(BMC Aarogy Khate Bharti 2025) बृहन्मुंबई महानगरपालीके अंतर्गत सार्वजनिक आरोग्य खात्यात विविध पदांसाठी भरती

बृहन्मुंबई महानगर पालिके अंतर्गत सार्वजनिक आरोग्य खात्यात कंत्राटी तत्वावर वैद्यकीय अधिकारी,परिचारिका ,औषध निर्माता या पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. इच्छुक पात्र उमेदवारांनी BMC Aarogy Khate Bharti 2025 साठी त्यांचे अर्ज गुगल फॉर्म द्वारे ऑनलाईन पद्धतीने २०/११/२०२५ ते ०४/१२/२०२५ या दरम्यान जमा करायचे आहेत. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

BMC Aarogy Khate Bharti 2025

जाहिरात क्र – MGC /F/5910/ दि २५.०३.२०२५

रिक्त पदांचा तपशील (BMC Aarogy Khate Bharti 2025)

अ.क्र पदाचे नाव
०१ कंत्राटी वैद्यकीय अधिकारी
०२ कंत्राटी परिचारिका
०३ कंत्राटी औषधनिर्माता

शैक्षणिक अर्हता (BMC Aarogy Khate Bharti 2025)

  • पद क्र १
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची MBBS पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • उमेदवार हा महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल मध्ये नोंदणीकृत असावा तसेच नोंदणीचे नुतनिकरन केलेले असावे.
    • उमेदवारास संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
    • उमेदवारास ६ किंवा त्यापेक्षा अधिक महिन्यांचा अनुभव असल्यास अनुभावाबाब्ताचे अधिक गुण दिले जातील.
  • पद क्र २
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून इयत्ता १२ वी परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त संस्थेतून तीन किंवा साडे तीन वर्ष कालावधीचा जनरल नर्सिंग किंवा मिडवाईफरी अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा.
    • उमेदवार हा महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल मध्ये नोंदणीकृत असावा. तसेच नोंदणीचे नुतनीकरण केलेले असावे.
    • उमेदवार हा इयत्ता १० वी किंवा समतुल्य परीक्षा ५० किंवा १०० गुणांच्या मराठी विषयासह उत्तीर्ण असावा.
    • उमेदवार हा CCC प्रमाणपत्र परीक्षा ओ /ए /बी /सी स्तराने तसेच MS-CIT प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • उमेदवाराकडे ६ महिने किंवा अधिक अनुभव असल्यास अनुभवाचे अधिकचे गुण दिले जातील.
  • पद क्र ३
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून फार्मसी शाखेतील पदविका (Diploma) किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठ्ची फार्मसी शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा. पदवी परीक्षा उत्तीर्ण उमेदवारास प्राधान्य दिले जाईल. \
    • उमेदवार हा महाराष्ट्र राज्य फार्मसी कुंचील मध्ये नोंदणीकृत असावा. तसेच नोंदणीचे नुतानिकरन केलेले असावे.
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त संस्थेतून “ओ” स्तर ,”ए” स्तर, “बी” स्तर, “सी” स्तर CCC प्रमाणपत्र परीक्षा तसेच MS-CIT प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • उमेदवार मान्यताप्राप्त बोर्ड मधून १० वी किंवा समतुल्य परीक्षा ५० गुण किंवा १०० गुणांच्या मराठी विषयासह उत्तीर्ण असावा.
    • उमेदवाराकडे किमान ६ महिने किंवा अधिक अनुभव असल्यास अधिओकाचे गुण दिले जातील.

वयोमर्यादा

  • पद क्र १ – उमेदवाराचे वय ७० वर्षापेक्षा जास्त नसावे.
  • पद क्र २ आणि ३ – उमेदवाराचे वय ४३ वर्षापेक्षा जास्त नसावे.

वेतन श्रेणी (BMC Aarogy Khate Bharti 2025)

  • पद क्र १ – उमेदवारास नोकरीत रुजू झाल्यानंतर रु ९०,०००/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
  • पद क्र २ – उमेदवारास नोकरीत रुजू झाल्यानंतर रु ३०,०००/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
  • पद क्र ३ – उमेदवारास नोकरीत रुजू झाल्यानंतर रु २०,०००/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.

अर्ज शुल्क

वरील पदासाठी अर्ज करण्यास कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क असणार नाही.

अर्ज कसा करावा

  • उमेदवारांनी BMC Aarogy Khate Bharti 2025 साठीचे अर्ज हे जाहिरातीत प्रसिद्ध झालेल्या गूगल लिंक द्वारे ऑनलाईन पद्धतीने २०/११/२०२५ ते ०४/१२/२०२५ या दरम्यान जमा करायचे आहेत.
  • अर्ज हे नमूद केलेल्या गुगल फॉर्म च्या सहाय्याने ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत. इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीअक्रले जाणार नाही.
  • अर्ज करण्यासाठीच्या स्टेप्स
    • नमूद केलेल्या गुगल फॉर्मच्या लिंक वर क्लिक करावे.
    • अर्जात विचारलेले सर्व प्रश्नाची उत्तरे अचूक भरावे.

नोकरीचा कालावधी

१७९ दिवस

महत्वाच्या सूचना

  • उमेदवारांनी BMC Aarogy Khate Bharti 2025 साठीचे अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • रजिस्टर करताना दिलेले इमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरतीप्रक्रिया सुरु असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
  • चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरवले जाईल.
  • अर्धवट भरलेले अर्ज रद्द केले जातील.
  • भरती प्रक्रिया रद्द करणे /स्थगित करणे /पुढे ढकलणे याबाबतचे सर्व निर्णय व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहे.
  • भरती करण्याबाबत कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास उमेदवारांना भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरवले जाईल.

महत्वाच्या तारखा

अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख – २०/११/२०२५

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – ०४/१२/२०२५

नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा

टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा


Articles

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top