(Arogya Vibhag Recruitment 2024)सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये वैद्यकीय अधिकारी पदासाठी १७२९ जागांवर भरती

(Arogya Vibhag Recruitment 2024) महाराष्ट्र राज्यातील आरोग्य विभाग अंतर्गत ‘गट अ’ संवर्गातील वैद्यकीय अधिकारी या पदासाठी १७२९ जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.इच्छुक उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून १५/०२/२०२४ पूर्वी जमा करणेचे आहे. सविस्तर माहिती खालील प्रमाणे

Arogya Vibhag Recruitment 2024

जाहिरात क्र -०१/२०२४

रिक्त पदांचा तपशील

अ क्र पदाचे नाव पद संख्या
वैद्यकिय अधिकारी (MBBS & Post Graduate/Diploma)१४४६
वैद्यकिय अधिकारी (BAMS & Post Graduate/Diploma)२८३
एकूण १७२९
Arogya Vibhag Recruitment 2024

शैक्षणिक अर्हता (Aarogya Vibhag Bharti 2024)

  • पद क्र १
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा MBBS पदवी परीक्षा किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण असावा. आणि
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदव्युत्तर पदवी किंवा पदविका किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण असावा.
  • पद क्र२
    • उमेदवार हा शुद्ध आयुर्वेदिक पदवी किंवा BAMS पदवी /पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर पदविका परीक्षा उत्तीर्ण असावा.
  • उमेदवारांची ३१/०१/२०२४ पर्यंत इंटर्नशिप पूर्ण झालेली असावी.
  • उमेदवार हा NMC /MMC नोंदणी प्रमाणपत्र धारक असावा तरच उमेदवार वरील पदासाठी पात्र ठरतील. हे प्रमाणपत्र अर्जासोबत अपलोड केले नाही तर अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
  • जर उमेदवारांनी भारताबाहेरील वैद्यकिय शिक्षण घेतले असल्यास उमेदवाराला भारतीय NBE परीक्षा देणे अनिवार्य राहील. अश्या उमेदवारांची भरतीसाठी अर्जांची छाननी करताना NBE परीक्षेत मिळालेले गुण ग्राह्य धरले जातील.
  • भारताबाहेर शिक्षण घेतलेल्या उमेदवारांनी NBE गुणपत्र जोडले नसल्यास अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

वयोमर्यादा (Arogya Vibhag Recruitment 2024)

  • ३१/०१/२०२४ पर्यंत खुल्या प्रवर्गातील उमेदवारांचे किमान वय १८ आणि कमाल वय ३८ वर्षे असावे.
  • मागासवर्गीय आणि आर्थिक दुर्बल घटक प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ५ वर्षे शिथिलता राहील.
  • प्रावीण्य प्राप्त खेळाडू असलेल्या उमेदवारांना कमाल वयात ५ वर्षे शिथिलता राहील.
  • दिव्यांग उमेदवारांना कमाल वयात ७ वर्षे शिथिलता राहील.
  • मागासवर्गीय उमेदवार, दिव्यांग,खेळाडू यापैकी जी अधिक असेल ती एकच सवलत दिली जाईल.

वैद्यकिय अधिकारी पदासाठी प्रवर्ग निहाय सविस्तर रिक्त जागांचा तपशील

प्रवर्ग अजाअजवि.जा
(अ)
भ.ज
(ब)
भ.ज
(क)
भ.ज
(ड)
वि.मा.प्रइमावआदुघ खुलाएकूण
वैद्यकिय अधिकारी (MBBS & Post Graduate/Diploma)१८५९९४८३९५६३८३५२५९२२०४६७१४४६
वैद्यकिय अधिकारी (BAMS & Post Graduate/Diploma)३६१९११५१४३९२२८३
एकूण २२१११८५७४७६७४५४२३१०२६३५५९१७२९
Arogya Vibhag Recruitment 2024

वेतनश्रेणी

वरील पदासाठी नोकरीत रुजू झाल्यानंतर ₹ ५६,१००/- ते ₹१,७७,५००/- इतके वेतन अदा केले जाईल.

अर्ज शुल्क (Arogya Vibhag Recruitment 2024 )

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना वरील पदासाठी अर्ज शुल्क ₹१०००/- भरावे लागतील.
  • मागासवर्गीय /आर्थिक दुर्बल घटक /अनाथ/दिव्यांग उमेदवारांना ₹७००/- अर्ज शुल्क वरील पदासाठी भरावे लागेल.
  • अर्ज शुल्क हे फक्त ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे. दुसऱ्या कोणत्याही पद्धतीने अर्ज शुल्क स्वीकारले जाणार नाही.
  • अर्ज शुल्क हे ना परतावा तत्वावर आहे.
  • वरील शुल्क व्यतिरिक्त बँक आणि इतर शुल्क हे उमेदवारांनी भरायचे आहेत.

अर्ज कसा कराल (Arogya Vibhag Bharti 2024)

  • वरील पदासाठी इच्छुक उमेदवारांनी त्यांचे अर्ज अधिकृत संकेतस्थळावरून ०१/०२/२०२४ सकाळी १०.०० वाजल्यापासून ते १५/०२/२०२४ रात्री ११.५९ वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहेत.
  • अर्ज हा फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारला जाईल इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारला जाणार नाही.

निवड प्रक्रिया (Arogya Vibhag Bharti 2024)

  • पदव्युत्तर पदवी किंवा पदविका परीक्षेमध्ये उमेदवारांना गुणांऐवजी ग्रेड असतील तर अश्या उमेदवारांची पदवी/पदविका निहाय MBBS सरासरी गुणांच्या आधारे स्वतंत्र गुणवत्ता यादी तयार केली जाईल.
  • BAMS नंतर पदव्युत्तर पदवी किंवा पदविका धारकांना प्राधान्य दिले जाईल त्यांची स्वतंत्र गुणवत्ता यादी तयार केली जाईल.
  • BAMS नंतर पदव्युत्तर पदवी /पदविका उत्तीर्ण उमेदवारांना प्राधान्य असल्याने त्यांचा पूर्ण विचार झाल्यानंतरच BAMS पदवीधर उमेदवारांचा विचार केला जाईल.
  • उमेदवारांना BAMS आणि MBBS पदवी परीक्षेत सर्व विषयात मिळून मिळालेल्या गुणांचे ९५% मध्ये परिवर्तन केले जाईल.
  • भारताबाहेर शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना NBE परीक्षेत मिळालेले गुण ग्राह्य धरले जाईल.
  • उमेदवारांना त्यांच्या अनुभवाचे गुण देताना प्रत्येक एक वर्षासाठी १ गुण दिला जाईल. पण अनुभवासाठी जास्तीत जास्त ५ गुणच दिले जातील. एक वर्षापेक्षा कमी अनुभव असणाऱ्या उमेदवारांना गुण मिळणार नाही.
  • उमेदवाराने सक्षम अधिकाऱ्याने दिलेले अनुभवाचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक.
  • MBBS विशेषज्ञ खालील क्रम विचारात घेतला जाईल.
    • अति विषेशोपचार तज्ञ
    • MD/MS/D.N.B
    • मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदविका
    • F .C.P.S
    • C.P.S पदविका
  • BAMS पदव्युत्तर पदवी/पदविका धारकांसाठी क्रम
    • पदव्युत्तर पदवी
    • पदव्युत्तर पदविका
    • BAMS
  • महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट अ मधील वैद्यकीय अधिकारी या संवर्गातील कार्यरत असणारे नियमित वैद्यकीय अधिकारी या पदासाठी अर्ज करण्यास पात्र नाहीत. ही बाब लपवून अर्ज केल्याचे कोणत्याही टप्प्यावर निदर्शनास आल्यास उमेदवारास अपात्र ठरवून शिस्तभंगाची कारवाई केली जाईल.
  • अनुभवाच्या गुणांच्या मुल्यांकानासाठी ३१/०१/२०२४ ही तारीख अंतिम राहील.

अनुभवासाठी ग्राह्य धरली जाणाऱ्या संस्थांतील सेवा पुढीलप्रमाणे. (Arogya Vibhag Recruitment 2024)

  • महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातील संस्थेमधील कंत्राटी किंवा बंधपत्रित सेवा.
  • महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागातील संस्थेत कंत्राटी किंवा बंधपत्रित सेवा.पण पदव्युत्तर पदवी किंवा पदविकेचे शिक्षण घेताना बंधनकारक असणारी resident म्हणून केलेली सेवा ग्राह्य धरली जाणार नाही. पण पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर अशी सेवा दिली असेल तर ती ग्राह्य धरली जाईल.
  • केंद्र शासन अंतर्गत सेवा.
  • केंद्र आणि राज्य शासन अंकित/अंगीकृत संस्थेतील सेवा
  • महापालिकेतील सेवा
  • इतर राज्यातील शासकीय सेवा (अनुभव प्रमाणपत्र इंग्रजी मध्ये असावे)
  • सार्वजनिक आरोग्य विभाग शासन परिपत्रक परिशिष्ट अ मधील शासन मान्य खाजगी रुग्णालयात केलेली सेवा.

MBBS उत्तीर्ण उमेदवारांना खाली नमूद केलेल्या विशेषज्ञ शाखेतील पदव्युत्तर पदविका /पदवी धारक उमेदवारांना प्राधान्य (Arogya Vibhag Recruitment 2024)

१)अति विषेशोपचार तज्ञ २)बालरोग तज्ञ ३) भिषक ४)भुल तज्ञ ५)स्त्री रोग तज्ञ ६)शल्य चिकित्सक ७)कान नाक घसा तज्ञ ८)नेत्र रोग तज्ञ ९)अस्थी व्यांगोपचार तज्ञ १०) त्वचा रोग तज्ञ ११)शरीर विकृती तज्ञ १२)रक्त संक्रमण अधिकारी १३) क्ष – किरण तज्ञ १४)मानसोपचार तज्ञ १५) पी. एस.एम १६)फॉरेन्सिक मेडिसिन १७)क्षयरोग तज्ञ

अर्जसोबत पाठवण्याची कागदपत्रे (Arogya Vibhag Recruitment 2024)

