(IAF Agniveer Vayu Bharti)INDIAN AIR FORCE मध्ये अग्निविर वायू अंतर्गत अविवाहित गुणवंत खेळाडूंना नोकरीची संधी

(IAF Agniveer Vayu Bharti) Indian Air Force मध्ये अग्णिवीर वायू अंतर्गत अविवाहित गुणवंत खेळाडू भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. इच्छुक उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने २२/०२/२०२४ पूर्वी अधिकृत संकेतस्थळावरून जमा करायचा आहे. ही भरती ही ४ वर्ष कालावधीसाठी असेल. सविस्तर माहिती खालील प्रमाणे,

IAF Agniveer Vayu Bharti

जाहिरात क्र – AGNIVEERVAYU (SPORTS)INTAKE 01/2024

रिक्त पदांचा तपशील (IAF Agniveer Vayu Bharti)

अ. क्र पदाचे नाव पद संख्या
अग्नीवीर वायू (खेळाडू)पद संख्या अजून जाहीर झालेली नाही.
IAF Agniveer Vayu Bharti

शैक्षणिक अर्हता (IAF Agniveer Vayu Bharti)

  • अ) सायन्स विषय
    • उमेदवार हा केंद्र किंवा राज्य शासन मान्यताप्राप्त बोर्ड मधून गणित,फिजिक्स,इंग्लिश या विषयासह एकत्रित किमान ५०% आणि इंग्लिश मध्ये ५०% गुणांसह इंटर मिडीएट/12 वी /समतुल्य परीक्षा उत्तीर्ण असावा. किंवा
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड चा तीन वर्ष कालावधीचा मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/ऑटोमोबाईल/कॉम्प्युटर सायन्स/इन्स्ट्रूमेटेमेशन टेक्नोलॉजी/इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या शाखेतील डिप्लोमा परीक्षा किमान ५०% गुणांसह तसेच डिप्लोमा मध्ये इंग्लिश मध्ये ५०% गुणांसह उत्तीर्ण असावा.(डिप्लोमा मध्ये इंग्लिश विषय नसेल तर इंटरमिडीएट/१० वी मध्ये इंग्लिश विषयात ५०% पेक्षा जास्त गुण मिळालेले असावेत.
    • केंद्र किंवा राज्य सरकार मान्यताप्राप्त बोर्ड चा फिजिक्स आणि गणित या अपारंपारिक विषयांसह २ वर्ष कालावधीचा व्यवसायिक अभ्यासक्रम एकत्र किमान ५० % आणि व्यवसायिक अभ्यासक्रमात इंग्लिश या विषयात किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण असावा. (व्यवसायिक अभ्यासक्रमात जर इंग्लिश विषय नसेल तर १० वी किंवा इंटरमिडीएट मधील इंग्लिश विषयात ५०% पेक्षा जास्त गुण असावेत.
  • ब) सायन्स विषय व्यतिरिक्त
    • उमेदवार हा केंद्र किंवा राज्य शासन मान्यताप्राप्त बोर्ड मधून कोणत्याही विषयासह एकत्रित किमान ५०% आणि इंग्लिश मध्ये ५०% गुणांसह इंटर मिडीएट/12 वी /समतुल्य परीक्षा उत्तीर्ण असावा. किंवा
    • केंद्र किंवा राज्य सरकार मान्यताप्राप्त बोर्ड चा २ वर्ष कालावधीचा व्यवसायिक अभ्यासक्रम एकत्र किमान ५० % आणि व्यवसायिक अभ्यासक्रमात इंग्लिश या विषयात किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण असावा. (व्यवसायिक अभ्यासक्रमात जर इंग्लिश विषय नसेल तर १० वी किंवा इंटरमिडीएट मधील इंग्लिश विषयात ५०% पेक्षा जास्त गुण असावेत.
  • सायन्स विषयासह पात्र असणारे उमेदवार हे सायन्स विषय व्यतिरिक्त असणाऱ्या जागांसाठी पात्र असतील.

वयोमर्यादा (IAF Agniveer Vayu Bharti)

  • वरील पदासाठी उमेदवाराचे कमाल वय २१ वर्षे असावे.
  • उमेदवाराचा जन्म हा २७/०६/२००३ ते २७/१२/२००६ दरम्यान झालेला असावा.

