Lek Ladaki Yojana मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी सरकारची योजना

महाराष्ट्र सरकारच्या महिला व बालविकास विभागाच्या अंतर्गत Lek Ladaki Yojana आहे.मुलींचा जन्मदर,शिक्षणाबाबत प्रोत्साहन देण्यासाठी १/०८/२०१७ रोजी माझी भाग्यश्री योजना लागू करण्यात आली होती.या योजनेस मिळणारा अपुरा प्रतिसाद यामुळे महाराष्ट्र सरकारने मुलींच्या सक्षमीकरणासाठी Lek Ladaki Yojana महाराष्ट्र सरकारने ०१/०४/२०२३ रोजी पासून सुरू केलेली आहे. Lek Ladaki Yojana ही मुलींच्या सक्षमीकरणासाठी सुरू करण्यात आलेली आहे. पिवळ्या आणि केशरी रेशनकार्ड धारक कुटुंबातील मुलींच्या जन्मानंतर टप्प्याटप्प्यामध्ये अनुदान देण्यात येऊन लाभार्थी मुलीला १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर ₹७५,०००/- रोख देण्यात येतील.Lek ladaki Yojana बद्दल सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

Lek Ladaki Yojana

Table of Contents

Lek Ladaki Yojana लाभ

अ.क्रलाभाचा टप्पा आर्थिक लाभ
जन्मानंतर ₹५,०००/-
इयत्ता पहिली मध्ये प्रवेश ₹६,०००/-
इयत्ता सहावी प्रवेश ₹७,०००/-
इयत्ता अकरावी प्रवेश ₹८,०००/-
१८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर ₹७५,०००/-
एकूण ₹१,०१,०००/-

Lek Ladaki Yojana मुख्य उद्दिष्ट

  • Lek Ladaki Yojana मुख्य उद्दिष्ट खालीलप्रमाणे,
    • मुलींच्या जन्मदर वाढवणे
    • मुलींच्या शिक्षणास चालना मिळावी
    • मुलींच्या मृत्यूचे दर कमी करणे तसेच बालविवाह थांबवणे
    • कुपोषण कमी करणे
    • शाळाबाह्य मुलींचे प्रमाण शून्य वर आणण्यास प्रोत्साहन

Lek Ladaki Yojana पात्र असण्यासाठी अटी आणि शर्ती

  • या योजनेस पात्र असण्यासाठी कुटुंबाचे रेशन कार्ड हे पिवळ्या किंवा केसरी रंगाचे असावे.
  • मुलीचा जन्म हा ०१/०४/२०२३ नंतर झालेला असावे. तसेच ही योजना कुटुंबातील एक किंवा दोन मुलींना लागू राहील. एक मुलगा आणि एक मुलगी असल्यास मुलीला लागू राहील.
  • पहिल्या अपत्याच्या तिसऱ्या हप्त्यासाठी आणि दुसऱ्या अपत्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज करताना माता पित्याने कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करून घेतलेली असणे तसेच त्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
  • दुसऱ्या प्रसूती च्या वेळी जुळी अपत्ये जन्माला आल्यास एक मुलगी किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ घेता येईल पण त्यानंतर माता /पित्याने कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करणे आवश्यक असेल.
  • ज्या पालकांना ०१/०४ /२०२३ पूर्वी एक मुलगी /मुलगा आहे आणि त्यानंतर जन्माला आलेल्या दुसऱ्या मुलीस किंवा जुळ्या मुलींना ही योजना अनुज्ञेय राहील. पण माता पित्याने कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केलेली असावी.
  • अर्ज करणारे कुटुंबीय हे महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असावेत.
  • त्यांचे बँक खाते ही महाराष्ट्र राज्यात असावे.
  • अर्ज करणाऱ्या कुटुंबियांचे वार्षिक उत्पन्न हे १ लाख रुपयांपेक्षा कमी असावे.

Lek Ladaki Yojana साठी आवश्यक असणारी कागदपत्र

  • जन्माचा दाखला
  • तहसीलदार किंवा सक्षम अधिकाऱ्याने जारी केलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला
  • लाभार्थी आधार कार्ड
  • पालकाचे आधार कार्ड
  • बँकेच्या पासबुकची पहिल्या पानाची प्रत
  • रेशन कार्ड (पिवळे किंवा केशरी)
  • मतदान ओळखपत्र (शेवटच्या लाभासाठी १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर मुलीचे मतदार यादीत नाव असल्याचा दाखला)
  • लाभाचा हप्ता मिळताना संबंधित टप्प्यावर शिक्षण घेत असल्याचा संबंधित शाळेचा दाखला
  • कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र
  • अंतिम लाभासाठी मुलीचा विवाह झालेला नसावा. (अविवाहित असल्याचा स्वयं घोषणापत्र)

Lek ladaki Yojana अर्ज करण्यासाठीच्या स्टेप्स

  • प्रथम ०१/०४/२०२३ नंतर जन्माला आलेल्या मुलींची नोंदणी ग्रामीण किंवा नागरी क्षेत्रातील संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेत नोंदणी करून घ्यावी.
  • त्या क्षेत्रातील अंगणवाडी सेविकेकडे विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह जमा करावा.
  • हे अर्ज भरण्यास अंगणवाडी सेविकेची मदत घ्यावी.
  • अर्ज हे अंगणवाडी पर्यवेक्षिका /मुख्यसेविका यांच्याकडे जमा करावेत.