  • उमेदवारांना खाली नमूद केलेले सर्व कागदपत्रे स्व-साक्षांकित प्रतिसह अर्जासोबत अपलोड करणे आवश्यक आहे.
  • कागदपत्रे अपलोड न केल्यास अर्ज स्वीकारला जाणार नाही.अश्या उमेदवारांना अपात्र/बाद ठरविण्यात येईल.
  • लागणारी कागदपत्रे खालील प्रमाणे
    • जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा शाळांत परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र
    • महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असल्याचे प्रमाणपत्र
    • राखीव प्रवर्गातून अर्ज करत असल्यास जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र
    • नॉन क्रीमी लेयर प्रमाणपत्र
    • खुल्या प्रवर्गातील महिला तसेच मागास प्रवर्गातील महिलांनी आरक्षणासाठी नॉन क्रीमी लेयर प्रमाणपत्र.
    • इंटर्न शिप पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र
    • महाराष्ट्र वैद्यक परिषद (MMC /NMC) कडील नोंदणी प्रमाणपत्र
    • अनुभवाचे प्रमाणपत्र
    • स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो (१४० पिक्सेल हाईट आणि१०० पिक्सेल वीडथ)(१० MB पेक्षा जास्त नसावा.)
    • सही (५० पिक्सेल हाईट आणि१०० पिक्सेल वीडथ)(१० MB पेक्षा जास्त नसावा.)
    • आधार कार्ड
    • परदेशातून पदवी घेतलेली असल्यास NBE गुणपत्रिका
    • वैद्यकिय पदवीच्या सर्व वर्षाच्या गुणपत्रिका,पदवी /पदव्युत्तर पदवी यांचे प्रमाणपत्र
    • दिव्यांग असल्यास प्रमाणपत्र
    • पात्र खेळाडू असल्यास प्रमाणपत्र
    • उमेदवार विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल असल्यास त्याबाबतची कागदपत्रे.

महत्वाच्या सूचना (Arogya Vibhag Recruitment 2024)

  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • रजिस्टर करताना दिलेले ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
  • उमेदवाराने चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर उमेदवारास अपात्र ठरवले जाईल.
  • निवड प्रक्रियेत विहित केलेल्या निकषानुसार गुणांच्या मुल्यांकणासाठी उमेदवारांनी सर्व गुणपत्रे आणि प्रमाणपत्र यांच्या स्व साक्षांकित प्रती अर्जासोबत अपलोड करायचे आहे.अपलोड केलेले नसल्यास अर्ज रद्द केले जातील.
  • प्राप्त अर्जांची छाननी करून विहित कार्यपद्धती नुसार पात्र उमेदवारांची यादी अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.
  • गुणवत्ता नुसार पात्र उमेदवारांनी नियुक्तीच्या ठिकाणी मूळ प्रमाणपत्र घेऊन स्वतः उपस्थित राहणे आवश्यक आहे.
  • विहित मुदतीत जे उमेदवार नियुक्तीच्या ठिकाणी हजर राहणार नाहीत ते अपात्र होतील.
  • निवड झालेल्या उमेदवारांचा पहिली दोन वर्षे प्रोबेशन काळ असेल.
  • निवड झालेल्या उमेदवारास कोणत्याही प्रकारचा खाजगी व्यवसाय करता येणार नाही.
  • निवड झालेल्या उमेदवारास रुजू होताना संबंधित कार्यालय प्रमुखास किमान ५ वर्षे शासकीय सेवा करणार आणि न केल्यास विहित केलेला दंड भरण्यास तयार असल्याचे बाँड लिहून द्यावा लागेल.
  • उमेदवारास किमान ३ वर्ष नोकरी केल्याशिवाय सेवांतर्गत पदव्युत्तर शिक्षणासाठी जाता येणार नाही.
  • निवड झालेला उमेदवार नमूद केलेल्या कालावधी च्या आधी परस्पर पदव्युत्तर शिक्षणासाठी गेल्यास त्याच्या सेवा समाप्त करण्यात येतील.
  • प्रत्येक उमेदवाराने फक्त एकच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. उमेदवाराकडून एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास सर्व अर्ज बाद करण्यात येतील.

महत्वाच्या तारखा (NHM Bharti)

अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख -०१/०२/२०२४ सकाळी १०.०० वाजल्यापासून

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख-१५/०२/२०२४ रात्री ११.५९ वाजेपर्यंत

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

जाहिरातीसाठी – इथे क्लिक करा

नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून जॉईन किंवा फॉलो करा

व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा

Article

NTPC Limited मध्ये सहाय्यक कार्यकारी (ऑपरेशन) पदासाठी २२३ जागांवर भरती

भारत डायनॅमिक्स लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी ३६१ जागांवर भरती

एज्युकेशन कन्सल्टंट इंडिया लिमिटेड (EdCIL) अंतर्गत विविध पदांसाठी भरती

बँक ऑफ बडोदा मध्ये सुरक्षा अधिकारी पदासाठी भरती

केंद्रीय राखीव पोलीस दलात हवालदार (कॉन्स्टेबल)या पदासाठी गुणवंत खेळाडूंना नोकरीची संधी