ECGC Limited मध्ये प्रोबेशनरी ऑफिसर पदासाठी ३० जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे, इच्छुक पात्र उमेदवारांनी ECGC Probationary Officer bharti 2025 साठी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून ११/११/२०२५ ते ०२/१२/२०२५ या दरम्यान जमा करायचे आहेत. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

जाहिरात क्र –
Table of Contents
रिक्त पदांचा तपशील (ECGC Probationary Officer Bharti 2025)
| अ क्र | पदाचे नाव | पद संख्या |
| ०१ | प्रोबेशनरी ऑफिसर (सामान्य) | २८ |
| ०२ | प्रोबेशनरी ऑफिसर (राजभाषा) | ०२ |
| एकूण | ३० |
शैक्षणिक अर्हता (ECGC Probationary Officer Bharti 2025)
- पद क्र १
- उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण असावा.
- पद क्र २
- उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची हिंदी किंवा हिंदी ट्रान्सलेशन विषयातून पदव्युत्तर पदवी ज्यात पदवी परीक्षेत ज्यामध्ये इंग्रजी विषयासह उत्तीर्ण असावा. किंवा
- उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठ्ची इंग्रजी विषयातून पदव्युत्तर पदवी ज्यामध्ये पदवी परीक्षेत हिंदी विषयासह उत्तीर्ण असावा. किंवा
- उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही विषयासह पदव्युत्तर पदवी परीक्षा तसेच पदवी परीक्षा हिंदी किंवा इंग्रजी विषयासह उत्तीर्ण असावा. किंवा
- उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची दोन्ही विषयासह पद्व्त्युत्तर पदवी इंग्रजी/हिंदी /हिंदी ट्रान्सलेशन विषयासह उत्तीर्ण असावा.
- वरील शैक्षणिक अर्हतेमध्ये उमेदवार हे किमान ६०% गुणांसह आणि अजा/अज प्रवर्गातील उमेदवार किमान ५५% गुणांसह उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा(ECGC Probationary Officer Bharti 2025)
- ०१/११/२०२५ रोजी उमेदवाराचे किमान वय २१ वर्ष आणि कमाल वय ३० वर्ष असावे.
- अजा/आज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ०५ वर्ष शिथिलता राहील.
- इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ०३ वर्ष शिथिलता राहील.
- अपंग उमेदवार -खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात १० वर्ष,इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात १३ वर्ष आणि अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात १५ वर्ष शिथिलता राहील.
वेतन श्रेणी
उमेदवारांना नोकरीत रुजू झाल्यानंतर रु ८८६३५/- ते रु १,६९,०२५/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
अर्ज कसा करावा
- इच्छुक पात्र उमेदवारांनी ECGC Probationary Officer Bharti 2025 साठी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून ११/११/२०२५ ते ०२/१२/२०२५ या दरम्यान जमा करायचे आहेत.
- अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत. इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.
- अर्ज करण्यासाठीच्या स्टेप्स –
- रजिस्ट्रेशन – उमेदवारांनी प्रथम स्वतःला अधिकृत संकेतस्थळावर रजिस्टर करून घ्यावे.
- अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरून घ्यावी.
- आवश्यक ती सर्व कागदपत्रे अपलोड करून घ्यावे.
- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करून घ्यावे.
अर्ज शुल्क
- इच्छुक पात्र ECGC Probationary Officer Bharti 2025 साठी उमेदवारांनी रु ९५०/- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करून घ्यावे.
- अजा/अज/अपंग उमेदवारांनी रु १७५/- इंटिमेशन शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करून घ्यावे.
- अर्ज शुल्क हे ना परतावा असून एकदा भरलेले अर्ज शुल्क कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.
- अर्ज शुल्क हे उमेदवारांनी क्रेडीट कार्ड /डेबिट कार्ड/इंटरनेट बँकिंग यांच्या सहाय्याने ऑनलाईन पद्धतीने जमा काक्रायचे आहेत.
निवड प्रक्रिया
- UCGC Probationary Officer bharti 2025 साठी उमेदवारांची निवड हि खालीलप्रमाणे होईल,
- ऑनलाईन परीक्षा – Objective (MCQ)
- पद क्र १
- तर्क शास्त्र – ५० प्रश्न ,५० गुण ,वेळ -४० मिनिटे
- इंग्रजी भाषा – ४० प्रश्न ,४० गुण ,वेळ ३० मिनिटे
- संगणक ज्ञान – २० प्रश्न ,२० गुण ,वेळ – १० मिनिटे
- जनरल अवेअरनेस – ४० प्रश्न ,४० गुण ,वेळ – २० मिनिटे
- Numarical Aptitude – ५० प्रश्न, ५० गुण ,वेळ – ४० मिनिटे
- एकूण २०० प्रश्न ,२०० गुण वेळ -१४० मिनिटे
- पद क्र २
- तर्क शक्ती – ४० गुण ,४० प्रश्न , वेळ ३० मिनिटे
- इंग्रजी भाषा – ४० गुण ,४० प्रश्न ,वेळ – २० मिनिटे
- जनरल अवेअरनेस – ३० गुण ,३० प्रश्न ,वेळ – १० मिनिटे
- Numeric Aptitude – ४० प्रश्न, ४० गुण , वेळ – ४० मिनिटे
- व्यवसायिक ज्ञान – ५० प्रश्न ,५० गुण , वेळ – ४० मिनिटे
- एकूण – २०० प्रश्न ,२०० गुण , वेळ -१४० मिनिटे
- पद क्र १
- ऑनलाईन परीक्षा – इंग्रजी विषय
- मुलाखत
- ऑनलाईन परीक्षा – Objective (MCQ)
कागदपत्र
- सर्व शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र आणि गुणपत्र
- जन्म तारखेचा पुरावा
- जात प्रमाणपत्र
- अपंग असल्याचा पुरावा
महत्वाच्या सूचना
- उमेदवारांनी ECGC Probationary Officer Bharti 2025 साठीचे अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा
- रजिस्टर करताना दिलेले इमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरु असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
- चुकीची किंवा खोटी माहीती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरवले जाईल.
- अर्धवट भरलेले अर्ज किंवा अर्ज शुल्क न भरलेले अर्ज रद्द करण्यात येतील.
- जाहिरातीत नामुस केलेल्या जगानाची संख्या कमी करणे/वाढवणे तसेच भरती प्रक्रिया रद्द करणे /पुढे ढकलणे /स्थगित करणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
- भरती करण्याबाबत कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरवले जाईल.
महत्वाच्या तारखा –
अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख – ११/११/२०२५
अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – ०२/१२/२०२५
अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा
नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून जॉईन किंवा फॉलो करा
Whats App ग्रुप लिंक – इथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा
आमच्या इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा
