(CSMSSY Shetkari Karjmukti Yojana) छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना – महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलासा देणारी कर्जमाफी योजना

आजकालच्या असमतोल ऋतू म्हणजेच दुष्काळ,अतिवृष्टी यांमुळे होणारे पिकांचे नुकसान तसेच बाजारभावात होणारे चढ उतार यामुळे शेती करणे हे शेतकऱ्यांसाठी दिवसेंदिवस अवघड होत चालले आहे. या असमतोल वातावरणामुळे होणाऱ्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी घेतलेले कर्ज फेडणे अशक्य होते. या अश्या परीस्थित या देशाच्या अन्नदात्याला आर्थिक दृष्ट्या दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने (CSMSSY Shetkari Karjmukti Yojana) छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना ही कर्जमाफी ची योजना २०१७ साली सुरु केली आहे.

या योजने बाबतची सविस्तर माहिती उद्दिष्ठये,पात्रता,कर्ज माफीची रक्कम,प्रक्रिया ,लागणारी कागदपत्र,नोंदणी पुढीलप्रमाणे,

CSMSSY Shetkari Karjmukti Yojana

Table of Contents

(CSMSSY Shetkari Karjamukti Yojana) छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना काय आहे?

ही महाराष्ट्र सरकार अंतर्गत अधिकृत शेतकरी कर्जमाफी योजना आहे.

या योजनेमध्ये पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांचे ठराविक कालावधीमधील पिक कर्ज सरकारी किंवा खाजगी बँकांचे माफ केले जातात.

  • CSMSSY Shetkari Karjmukti Yojana उद्देश
    • शेतीसाठी पुन्हा गुंतवणूक करण्यास सक्षम करणे
    • शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देणे
    • कर्जबाजारीपणामुळे होणाऱ्या अडचणी दूर करणे
    • कर्जामुळे शेतकऱ्यांना होणारा आर्थिक ताण कमी करणे

CSMSSY Shetkari Karjmukti Yojana अंतर्गत असणारे लाभ

  • शेतकऱ्यांचे असणारे जुने कर्ज माफ करून त्यांच्यावरील आर्थिक भर कमी करणे.
  • शेतकऱ्यांना वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये १.५ लाखांपर्यंत कर्जमाफी दिली जाईल.
  • बँकांना सरकार स्वतः रक्कम देत असल्याने बँकांवरील तन कमी होतो.
  • या योजनेसाठी कागदपत्रांची प्रक्रिया हि क्लिष्ट नसून सोपी आहे.
  • शेतकऱ्यांचे थकीत व्याज आणि दंड यामध्ये माफी मिळेल.

योजनेची प्रमुख उद्दिष्ठय

  • कर्जाने त्रस्त असणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देणे.
  • कर्जाचा ताण नसल्यामुळे शेतकरी उत्पादनावर जास्त लक्ष देऊ शकेल.
  • ग्रामीण अर्थव्यवस्थेला आधार मिळेल.

योजनेसाठी पात्र असण्यासाठी निकष

  • शेतकरी हा महाराष्ट्राचा रहिवाशी असावा.
  • शेतकऱ्यांनी घेतलेले २०१७ नंतरचे कर्ज कर्जमाफी साठी पात्र असेल.
  • शेतकरी हा २ हेक्टरपर्यंत जागेचा मालक असावा.
  • राष्ट्रीयकृत ,जिल्हा,सहकारी खाजगी किंवा सरकारी बँकांचे कर्ज माफ होईल.
  • शेतकऱ्याकडे आधारकार्ड आणि ७/१२ उतारा असणे आवश्यक आहे.

या योजनेच्या अंतर्गत कव्हर होणारे कर्ज प्रकार

  • या योजनेचा मुख्य हेतू पिक कर्ज माफ करणे हा आहे.
  • थकीत असलेल्या कर्जासाहित त्यावरील व्याज माफ केले जाते.
  • काही क्षेत्रांमध्ये शेतकरी समूह कर्ज हेही या योजनेंतर्गत माफ होते.

माफ न होणारे कर्ज

  • शेतकऱ्यांनी सोने तारण ठेवून घेतलेले कर्ज या योजनेंतर्गत माफ होणार नाही.
  • घर घेण्यासाठी किंवा वाहन खरेदीसाठी घेतलेले कर्ज माफ होणार नाही.
  • पाणलोट विकास किंवा Infrastructure Developement साठी घेतलेले कर्ज.

कर्ज माफी मिळण्याची प्रोसेस

  • शेतकऱ्यांनी प्रथम अधिकृत पोर्टल वर रजिस्ट्रेशन करून घ्यावे.
  • आवश्यक ती सर्व कागदपत्र अपलोड करून घ्यावी.
  • शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीची तसेच कागदपत्रांची पडताळणी ही बँक आणि जिल्हा प्रशासन करते.
  • पडताळणी नंतर पात्र शेतकऱ्यांच्या नावासमोर कर्ज माफ असे नमूद केल्याचे दिसते.
  • पात्र झाल्यानंतर शेतकऱ्याचे थकीत कर्जाची रक्कम कर्ज खात्यातून वजा होते.

कर्जमाफी मिळाल्याची स्थिती तपासावी कशी?

