(MGNREGA Yojana) महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (MGNREGA)- ग्रामीण बेरोजगारांना वर्षाला १०० दिवस रोजगाराची हमी

ग्रामीण भागातील युवकांना रोजगाराची संधी कमी असते. पावसावर अवलंबून असणारी शेती तसेच हवामानातील बदल यांमुळे होणारे नुकसान त्यामुळे शेतमजुरी,हंगामी कामे यामुळे ग्रामीण भागातील युवकांना वर्षभर नियमित उत्पन्न कमावता येत नाही. या परिस्थितीशी सामना करण्यासाठी ग्रामीण भागातील गरीब युवकांना किमान १०० दिवस रोजगार उपलब्ध करून त्यांची आर्थिक स्तर सुधारावा आणि ग्रामीण भागातील विकासात त्यांचा सहभाग वाढवा या हेतूने सरकारने MGNREGA Yojana म्हणजेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना सुरु केली आहे. हि योजना MGNREGA या नावाने प्रसिद्ध आहे.

MGNREGA Yojana मुळे ग्रामीण भागातील कित्येक बेरोजगार तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध होत आहे. ह्या योजनेच्या सहाय्याने ग्रामीण भागातील विकासाच्या कामांनाही एकप्रकारे गती मिळत आहे.

या योजानेची प्रमुख उद्देश ,लाभार्थी कोण असू शकतात,हि योजना नेमकी काय आहे,योजनेची पात्रता काय ,अर्ज कसा करावा अश्या आणि भरपूर प्रश्नाची उत्तरे ही तुम्हाला या लेखात मिळतील.त्यामुळे ही माहिती संपूर्ण वाचा.

MGNREGA Yojana

Table of Contents

MGNREGA Yojana काय आहे?

MGNREGA म्हणजेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ही ग्रामीण भागातील कुटुंबाना वर्षातील किमान १०० दिवस रोजगाराची हमी देणारी योजना आहे. या योजनेचे प्रमुख उद्दिस्थ हे ग्रामीण भागातील कुटुंबाना रोजगाराची संधी उपलब्ध करून त्यांना उत्पन्नाचे अजून एक पर्याय देणारी आहे.

या योजनेची प्रमुख उद्दिष्ठ

  • शेतीतील हंगामी कामांवर अवलंबून असणाऱ्या मजुरांना कामच्या संधी उपलब्ध करून ग्रामीण भागातील बेरोजगारी कमी करणे.
  • ग्रामीण भागातील कुटुंबाना किमान वेतनाचे रोजगार प्रदान करून त्यांचे उत्पन्नात वाढ करणे.
  • ग्रामीण भागातील रस्ते,जलसंधारण,शेतीसाठी लागणारी साधने यांची उभारणी करत करत ग्रामीण भागातील विकासावर भर देणे.
  • कामगारांना वेळेवर बँक खात्यात वेतन जमा करून त्यांच्या कामाचा सन्मान करणे.
  • या योजनेंतर्गत महिलानाही समान संधी उपलब्ध करून महिला सबलीकरणावर भर देणे.

MGNREGA Yojana लाभ

  • प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला वर्षातून किमान १०० दिवस रोजगार उपलब्ध होतो.
  • नोंदणीकृत मजुरांना त्यांचे वेतन हे थेट बँकेच्या खात्यात जमा होते.
  • कामगारांनी या योजनेअंतर्गत एकदा जॉब कार्ड काढले कि ते सर्व प्रौढ सदस्यांनाही लागू होते.
  • या योजनेंतर्गत एकूण कामगारांपैकी किमान ३३% महिला असणे आवश्यक आहे. त्यामुळे महिला सबलीकरणासाठी प्रोत्साहन.
  • या योजनेंतर्गत ग्रामीण विकासातील पर्यावरणपूरक अश्या प्रकल्पामध्ये सुरक्षित आणि उत्पादक कामामध्ये सहभाग.
  • या योजने अंतर्गत अपंग आणि वृद्ध उमेदवारांना त्यांच्या शारीरिक क्षमतेनुसार हलकी कामे दिली जातात.

