भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयांतर्गत असणाऱ्या केंद्रिय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) मध्ये विविध पदांसाठी 124 जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. इच्छुक पात्र उमेदवारांनी CBSE Bharti 2025 साठी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरुन 02/12/2025 ते 22/12/2025 या दरम्यान जमा करायचे आहेत. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

जाहिरात क्र CBSE/Rectt.Cell/14(88)/2025
Table of Contents
रिक्त पदांचा तपशील (CBSE Bharti 2025)
| अ.क्र | पदाचे नाव | पद संख्या |
| 01 | Assistant Secretary | 08 |
| 02 | Assistant Professor and Assistant Director (Academics) | 12 |
| 03 | Assistant Professor and Assistant Director (Training) | 08 |
| 04 | Assistant Professor and Assistant Director (Skill Education) | 07 |
| 05 | Accounts Officer | 02 |
| 06 | Superitendant | 27 |
| 07 | Junior Translation Officer | 09 |
| 08 | Junior Accountant | 16 |
| 09 | Junior Assistant | 35 |
| Total | 124 |
शैक्षणिक अर्हता (CBSE Bharti 2025)
- पद क्र 1-
- उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
- पद क्र 2-
- उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदव्युत्तर पदवी परीक्षा किमान 55% गुणांसह उत्तीर्ण असावा.
- पद क्र 3-
- उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदव्युत्तर पदवी परीक्षा किमान 55% गुणांसह उत्तीर्ण असावा.
- पद क्र 4-
- उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदव्युत्तर पदवी परीक्षा किमान 55% गुणांसह उत्तीर्ण असावा.
- पद क्र 5-
- उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची Economics/Commerce/Accounts /Finance/Business Studies/Cost Accounting शाखेची पदवी किंवा पदव्युत्तर पदवी किंवा MBA (Finance)CA/ICWA परीक्षा उत्तीर्ण असावा.
- पद क्र 6-
- उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
- उमेदवारास Computer /Computer Application चे ज्ञान असणे आवश्यक आहे.
- पद क्र 7- (CBSE Bharti 2025)
- पद क्र 8 –
- उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून Accountancy/Business Studies/Economics/Commerce/Entrepreneurship/Finance/Business Administration/Taxation /Cost Accountancy यापैकी एक विषयासह इयत्ता 12 वी परीक्षा उत्तीर्ण असावा. आणि
- टायपिंग गती – इंग्रजी -35 शब्द प्रति मिनिटे आणि हिंदी – 30 शब्द प्रति मिनिट
- पद क्र 9-
- उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून इयत्ता 12 वी परीक्षा उत्तीर्ण असावा.
- टायपिंग गती – इंग्रजी – 35 शब्द प्रति मिनिट आणि हिंदी – 30 शब्द प्रति मिनिट Computer वर
वयोमर्यादा
CBSE Bharti 2025 साठी 22/12/2025 रोजी उमेदवाराचे वय हे पुढे नमूद केल्याप्रमाणे असावे,
- पद क्र 1 आणि 5- उमेदवाराचे किमान वय 18 वर्ष आणि कमाल वय 35 वर्ष असावे.
- पद क्र 2,3,4,6 आणि 7- उमेदवाराचे किमान वय 18 वर्ष आणि कमाल वय 30 वर्ष असावे.
- पद क्र 8 आणि 9- उमेदवाराचे किमान वय 18 वर्ष आणि कमाल वय 27 वर्ष असावे.
- अजा/अजप्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात 5 वर्ष शिथिलता राहील.
- इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात 3 वर्ष शिथिलता राहील.
- अपंग उमेदवार – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात 10 वर्ष , इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात 13 वर्ष आणि अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात 15 वर्ष शिथिलता राहील.
- महिला उमेदवारांना कमाल वयात 10 वर्ष शिथिलता राहील.
- विभागीय उमेदवारांना कमाल वयाची मर्यादा असणार नाही.
वेतन श्रेणी
- पद क्र 1 ते 5 – उमेदवारांना नोकरीत रुजू झाल्यानंतर Pay Level – 10 प्रमाणे प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
- पद क्र 6 आणि 7- उमेदवारांना नोकरीत रुजू झाल्यानंतर Pay Level -6 प्रमाणे प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
- पद क्र 8 आणि 9- उमेदवारांना नोकरीत रुजू झाल्यानंतर Pay Level -2 प्रमाणे प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
अर्ज कसा करावा
- इच्छुक पात्र उमेदवारांनी CBSE Bharti 2025 साठी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून 02/12/2025 ते 22/12/2025 या दरम्यान जमा करायचे आहेत.
- अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.
- अर्ज करण्यासाठीच्या स्टेप्स
- रजिस्ट्रेशन- उमेदवारांनी प्रथम स्वतःला अधिकृत संकेतस्थळावर रजिस्टर करून घ्यावे.
- अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरावी.
- आवश्यक ती एरवी कागदपत्र अपलोड करून घ्यावी.
- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करून घ्यावे.
अर्ज शुल्क
- पद क्र 1 ते 5- खुल्या/ आर्थिक दुर्बल घटक/ इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांनी ₹1750/- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
- पद क्र 6 ते 9- खुल्या /आर्थिक दुर्बल घटक/इतर मागासवर्ग प्रवर्गातील उमेदवारांनी ₹1050/-अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
- अजा /अज/अपंग/माजी सैनिक /महिला उमेदवारांनी ₹250/- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
- CBSE Bharti 2025 साठी अर्ज शुल्क हे ना परतावा असून एकदा भरलेले अर्ज शुल्क हे कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.
- अर्ज शुल्क हे उमेदवारांनी क्रेडिट कार्ड/ डेबिट कार्ड/इंटरनेट बँकिंग यांच्या साहाय्याने ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज शुल्क स्वीकारले जाणार नाही.
महत्वाच्या सूचना
- अर्ज करण्यापूर्वी CBSE Bharti 2025 साठीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री उमेदवारांनी करून घ्यावी.
- रजिस्टर करताना दिलेला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
- चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्धवट भरलेला अर्ज तसेच अर्ज शुल्क न भरलेले अर्ज रद्द करण्यात येईल.
- जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे/वाढवणे तसेच भरतीप्रक्रिया रद्द करणे/ पुढे ढकलणे/ स्थगित करणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
- भरती करण्याबाबत कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
महत्वाच्या तारखा
अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख – 02/12/2025
अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख -22/12/2025
अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा
नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा
व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा
आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा
