(Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana)मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना -युवकांना आता मिळणार उद्योजाकांसोबत व्यवहारिक प्रशिक्षण

आजचा काळ हा भरपूर स्पर्धेचा काळ असून नोकरी सरकारी असो किंवा खाजगी नोकरी मिळवण्यासाठी युवकांना व्यावहारिक कौशल्य असणे भरपूर आवश्यक आहे. म्हणूनच महाराष्ट्र सरकारने युवकांच्या विकासासाठी आधुनिक प्रकारचे प्रशिक्षण,रोजगारातील तयारी करून घेण्यासाठी तसेच युवकांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच व्यवहारिक आणि व्यावसायिक ज्ञान देण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र सरकारने युवकांच्या विकासासाठी Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana या योजनेची सुरुवात केली आहे.

ही योजना हि १८ वर्ष ते ३५ वर्ष या वयोगटातील तरुणांना शासकीय कार्यालय,उपक्रम,कंपन्या,उद्योग,आणि विविध संस्थांमध्ये ६ ते ११ महिने विविध उद्योजाकांसोबत व्यावहारिक प्रशिक्षण देते. या प्रशिक्षणा दरम्यान तरुणांना प्रती महिना स्टायपंड मिळेल.

पुढे आपण पाहणार आहोत ही योजना काय आहे,प्रशिक्षण कसे मिळते,पात्रता काय असेल , लागणारी कागदपत्रे,मानधन ,अर्ज कसा करावा याबाबत सविस्तर माहिती. त्यामुळे ही माहिती पूर्ण वाचा.

Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana

Table of Contents

Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana काय आहे?

महाराष्ट्र सरकार अंतर्गत युवकांना कौशल्याच्या आधारावर प्रशिक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही सुरु करण्यात आली आहे. या योजने अंतर्गत युवकांना पुढीलप्रमाणे सुविधा मिळतील,

  • सरकारी संस्था किंवा खासगी कंपनी मध्ये व्यवसायिक प्रशिक्षण
  • प्रती महिना स्टायपंड
  • व्यवसायिक कामाचे प्रत्यक्ष अनुभव
  • रोजगार किंवा स्वयं रोजगाराची संधी

मुख्य उद्दिष्ठ

  • युवकांना फक्त पदवी किंवा १२ वी इतकेच शिक्षण पुरेसे नसून व्यवसायिक प्रशिक्षणासह कौशल्य संपन्न करणे.
  • युवकांना प्रशिक्षणाबरोबर अनुभव आणि मानधन देऊन त्यांच्या करिअरची दिशा मजबूत करणे.
  • व्यवसायिक प्रशिक्षणामुळे भविष्यात युवकांनानोकरी मिळण्यातील अडथळे कमी करणे.
  • युवकांना आत्मनिर्भर बनवणे.

Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana या योजनेचे फायदे

  • युवकांना ६ ते ११ महिने कालावधीसाठी सरकारी कार्यालय,खाजगी कंपनी , शासकीय संस्था या सारख्या ठिकाणी व्यवसायिक प्रशिक्षण देणे.
  • या प्रशिक्षण दरम्यान युवकांना दरमहा स्टायपंड च्या रूपाने मानधन दिले जाईल.
  • प्रशिक्षण कालावधी पूर्ण झाल्यानंतर प्रशिक्षण पूर्ण झाल्याचे अनुभवाचे प्रमाणपत्र मिळेल.
  • रोजगार विषयक व्यवसायिक प्रशिक्षण मिळाल्यामुळे युवकांना पुढे मुलाखतीमध्ये चांगली कामगिरी होऊन रोजगार योग्यता वाढेल.
  • करिअरच्या विकासासाठी तज्ञांकडून करिअर बाबत मार्गदर्शन केले जाईल.

स्टायपंड किती मिळेल ?

  • उमेदवारांना त्यांच्या शिक्षणाप्रमाणे प्रती महिना स्टायपंड मिळेल.
  • स्टायपेंड हा उमेदवारांच्या बँक खात्यात थेट जमा होतील.

Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana पात्रता

  • उमेदवाराचे किमान वय १८ वर्ष आणि कमाल वय ३५ वर्ष असावे.
  • उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
  • १२ वी पास,डिप्लोमा,पदवीधर, पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण
  • बेरोजगार /अर्ध बेरोजगार युवक

कागदपत्रे

  • आधारकार्ड
  • पॅन कार्ड
  • रहिवाशी दाखला
  • शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र
  • बँक पासबुक
  • फोटो
  • मोबाईल नंबर
  • ईमेल आयडी

कोणकोणत्या क्षेत्रात प्रशिक्षण मिळते ?