अर्ज मिळण्याचे ठिकाण

  • ग्रामीण व नागरी बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय
  • जिल्हा कार्यक्रम अधिकारी कार्यालय
  • जिल्हा परिषद कार्यालय
  • जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय
  • विभागीय उप आयुक्त महिला बाल विकास कार्यालय

Lek Ladaki Yojana लाभ घेण्याची कार्यपद्धत

  • अंगणवाडी पर्यवेक्षिका/मुख्य सेविका यांनी अर्जाची आणि प्रमाणपत्रांची छाननी आणि तपासणी करायची आहे.
  • प्रत्येक महिन्याला हे सर्व अर्ज नागरी व ग्रामीण क्षेत्रातील बाल विकास प्रकल्प अधिकारी आणि संस्थेतील अनाथ मुलींच्या बाबतीत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी एकत्रित यादी जिल्हा कार्यक्रम अधिकारी ,जिल्हा परिषद यांना आणि मुंबई शहर व मुंबई उपनगर क्षेत्रातील अर्ज नोडल अधिकारी यांना मान्यतेसाठी सादर करावीत.
  • अनाथ मुलींना लाभ मिळण्यासाठी अर्जासोबत महिला व बाल विकास विभागाच्या सक्षम अधिकाऱ्याने सही केलेले अनाथ असल्याचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक
  • बाल विकास प्रकल्प अधिकारी आणि जिल्हा कार्यक्रम अधिकारी जिल्हा परिषद हे जास्त संख्येने अर्ज प्राप्त झालेल्या एखाद्या क्षेत्राची तपासणी करून त्यांची खात्री झाल्यानंतर लाभार्थी यादीला मान्यता दिली जाईल.
  • अर्ज अर्धवट भरलेला असेल किंवा अपूर्ण कागदपत्र जोडलेली असल्यास पर्यवेक्षिका किंवा बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी अर्ज मिळाल्यापासून १५ दिवसाच्या आत पूर्तता करण्याबाबत लेखी कळवावे. अशा अर्जदा रांनी एक महिन्याच्या आत कागदपत्रांच पूर्ततेसह अर्ज दाखल करावा.
  • काही कारणास्तव वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जदार अर्ज दाखल करू शकले नाहीत तर त्यास १० दिवसाची वाढीव मुदत देण्यात येईल.

योजनेच्या विविध जबाबदाऱ्या

फॉर्मची ऑनलाईन पोर्टल वर नोंदणी करणे
  • अंगणवाडी सेविका /पर्यवेक्षक यांनी Lek Ladaki Yojana लाभ देण्याकरिता लाभार्थ्यांचे ऑनलाईन नोंदणी करायची आहे.
  • लाभार्थ्यांचे आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि अर्ज पोर्टल वर अपलोड करून घ्यावे.
  • Lek Ladaki Yojana लाभार्थ्यांचे पात्रता पडताळणी ही अंगणवाडी सेविका,पर्यवेक्षिका ,मुख्य सेविका यांनी करायच आहेत.
  • पडताळणी झाल्यानंतर अर्ज हे सक्षम अधिकारी यांच्याकडे सादर करावेत.
  • सक्षम अधिकाऱ्यांनी या कामकाजावर नियंत्रण ठेवायचे आहे.

अंगणवाडी सेविका /पर्यवेक्षिका /सक्षम अधिकारी यांच्या जबाबदाऱ्या

  • अंगणवाडी सेविका/पर्यवेक्षिका-
    • लाभार्थ्यांचे अर्ज स्वीकृती करणे
    • अर्जांची तपासणी करणे
    • अर्ज पोर्टल वर अपलोड करणे.
  • संबंधित बालविकास अधिकारी (ग्रामीण )
    • ग्रामीण भागातील अर्ज पडताळणी करून सक्षम अधिकाऱ्याकडे मान्यता मिळवण्यासाठी सादर करणे.
  • संबंधित बाल विकास अधिकारी (नागरी)
    • अर्ज पडताळणी करून सक्षम अधिकाऱ्याकडे मान्यता मिळवण्यासाठी सादर करणे.
  • संबंधित जिल्हा कार्यक्रम अधिकारी/नोडल अधिकारी
    • अंतिम मंजुरी देणे.
  • राज्य कक्ष प्रमुख
    • पोर्टल ची संपूर्ण जबाबदारी ,संचालन /अद्ययावत करणे.

महत्वाच्या सूचना

  • Lek Ladaki Yojana संनियंत्रीत आणि आढावा घेण्याकरिता तसेच मार्गदर्शन करण्यासाठी राज्य स्तरावर सुकाणू समिती गठित करण्यात आली आहे. वर्षातून एकदा या समितीची बैठक घेण्यात येईल.
  • मुलींच्या शिक्षणास चालना देण्यासाठी Lek Ladaki Yojana असून इयत्ता १० वी पर्यंत लाभार्थी ने शिक्षण पूर्ण करणे अनिवार्य आहे.
  • लाभार्थी ने चुकीची किंवा खोटी माहिती दिल्यास लाभ मिळणार नाही.

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

जाहिरात – इथे क्लिक करा

योजनांच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा.

व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा


Articles

राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टीलायजर लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी ७४ जागांवर भरती

सेंट्रल रोड रिसर्च इन्स्टिट्यूट मध्ये विविध पदांसाठी २०९ जागांवर भरती

नवी मुंबई महानगरपालिके मध्ये विविध पदांसाठी ६२० जागांवर भरती

हिंदुस्थान पेट्रोलियम मध्ये विविध पदांसाठी ६३ जागांवर भरती