे आहेत. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

NABARD Assistant Manager Bharti 2025

जाहिरात क्र – 05/Grade A /2025-26

रिक्त पदांचा तपशील (NABARD Assistant Manager Bharti 2025)

अ क्रपदाचे नावद संख्या
०१ Assistant Manager (Grade A) (RDBS) ८५
०२ Assitant Manager (Grade A) (Legal Service) ०२
०३ Assistant Manager (Grade A) (Protocol & Security Service) ०४
एकूण९१

शैक्षणिक अर्हता (NABARD Assistant Manager Bharti 2025)

  • पद क्र १
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची संबंधित विषयातील पदवी/MBA/BBA/BMS परीक्षा किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण असावा.
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची संबंधित शाखेतील BE/B.Tech पदवी परीक्षा किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण असावा.
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची CA परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • अजा/अज/अपंग उमेदवार किमान ५५% गुणांसह उत्तीर्ण असावा.
  • पद क्र २
    • उमेदवार हे मान्यताप्राप्त विद्यापीठाची LLB पदवी परीक्षा किमान ६०% गुणांसह किंवा LLM पदवी परीक्षा ६५% गुणांसह उत्तीर्ण असावा.
  • पद क्र 3
    • उमेदवार हे लष्कर,नौदल किंवा हवाई दलात कमिशन्ड अधिकारी पदावर किमान ५ वर्ष सेवा दिलेले असावे.

वयोमर्यादा (NABARD Assitant Manager Bharti 2025)

  • पद क्र १ आणि २
    • ०१/११/२०२५ रोजी उमेदवाराचे किमान वय २१ वर्ष आणि कमाल वय ३० वर्ष असावे.
  • पद क्र 3
    • ०१/११/२०२५ रोजी उमेदवाराचे किमान वय २५ वर्ष आणि कमाल वय ४० वर्ष असावे.
  • अजा/आज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ५ वर्ष शिथिलता राहील.
  • इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ०३ वर्ष शिथिलता राहील.
  • अपंग उमेदवार – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात १० वर्ष ,इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात १३ वर्ष आणि अजा/आज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात १५ वर्ष शिथिलता राहील.

वेतन श्रेणी

उमेदवारांना नोकरीत रुजू झाल्यानंतर रु ४४५००/- ते ८९१५०/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.

अर्ज कसा करावा

  • इच्छुक पात्र उमेदवारांनी NABARD Assistant manager Bharti 2025 साठीचे त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने ०८/११/२०२५ ते ३०/११/२०२५ या दरम्यान जमा करायचे आहेत.
  • उमेदवारांनी अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत. इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • अर्ज करण्यासाठीच्या स्टेप्स
    • रजिस्ट्रेशन – उमेदवारांनी प्रथम स्वतःला अधिकृत संकेतस्थळावर रजिस्टर करून घ्यावे.
    • अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरून घ्यावी.
    • आवश्यक ती सर्व कागदपत्र अपलोड करून घ्यावी.
    • अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करून घ्यावे.

अर्ज शुल्क

  • NABARD Assitant Manager Bharti 2025 साठी खुल्या /इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांनी अर्ज शुल्क रु ८५०/- ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
  • अजा/अज/अपंग उमेदवारांनी रु १५०/- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
  • अर्ज शुल्क हे न परतावा असून एकदा भरलेले अर्ज शुल्क कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.
  • अर्ज शुल्क हे उमेदवारांनी क्रेडीट कार्ड/डेबिट कार्ड/इंटरनेट बँकिंग यांच्या सहाय्याने फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत. इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज शुल्क स्वीकारले जाणार नाहीत.

निवड प्रक्रिया

  • उमेदवारांची निवड ही पुढे नमूद केलेल्या 4 स्टेप्स मध्ये होईल
    • Preliminary Examination Structure for Grade A (RDBS/Legal) – प्रश्न २०० गुण २०० वेळ १२० मिनिटे
    • Mains Exam Structure for Grade A – संबंधित विषयाप्रमाणे – गुण २०० वेळ – २१० मिनिट
    • Psychometric Test (Mandatory) – MCQ Based – ९० मिनिटे
    • Interview Grade A (RDBS /Legal) – ५० गुण

कागदपत्र (NABARD Assistant Manager Bharti 2025)

  • फोटो आणि सही
  • डाव्या हातचा अंगठा
  • जन्म तारखेचा पुरावा
  • सर्व शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र आणि गुणपत्र
  • जात प्रमाणपत्र
  • अपंग असल्याचा पुरावा

महत्वाच्या सूचना

  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी NABARD Assistant Manager Bharti 2025 साठीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • रजिस्टर करताना दिलेले इमेल आयडी आणि माबील नंबर भरती प्रक्रिया सुरु असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
  • चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरवले जाईल.
  • अर्धवट भरलेले अर्ज रद्द करण्यात येतील.
  • जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे/वाढवणे तसेच भरती प्रक्रिया रद्द करणे /पुढे ढकलणे /स्थगित करणे याबाबतचे सर्व निर्णय व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
  • भरती करण्याबाबत कोणत्याही प्रकारे दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरवले जाईल.

महत्वाच्या तारखा

अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख – ०८/११/२०२५

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – ३०/११/२०२५

नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून जॉईन किंवा फॉलो करा


Articles

केंद्रीय गुप्तचर खात्यात Multi Tasking Staff पदासाठी ३६२ जागांवर भरती

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top