पात्रता नेमकी काय आहे ?

  • या योजनेंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवार हा ग्रामीण भागातील रहिवाशी असणे आवश्यक आहे.
  • उमेदवाराचे वय १८ वर्षापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.
  • उमेदवाराकडे योजनेत सहभागी होण्यासाठीचे जॉब कार्ड असणे आवश्यक आहे.
  • या योजनेत सहभागी होण्यासाठी कोणत्याही प्रकारची किमान शैक्षणिक अर्हता असणार नाही.

जॉब कार्ड काय असते?

  • जॉब कार्ड हे दुसरे तिसरे काही नसून MGNREGA Yojana साठी उमेदवाराचे रोजगार ओळखपत्र असेल.
  • जॉब कार्ड मध्ये असणारी माहिती
    • कुटुंबातील सदस्याची नावे
    • फोटो
    • पत्ता
    • कामाचे रेकॉर्ड
    • मिळालेले दिवस आणि वेतन
  • जॉब कार्ड असल्याशिवाय तुम्हाला रोजगार मिळणार नाही.

जॉब कार्ड मिळवण्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया

  • उमेदवारांनी प्रथम त्यांच्या ग्रामपंचायतीमधील ग्रामसेवक किंवा रोजगार सेवकाकडे मिळणाऱ्या अर्जात सर्व माहिती भरून घ्यावी.
  • आवश्यक ती सर्व कागदपत्र सदर करावीत.
  • आवश्यक त्या कागदपत्रासाहित अर्ज सदर केल्यानंतर ग्राम पंचायत तुमच्या अर्जाची छाननी करून तुमची माहिती योग्य असल्याची तपासणी करते.
  • तुम्ही सदर केलेली सर्व माहिती आणि कागदपत्रे योग्य असतील तर तुम्हाला १५ दिवसाच्या आत जॉब कार्ड मिळते.

कागदपत्रे

  • MGNREGA Yojana पात्र असण्यासाठी लागणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे,
    • आधार कार्ड
    • रेशन कार्ड
    • ग्रामपंचायत प्रमाणपत्र
    • बँक खाते
    • फोटो
    • मोबाईल नंबर

MGNREGA Yojana अंतर्गत मिळणारी कामे

  • MGNREGA अंतर्गत मिळणारी काही महात्वाचिऊ कामे पुढीलप्रमाणे,
    • जल संधारण संबंधीची कामे
      • नाल्याचे खोलीकरण
      • तलावाच्या दुरुस्तीचे काम
      • जल साठ वाढवण्यासाठीची कामे
    • ग्रामीण भागातील रस्त्याच्या बांधकामाचे काम
      • ग्रामपंचायतीच्या परिसरातील मार्ग
      • कच्चे रस्ते
    • वृक्षारोपण
      • लावलेल्या रोपांची निगा राखणे
      • नवनवीन झाडे लावणे
      • बागबगीच्या देखभाल
    • शेततळी आणि बंधाऱ्याची पाणी साठवण्याची क्षमता वाढवण्यासाठीची कामे.
    • शेती समतोलीकर,सिंचन वाहिन्या आणि कंपोस्ट या सारख्या शेतकऱ्यांना मदतीसाठीची कामे करणे
    • पाणी पुरवठा तसेच गावातील सार्वजनिक बांधकाम यासारख्या गावाच्या विकासाच्या दृष्टीने असलेली कामे

योजनेंतर्गत मिळणारे वेतन

  • या योजनेसाठी वेतन हे राज्यानुसार निश्चित केले जाते आणि दर महिन्याला यामध्ये वाढ होते.
  • सरासरी साधारण रु ३००/- ते रु ३५०/- प्रती दिन या प्रमाणे वेतन हे उमेदवाराच्या नमूद केलेल्या बँक खात्यात थेट ७ ते १५ दिवसाच्या आत जमा होते.

उमेदवारांनी काम कसे मिळवावे ?