  • शेतकऱ्यांनी CSMSSY Shetkari Karjmukti Yojana पोर्टल वर जाहीर होणाऱ्या यादीत आपले नाव आहे का हे पडताळून पाहावे.
  • बँक स्टेटमेंट मध्ये कर्जाची स्थिती तपासावी .
  • शेतकऱ्यांची पडताळणी प्रलंबित असल्यास पोर्टल वर तसे नमूद केले असेल.

CSMSSY Shetkari Karjmukti Yojana फायदे

  • शेतकऱ्याला कर्जापासून मुक्ती मिळाल्यामुळे आर्थिक दिलासा मिळतो आणि तो त्याचे प्पैसे पुन्हा शेतीत गुंतवू शकतो.
  • कर्ज फेडण्याचे सततचे टेन्शन नसल्यामुळे शेतकरी त्याचे लक्ष उत्पादन वाढीवर देऊ शकेल.
  • शेतकरी हा शेतीत आधुनिक तंत्र तसेच नवीन पिके घेण्याचे तंत्र अवलंबण्यावर भर देऊ शकतील.

शेतकरी कर्जमाफीच्या या योजनेचे परिणाम

  • महाराष्ट्रातील अतिवृष्टी,दुष्काळ या त्रासामुळे नुकसानीत चाललेल्या लाखो शेतकऱ्यांना CSMSSY Shetkari Karjmafi Yojana अंतर्गत कर्जमाफी मिळाली.
  • या योजने अंतर्गत सरकार बँकांना मदत करत असल्यामुळे बँकांची NPA स्थितीत सुधारणा झाली.

योजनेसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे

  • CSMSSY Shetkari Karjmukti Yojana अर्ज करण्यासाठी खालील कागदपत्रांची आवश्यकता आहे.
    • आधार कार्ड
    • बँकेचे पासबुक
    • शेतीचा ७/१२ उतारा
    • जमिनीच्या मालकीचा पुरावा.
    • पिक कर्जाचा पुरावा
    • मोबाईल नंबर
    • मतदार ओळखपत्र
    • आवश्यकतेनुसार इतर कागदपत्रे

CSMSSY Shetkari Karjmukti Yojana पोर्टल ची वैशिष्ठ्य

  • उमेदवार ऑनलाईन पोर्टल वर आधार कार्डची तपासणी ऑनलाईन करता येईल.
  • ऑनलाईन पोर्टल च्या सहाय्याने नावाची ऑनलाईन पडताळणी करता येईल.
  • जिल्हानिहाय पात्र शेतकऱ्यांची यादी ऑनलाईन पोर्टलवर तपासता येईल.
  • बँक स्थितीचे अपडेट ऑनलाईन पोर्टल द्वारे करता येईल.
  • शेतकऱ्यांच्या काही तक्रारी असतील तर ते या पोर्टल वर नमूद करू शकतील.

कर्ज माफीसाठी अर्ज करण्यापूर्वी शेतकऱ्यांनी या गोष्टीवर लक्ष देणे गरजेचे आहेत

  • उमेदवारांनी अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरणे गरजेचे आहे.
  • आवश्यक ती सर्व कागदपत्र अचूक आणि योग्य अपलोड करावी.
  • उमेदवारांनी तात्पुरत्या अफवांवर विश्वास ठेऊ नये. माहिती साठी अधिकृत संकेतस्थळ किंवा सरकारी माहितीचा आधार घ्यावा.
  • उमेदवारांनी बँकेतील व्यवहार हे नियमित ठेवावे. या मुळे कर्जमाफीची प्रक्रिया जलद होते.

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना ही महारष्ट्रातील संकटग्रस्त शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात दिलासा देणारी योजना आहे. या योजनेच्या सहाय्याने महाराष्ट्रातील असंख्य शेतकरी कर्ज मुक्त झाले आहेत.

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

योजनेच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा

Whats App ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

आमच्या इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा

CSMSSY Shetkari Karjmukti Yojana बाबत विचारले जाणारे Common प्रश्न

CSMSSY Shetkari Karjmukti Yojana ही योजना सर्व शेतकऱ्यांसाठी आहे का?

नाही, ही योजना नमूद केलेल्या अर्हता पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांनाच लागू होते.

किती रक्कम माफ होते?

सरकारच्या नियमाप्रमाणे जास्तीत जास्त १.५ लाखांपर्यंत रक्कम माफ होते.

कोणते कर्ज लागू होते?

फक्त पिक कर्ज आणि कृषी संबंधित थकीत कर्ज

खाजगी बँकेचे कर्ज लागू आहे का?

होय, पण बँक सरकारशी जोडलेली असावी.

कर्ज माफीची स्थिती कशी तपासावी?

शेतकरी ऑनलाईन पोर्टल वर शेतकरी आपला आधार /मोबाईल नंबर टाकून तपासू शकतात.


Articles

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना – रुग्णांना मिळणार आता 2 लाखांपर्यंत मोफत उपचार

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळात (CBSE)विविध पदांसाठी 124 जागांवर भरती

महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकारी पदासाठी १४४० जागांवर भरती

State Bank of India मध्ये Specialist Officer पदासाठी कंत्राटी तत्वावर 996 जागांवर भरती

मंत्रिमंडळ सचिवालयामध्ये डेप्युटी फील्ड ऑफिसर पदासाठी २५० जागांवर भरती

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top