वेतन श्रेणी (IAF Agniveer Vayu Bharti)

  • निवड झालेल्या उमेदवारांना खाली नमूद केल्याप्रमाणे प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
    • प्रथम वर्षासाठी निवड झालेल्या उमेदवारास ₹३०,०००/- प्रती महिना इतके वेतन अदा केले जाईल.
    • द्वितीय वर्षासाठी निवड झालेल्या उमेदवारास ₹३३,०००/- प्रती महिना इतके वेतन अदा केले जाईल.
    • तृतीय वर्षासाठी निवड झालेल्या उमेदवारास ₹३६,५००/- प्रती महिना इतके वेतन अदा केले जाईल.
    • चतुर्थ वर्षासाठी निवड झालेल्या उमेदवारास ₹४०,०००/- प्रती महिना इतके वेतन अडा केले जाईल.
  • चार वर्षानंतर नोकरीतून बाहेर पडताना उमेदवारास ₹१०.०४/- लाख सेवा निधी म्हणून मिळतील.

अर्ज कसा कराल (IAF Agniveer Vayu Bharti)

  • इच्छुक उमेदवारांनी त्यांचे अर्ज अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने १३/०२/२०२३ ते २२/०२/२०२३ या दरम्यान भरायचे आहेत.
  • ऑनलाईन रजिस्ट्रेशन करताना उमेदवारांनी पुढे नमूद केलेली कागदपत्र स्कॅन करावीत.
    • १० वी किंवा मॅट्रिक उत्तीर्ण प्रमाणपत्र
    • १२ वी किंवा समतुल्य गुणपत्र आणि प्रमाणपत्र किंवा
    • ३ वर्ष कालावधीच्या डिप्लोमा परीक्षेचा शेवटच्या वर्षाचे गुणपत्र आणि १० वी किंवा मॅट्रिक उत्तीर्ण प्रमाणपत्र (जर इंग्लिश हा विषय व्यवसायिक अभ्यासक्रमात नसेल तर ) किंवा
    • २ वर्ष कालावधीचा व्यवसायिक अभ्यासक्रम, इंग्लिश ,फिजिक्स,गणित गुणपत्र आणि १० वी किंवा मॅट्रिक उत्तीर्ण प्रमाणपत्र (जर इंग्लिश हा विषय व्यवसायिक अभ्यासक्रमात नसेल तर )
    • पासपोर्ट आकाराचा अलीकडील काळातील रंगीत फोटो-
      • फोटो हा तीन महिन्यांपूर्वीचा नसावा.
      • फोटो ची साईज १० kb ते ५० kb दरम्यान असावा.
      • फोटो काढताना उमेदवारांनी हातात काळी पाटी जिच्यावर पांढऱ्या खडूने नाव आणि फोटो काढत असलेला दिवसाची तारीख लिहिलेली आहे ती हातात धारावी.
    • डाव्या हाताच्या अंगठ्याच्या ठश्याचा फोटो
      • फोटो ची साईज १० kb ते ५० kb दरम्यान असावा.
    • सहीचा फोटो
      • फोटो ची साईज १० kb ते ५० kb दरम्यान असावा.
    • खेळातील प्रमाणपत्र
      • उमेदवारांनी जास्तीत जास्त ५ प्रमाणपत्र अपलोड करायचे आहेत.

परीक्षा शुल्क (IAF Agniveer Vayu Bharti)

  • उमेदवारांना ₹ १००/- (अधिक टॅक्स) इतके परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे.
  • परीक्षा शुल्क हे ना परतावा आहे.
  • परीक्षा शुल्क हे डेबिट कार्ड /क्रेडिट कार्ड /इंटरनेट बँकिंग यांच्या साहाय्याने ऑनलाईन पद्धतीने भरता येईल.

क्रीडा विषय (IAF Agniveer Vayu Bharti)