  • प्रशासकीय कामे – संगणक ऑपरेशन,MIS रिपोर्ट सारखी कामे
  • डिजिटल स्कील – MS -CIT,Data Entry ,Computer Operating प्रशिक्षण
  • उद्योग आणि Manufacturing – Machine Operating,Electric Work, टेक्निशियन इत्यादी प्रशिक्षण
  • कौशल्य विकास प्रशिक्षण – मोटार मेकॅनिक, ब्युटी पार्लर, प्लंबिंग, टेलरिंग यासारख्या क्षेत्रात प्रशिक्षण
  • सेवा – रिटेल, हॉस्पिटॅलिटी, पर्यटन यासारख्या क्षेत्रातील प्रशिक्षण दिले जाते.

अर्ज कसा करावा ? (Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana)

  • उमेदवारांनी प्रथम अधिकृत संकेतस्थळावर जाऊन नाव ,आधार कार्ड क्रमांक, मोबाईल नंबर,इमेल आयडी याच्या साहाय्याने रजिस्टर करून घ्यावे.
  • त्यानंतर स्क्रीन वर दिसत असलेल्या यादीतून तुमच्या आवडीप्रमाणे प्रशिक्षण कोर्स किंवा कार्यक्रम निवडा.
  • आवश्यक ती सर्व कागदपत्रे अपलोड करा.
  • अर्ज सबमिट करा. तुम्ही जर या प्रशिक्षण योजनेस पात्र असाल तर तुम्हाला तसे कळवले जाईल.

Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana या योजनेच्या प्रशिक्षणानंतर की काय मिळेल?

  • प्रशिक्षण पूर्ण झाल्याबाबतचे प्रमाणपत्र
  • अनुभव
  • कौशल्य
  • रोजगाराची संधी
  • अनेकदा प्रशिक्षण देणारी संस्थाच नोकरीची ऑफर देते.
  • मुलाखतीची तयारी होते

या योजनेचे फायदे

  • फक्त पुस्तकी धन्य नाही तर प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळेल.
  • व्यासायिक प्रशिक्षणामुळे मुलाखतीत पास होण्याची शक्यता वाढेल.

योजनेमध्ये निवड होण्यासाठी काही महत्वाचे

  • प्रोफाइल मधील माहिती अचूक भरा.
  • आवश्यक ती सर्व कागदपत्रे अपलोड करून घ्यावी
  • आवडीचे क्षेत्र निवडा
  • नियमित पोर्टल तपासा

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही महाराष्ट्र राज्यातील तरुणांना रोजगार मिळवण्यासाठी मोठी संधी देते. ही योजना पुस्तकी ज्ञानापेक्षा व्यावहारिक ज्ञानाच्या सहाय्याने कौशल्याला प्राधान्य देते. या योजनेच्या साहाय्याने तरुणांना कौशल्य, अनुभव, प्रमाणपत्र,मानधन आणि नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यास मदत करते. तरुणांसाठी ही योजना म्हणजे त्यांच्या करिअरची नवीन सुरुवात आहे.

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

अर्जकरण्यासाठी – इथे क्लिक करा

योजनेच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा

व्हॉट्स अँप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा


FAQ

ही योजना कोणासाठी आहे ?

१८ ते ३५ वर्ष वयोगटातील बेरोजगार तरुणांसाठी.

स्टायपंड किती मिळतो?

स्टायपेंड हा उमेदवारांना त्यांच्या शिक्षणाच्या आधारे मिळेल.

नोकरीची हमी वाढते का?

१००% नोकरी मिळेलच असे नाही पण संधी वाढते.

महिला अर्ज करू शकतात का?

हो, काही कोर्स हे महिलांसाठी आहेत.

ही योजना मोफत आहे का?

हो, कोणत्याही प्रकारचे शुल्क भरावे लागणार नाही.



Articles

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (MGNREGA)- ग्रामीण बेरोजगारांना वर्षाला १०० दिवस रोजगाराची हमी

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना – महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलासा देणारी कर्जमाफी योजना

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना – रुग्णांना मिळणार आता 2 लाखांपर्यंत मोफत उपचार

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळात (CBSE)विविध पदांसाठी 124 जागांवर भरती

DRDO मध्ये विविध पदांसाठी ७६४ जागांवर भरती

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top