(Cabinate Secretariat DFO Bharti 2025)मंत्रिमंडळ सचिवालयामध्ये डेप्युटी फील्ड ऑफिसर पदासाठी २५० जागांवर भरती

भारत सरकारच्या मंत्रिमंडळ सचिवालय (Cabinate Secretariat) मध्ये डेप्युटी फील्ड ऑफिसर (टेक्निकल) पदासाठी २५० जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. इच्छुक पात्र उमेदवारांनी Cabinate Secretariat DFO Bharti 2025 साठी त्यांचे अर्ज हे ऑफलाईन पद्धती नमूद केलेल्या पत्त्यावर १४/१२/२०२५ पूर्वी पोहोचतील असे पाठवायचे आहेत. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

जाहिरात क्र – ०२/२०२५

Table of Contents

रिक्त पदांचा तपशील (Cabinate Secretariat DFO Bharti 2025)

पदाचे नाव – डेप्युटी फील्ड ऑफिसर (टेक्निकल)

अ. क्रपदाचे नावपद संख्याविषय पेपरकोड
Computer Science/Information Technology १२४Computer Science & Information Technology CS
Data Science /Artificial intelligence १०Data Science and Artificial intelligence DA
Electronics and /Communication /Telecommunication ९५Electronics & Communication Engineering EC
Civil Engineering ०२Civil Engineering CE
Mechanical Engineering ०२Mechanical Engineering ME
Physics ०६Physics PH
Chemistry ०४Chemistry CY
Mathematics ०२MathematicsMA
Statistics ०२Statistics ST
१०Geology ०३Geology and Geophysics GG
एकूण२५०

शैक्षणिक अर्हता (Cabinate Secretariat DFO Bharti 2025)

  • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची संबंधी शाखेतून अभियांत्रिकी पदवी किंवा टेक्नॉलॉजी (BE/B.Tech) परीक्षा उत्तीर्ण असावा.
  • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची संबधित विषयासह विज्ञान शाखेची पदव्युत्तर पदवी (Masters) परीक्षा उत्तीर्ण असावा.
  • उमेदवार हा नमूद केलेल्या पेपर सह GATE 2023/2024/2025 परीक्षा पात्र असावे.

वयोमर्यादा

  • Cabinate Secretariat DFO Bharti 2025 साठी १४/१२/२०२५ रोजी उमेदवाराचे कमाल वय ३० वर्ष असावे.
  • अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ५ वर्ष शिथिलता राहील.
  • इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ३ वर्ष शिथिलता राहील.
  • माजी सैनिक आणि विभागीय उमेदवारांना नियमाप्रमाणे वयात शिथिलता राहील.

वेतन श्रेणी

  • उमेदवारांना Pay Matrix – Level -7 प्रमाणे प्रती महिना वेतन अदा केले जाईल.

अर्ज शुल्क (Cabinate Secretariat DFO Bharti 2025)

वरील पदासाठी अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क असणार नाही.

नोकरीचे ठिकाण

दिल्ली

अर्ज कसा करावा.

  • इच्छुक पात्र उमेदवारांनी Cabinate Secretariat DFO Bharti 2025 साठी त्यांचे अर्ज हे ऑफलाईन पद्धतीनं विहित केलेल्या नमुन्यात नमूद केलेल्या पत्त्यावर १४/१२/२०२५ पूर्वी पोहोचतील असे पाठवायचे आहेत.
  • अर्ज करण्यासाठीच्या सूचना
    • उमेदवारांनी अर्ज हे विहित केलेल्या नमुन्यात A4 कागदावर इंग्रजी कॅपिटल अक्षरात काळया किंवा निळ्या शाईने अर्ज भरलेला असावा.
    • अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरावी.अर्जातील एकही कॉलम रिकामा सोडू नये.
    • अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे जोडून ऑर्डिनरी पोस्टाने १४/१२/२०२५ पूर्वी पोहोचतील असे एका लिफाफ्या मध्ये भरून पाठवावेत.

निवड प्रक्रिया

  • नमूद केलेल्या वेळेत मिळालेल्या अर्जांची छाननी केली जाईल.
  • उमेदवारांना मिळालेल्या GATE परीक्षेतील गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल.
  • पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
  • उमेदवारांची अंतिम निवड ही GATE score आणि मुलाखत यांच्या आधारे होईल.

मुलाखतीची ठिकाणे (Cabinate Secretariat DFO Bharti 2025)

  • चेन्नई
  • गुरुग्राम
  • गुवाहाटी
  • जम्मू
  • जोधपूर
  • कोलकाता
  • लखनऊ
  • मुंबई

कागदपत्र

  • सर्व शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र आणि गुणपत्र
  • जन्माचा दाखला किंवा इतर जन्म तारखेचा पुरावा (पॅन कार्ड, पासपोर्ट,वाहन चालवण्याचा परवाना)
  • जात प्रमाणपत्र
  • GATE Score Card
  • विभागीय उमेदवार असल्यास विभागप्रमुखाचे ना हरकत प्रमाणपत्र
  • माजी सैनिक असल्यास डिस्चार्ज प्रमाणपत्र
  • दोन पासपोर्ट आकाराचे रंगीत फोटो ज्यावर मागच्या बाजूस नाव आणि जन्म तारीख लिहिलेली असावे.

महत्वाच्या सूचना

  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी Cabinate Secretariat DFO Bharti 2025 साठीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • अर्जात नमूद केलेले इमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
  • चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरवले जाईल.
  • अर्धवट भरलेला अर्ज (फोटो नसलेला,अपूर्ण कागदपत्र जोडलेला,सही न केलेला )रद्द करण्यात येईल.
  • जे शब्द किंवा Paragraph लागू होत नसतील असे शब्द किंवा Paragraph डिलिट करावे,
  • पात्र उमेदवारांनी फक्त एकच विषयासाठी अर्ज करावा.
  • जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे /वाढवणे तसेच भरतीप्रक्रिया रद्द करणे/ पुढे ढकलणे/ स्थगित करणे तसेच काही कारणास्तव मुलाखतीचे. ठिकाण बदलणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.

अर्ज पाठवण्यासाठीचा पत्ता

Post Bag No. 001,Lodhi Road Head Post Office,New Delhi -110003

अर्ज पोहोचण्यासाठी शेवटची तारीख – १४/१२/२०२५

नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा.


Article

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top