अ. क्र क्रीडा प्रकार विशिष्ठ घटना/स्थिती/श्रेणी
एथलेटिक्स अ) डीकॅथलोन ब)लांब उडी क)११० मीटर अडथळा शर्यत ड)उंच उडी इ) १००मी/२०० मी ई)भाला फेक क)३००० मीटर स्टीपल चेस ख) पोल वॉल्ट ग)५०००मी/१०००० मी घ) हॅमर थ्रो
बास्केट बॉल अ)सेंटर ब)पॉवर फॉरवर्ड क)पॉइंट गार्ड
बॉक्सिंग अ)९२+ कि.ग्रॅ ब)६३.५ -६७ कि.ग्रॅ क)५१-५४ कि.ग्रॅ ड)४६-४८ कि.ग्रॅ इ)६०-६३.५ कि.ग्रॅ
क्रिकेट अ) मिडीयम फास्ट बॉलर ब) टॉप ऑर्डर फलंदाज क)अष्टपैलू
सायकल पोलोअ) डिफेंडर ब) फॉरवर्ड
सायकलिंगवैयक्तिक प्रयत्न
फुटबॉलअ) डिफेंडर ब) फॉरवर्ड
गोल्फ
जिमनॅस्टिकसहा उपकरणांसाठी अष्टपैलू
१०हँडबॉल अ)लेफ्ट विंग ब)पिवोट क)गोल किपर
११हॉकी अ) डिफेंडर ब) फॉरवर्ड
१२कब्बडी अ)राईट रेडर ब)लेफ्ट रेडर क)अष्टपैलू ड)लेफ्ट डिफेंडर इ)राईट डिफेंडर
१३लॉन टेनिस सिंगल/डबल
१४स्क्वॉश सिंगल
१५स्विमिंग/डायव्हींग अ) हाय बोर्ड डायवर ब) बटर फ्लाय १००मी आणि२०० मी क)IM २०० मी आणि ४०० मी ड) बॅक स्ट्रोक ५०मी, १००मी,२०० मी इ) फ्री स्टाईल ५०मी,१०० मी,२०० मी, ४००मी आणि १५०० मी
१६वोलीबॉलअ) सेटर ब) ब्लॉकर क) युनिव्हर्सल ड) अटॅकर
१७ वॉटर पोलो अ) गोल कीपर ब) अष्टपैलू क) सेंटर फॉरवर्ड ड) फुल बॅक
१८वेट लिफ्टींग अ)५५ कि.ग्रॅ ब)६१ कि.ग्रॅ क)७३ कि.ग्रॅ ड)८१कि.ग्रॅ इ)९६ कि.ग्रॅ ई)१०९कि.ग्रॅ क)१०९+कि.ग्रॅ
१९कुस्ती *ग्रीको रोमन वजन -अ)६३कि.ग्रॅ ब)७७ कि.ग्रॅ क)८७ कि.ग्रॅ
*फ्री स्टाईल -अ)७० कि.ग्रॅ ब)७४ कि.ग्रॅ क)१२५ कि.ग्रॅ
२०Wushu *Sanda -अ)५६कि.ग्रॅ ब)६० कि.ग्रॅ क)६५ कि.ग्रॅ ड)८०कि.ग्रॅ
*Taolu

वैवाहिक स्थिती (IAF Agniveer Vayu Bharti)

  • वरील पदासाठी फक्त अविवाहित उमेदवारांनाच अर्ज करायचे आहेत.
  • नोकरीच्या ४ वर्षाच्या काळातही लग्न करता येणार नाही.
  • नोकरीच्या दरम्यान ज्या उमेदवाराने लग्न केले तर त्यास तत्काळ अपात्र केले जाईल.

खेळातील उपलब्धि (IAF Agniveer Vayu Bharti)

  • उमेदवाराने आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक कमिटी मान्यताप्राप्त कनिष्ठ /वरिष्ठ आंतरराष्ट्रीय स्पर्धेत देशाचे प्रतिनिधीत्व केलेले असावे.
  • उमेदवाराने वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत/ अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेत/SAI स्पर्धेत राज्य किंवा केंद्र शासित प्रदेशाचे प्रतिनिधीत्व करत कनिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत नमूद केलेल्या खेळात किमान ५ वा क्रमांक मिळवला असावा.
  • सांघिक खेळात उमेदवाराने अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेत/SAI स्पर्धेत कनिष्ठ /वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत नमूद केलेल्या खेळात राज्याचे प्रतिनिधीत्व केलेले असावे.
  • क्रिकेट खेळासाठी – उमेदवाराने भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेत/BCCI च्या स्पर्धेत -१९ वर्षाखालील,२३ वर्षाखालील,रणजी चषक, दुलीप चषक , देवधर चषक स्पर्धेत खेळलेले असावे.

वैद्यकीय स्टँडर्ड (Agniveer Vayu Bharti)

  • उंची – उमेदवाराची किमान उंची १५२.५ से.मी असावी.
  • वजन – उंची आणि वयाच्या प्रमाणात असावी.
  • छाती – ७७ से .मी विस्तार किमान ५ से.मी
  • ऐकणे – सामान्य
  • दंत – निरोगी हिरड्या,दातांचा चांगला संच, किमान १४ दंत बिंदू असावेत.
  • व्हिज्युअल स्टँडर्ड
    • दृश्य तीक्ष्णता -६/१२ प्रत्येक डोळ्यासाठी, सुधरण्या योग्य ६/६ प्रत्येक डोळ्यासाठी
    • Maximum limits of Refractive Error– Hyprermetropia -+2.0 D, Myopia -1D Including+/-0.5 D Astigmatism
    • Colour Vision-CP -II
  • कॉर्नियल शस्त्रक्रिया झालेली नसावी.
  • जनरल हेल्थ – उमेदवार हा एअर फोर्स साठी नोकरी करण्यासाठी शारीरिक दृष्ट्या तसेच मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त असावा.

अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थाचे सेवन (IAF Agniveer Vayu Bharti)

  • अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थाचे सेवन करणारे उमेदवार हे वरील पदासाठी अपात्र असतील.
  • निवड झाल्यानंतर उमेदवार हा असे अमली पदार्थ बाळगताना /साठवताना/वितरित करताना /सेवन करताना आढळल्यास अश्या उमेदरास सेवेतून बडतर्फ करण्यात येईल तसेच त्याच्यावर शिस्त भांगाची कारवाई केली जाईल.

बॉडी टॅटू ( IAF Agniveer Vayu Bharti)

  • उमेदवाराच्या शरीरावर कायमस्वरूपी टॅटू नसावा.

शीख उमेदवार (IAF Agniveer Vayu Bharti)

ज्या धर्माच्या नियमाप्रमाणे केस कापायचे किंवा दाढी काढण्यास बंदी असेल त्यांना केस वाढवणे किंवा दाढी वाढवणे याची परवानगी असेल.

निवड प्रक्रिया (IAF Agniveer Vayu Bharti)

  • अर्हता पडताळणी(IAF Agniveer Vayu Bharti)
    • उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्र सादर करणे आवश्यक आहे.
      • वर नमूद केलेल्या सर्व कागदपत्रांसह
      • आधार कार्ड
      • उमेदवार हा आर्मी , नेव्ही किंवा सरकारी कार्यालयातून डिस्चार्ज असेल तर डिस्चार्ज प्रमाणपत्र
      • बॉडी टॅटू प्रमाणपत्र
      • संमती पत्र (जर उमेदवार १८ वर्षापेक्षा कमी असेल तर त्याच्या पालकांनी सही केलेले)
      • पासपोर्ट आकाराचा रंगीत फोटो
  • फिजीकल फिटनेस टेस्ट (IAF Agniveer Vayu Bharti)
    • धावणे -७ मिनिटात १.६ की.मी
    • पुश अप – १ मिनिटात १० पुश अप (धावणे झाल्यानंतर १० मिनिटा नंतर )
    • उठाबशा -१ मिनिटात १० उठाबशा(पुश अप झाल्यानंतर २ मिनिटा नंतर )
    • स्कवॉट्स -१ मिनिटात १० स्कवॉट्स(उठाबशा झाल्यानंतर २ मिनिटा नंतर )
    • उमेदवारांनी स्पोर्ट्स शुज आणि शॉर्ट्स किंवा ट्रॅक सूट घेऊन येणे.
  • क्रीडा कौशल्य चाचणी
    • फिजीकल फिटनेस टेस्ट मधून पात्र उमेदवारांची क्रीडा कौशल्य चाचणी होईल.
    • उमेदवारांनी ज्या खेळासहित अर्ज केला असेल तो खेळ ठरवलेल्या ठिकाणी खेळवला जाईल.
  • वैद्यकीय तपासणी
    • पात्र उमेदवारांना वैद्यकीय तपासणीसाठी बोलावले जाईल.
    • IAF मेडिकल स्टँडर्ड नुसार एअर फोर्सची मेडिकल टीम उमेदवारांची वैद्यकीय तपासणी करेल.

महत्वाच्या सूचना (IAF Agniveer Vayu Bharti)

  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा .
  • रजिस्टर करताना जो ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर दिला असेल तो भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
  • चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास अश्या उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्धवट भरलेला अर्ज ग्राह्य धरलं जाणार नाही.
  • एका उमेदवाराने एकच अर्ज करायचा आहे.
  • जाहिरातीत नमूद केलेल्या पदाची भरती रद्द करण्याचे अधिकार हे IAF ने राखून ठेवलेले आहेत.

महत्वाच्या तारखा (IAF Agniveer Vayu Bharti)

अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख-१३/०२/२०२४

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – २२/०२/२०२४

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

जाहिरातीसाठी – इथे क्लिक करा

नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून जॉईन किंवा फॉलो करा

व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा

Article

National Institute Of Naturopathy विविध पदांसाठी भरती

Punjab National Bank मध्ये विविध पदासाठी १०२५ जागांवर भरती

प्रगत संगणन विकास केंद्र (C-DAC)मध्ये ३२५ जागांवर भरती

सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये वैद्यकीय अधिकारी पदासाठी १७२९ जागांवर भरती

न्यू इंडिया एशोरेंस सहाय्यक पदासाठी ३०० जागांवर भरती