  • उमेदवारांनी ग्रामपंचायतीमध्ये कामाची मागणी करावी .
  • नियमानुसार तुम्ही कामाबद्दल विचारणा केल्यानंतर १५ दिवसाच्या आत काम देणे अनिवार्य आहे.
  • उमेदवाराची कामावर हजेरीची नोंद केली जाते.
  • काम पूर्ण झाल्यानंतर उमेदवाराच्या बँक खात्यात वेतन जमा केले जाते.

कामाची आणि वेतनाची स्थिती कशी तपासावी

उमेदवारांनी MGNREGA अधिकृत वेबसाईट वर भेट देऊन जॉब कार्ड स्टेट्स /कामाचे दिवस /वेतन जम झाले का ? आणि कोणत्या प्रकल्पावर काम मिळाले याबाबतची माहिती उमेदवार जॉब कार्ड क्रमांक/गावाचे नाव आणि जिल्हा यांच्या सहाय्याने तपासू शकतात.

MGNREGA Yojana सामाजिक आणि आर्थिक फायदे

  • शेतीचा हंगाम नसतानाही ग्रामीण भागात मजुरांना कामाच्या हमीमुळे नियमित उत्पन्न मिळेल.
  • महिलांना आर्थिक स्वावलंबाची संधी मिळेल.
  • वृक्षारोपण ,जलसंधारण ,शेत तळी यांमुळे पर्यावरण सुधारण्याच्या कार्यास मदत.
  • रस्ते,पाण्याची कामे,नळी बांधकाम अश्या कामांमुळे गावांच्या विकासास चालना मिळेल.
  • गावामध्येच रोजगाराची संधी मिळाल्यामुळे कामासाठी गावाबाहेर जाण्याची गरज लागणार नाही. त्यामुळे स्थलांतर कमी होईल.

या योजनेतील पारदर्शकता

  • पैसे हे उमेदवारांना थेट बँक खात्यात मिळतील
  • हजेरीची डिजिटल नोंद करता येते.
  • ग्राम सभानिर्णय

निष्कर्ष

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ही ग्रामीण भागातील नागरिकांसाठी रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने सुरु केलेली एक शक्तिशाली योजना आहे. ही योजना गरीब आणि बेरोजगार कुटुंबाच्या आयुष्यात आर्थिक स्थैर्य निर्माण करते तसेच महिलांना रोजगार देऊन समान संधी उपलब्ध करते.गावांच्या विकासात ही योजना महत्वाची भूमिका पार पाडते.

तुम्हाला ही या योजनेचा फायदा घ्यायचा आहे का तर आजच तुमच्या ग्रामपंचायतीला भेट द्या आणि जॉब कार्ड काढून घ्या.

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

योजनेच्या अश्याच नाव नवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा

Whats App ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

आमच्या इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा


FAQ

MGNREGA मध्ये कोण काम करू शकतो?

१८ वर्ष वरील कोणताही ग्रामीण नागरिक या योजनेंतर्गत काम करू शकतो.

नोकरीचे कोणते कौशल्य आवश्यक आहे का?

नाही. सर्व कामे हि श्रम आधारित आणि साधी असतात.

वेतन रोखीने मिळते का?

नाही. वेतन हे फक्त बँक खात्यामध्ये DBT होते.

१०० दिवसांपेक्षा जास्त काम मिळू शकते का?

ग्राम पंचायतीच्या मंजुरीनुसार काही काही वेळा मिळू शकते.

काम मिळण्यासाठी जॉब कार्ड असणे आवश्यक आहे का?

होय. जॉब कार्ड असणे अनिवार्य आहे.

Articles

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना – महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलासा देणारी कर्जमाफी योजना

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना – रुग्णांना मिळणार आता 2 लाखांपर्यंत मोफत उपचार

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळात (CBSE)विविध पदांसाठी 124 जागांवर भरती

 State Bank of India मध्ये Specialist Officer पदासाठी कंत्राटी तत्वावर 996 जागांवर

Indian Oil Coprporation Limited मध्ये अप्रेंटीस पदासाठी २७५६ जागांवर भरती

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top