( AAI Junior Executive Recruitment) Airport Authority of India मध्ये Junior Executive पदासाठी ४९० जागांवर भरती

( AAI Junior Executive Recruitment) भारत सरकारच्या अंतर्गत असणाऱ्या Airport Authority of India या मिनी रत्न कंपनी मध्ये Junior Executive पदासाठी विविध शाखेत ४९० जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.इच्छुक उमेदवारांनी त्यांचे अर्ज अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने ०२/०४/२०२४ ते ०१/०५/२०२४ या दरम्यान भरायचे आहेत.उमेदवारांची निवड हि GATE परीक्षेतील गुणांच्या आधारे केली जाईल. सविस्तर माहिती खालील प्रमाणे,

AAI Junior Executive Recruitment

जाहिरात क्र 02/2024/CHQ

रिक्त पदांचा तपशील ( AAI Junior Executive Recruitment)

अ.क्र पदाचे नाव पद संख्या
Junior Executive (Architecture)03
Junior Executive(Engineering Civil)90
Junior Executive(Engineering Electrical)106
Junior Executive ( Electronics)278
Junior Executive(Information Technology)13
एकूण 490
AAI Junior Executive Recruitment

शैक्षणिक अर्हता ( AAI Junior Executive Recruitment)

  • पद क्र १-
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा Architecture मधील पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • उमेदवार हा Architecture Council कडे नोंदणी कृत असावा.
    • Architecture & Planning विषयातील GATE परीक्षा उत्तीर्ण असावा.
  • पद क्र २
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा Civil शाखेतील BE/B.Tech मधील पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • Civil Engineering मधील GATE परीक्षा उत्तीर्ण असावा.
  • पद क्र ३
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा Electrical शाखेतील BE/B.Tech पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • Electrical Engineering विषयातील GATE परीक्षा उत्तीर्ण असावा.
  • पद क्र ४
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा Electronics/Telecommunication/Electrical with Specialization in Electronics मधील BE/B.Tech पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • Electronics and Communication Engineering मधील GATE परीक्षा उत्तीर्ण असावा.
  • पद क्र ५
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा Computer Science/Computer Engineering/IT/Electronics मधील BE/B.Tech पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा. किंवा
    • उमेदवार हा Masters in computer Application (MCA) परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • Computer Science आणि Information Technology विषयातील GATE परीक्षा उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा( AAI Junior Executive Recruitment)

  • वरील पदांसाठी ०१/०५/२०२४ रोजी पर्यंत उमेदवारांचे कमाल वय २७ वर्षे असावे.
  • अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ०५ वर्षे शिथिलता राहील.
  • इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात 03 वर्षे शिथिलता राहील.
  • अपंग उमेदवारांना कमाल वयात १० वर्षे शिथिलता राहील.
  • विभागीय उमेदवारांना कमाल वयात १० वर्षे शिथिलता राहील.
  • जन्म तारीख हि १० वी किंवा १२ वी प्रमाणपत्रानुसार ग्राह्य धरली जाईल.

वेतन श्रेणी ( AAI Junior Executive Recruitment)

वरील पदासाठी निवड झाल्यानंतर उमेदवारांना नोकरीत रुजू झाल्यावर रु ४०,०००/- ते रु १४००००/- प्रती महिना अदा केले जाईल.

पद संख्या ( AAI Junior Executive Recruitment)

अ. क्र पदाचे नाव खुला आ.दु.घई.मा.वअजा अजएकूण
Junior Executive (Architecture)०३०००००००००३
Junior Executive(Engineering Civil)४००६२२१५०७९०
Junior Executive(Engineering Electrical)५२११२०१६०७१०६
Junior Executive ( Electronics)१३७२७६१४११२२७८
Junior Executive(Information Technology)०८०१०३०१००१३
एकूण २४०४५१०६७३२६४९०

अर्ज कसा कराल ( AAI Junior Executive Recruitment)

  • ( AAI Junior Executive Recruitment) इच्छुक उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळाच्या सहाय्याने ०२/०४/२०२४ ते ०१/०५/२०२४ या दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणेचा आहे.
  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अर्ज भरण्याबाबतच्या सर्व सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात.
  • अर्जात विचारलेली माहिती काळजीपूर्वक तसेच अचूक भरणे गरजेचे आहे.
  • उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावरून करिअर सेक्शन मधून ऑनलाईन अर्ज भरायचा आहे. दुसऱ्या कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारला जाणार नाही.

अर्ज भरण्यासाठी सूचना ( AAI Junior Executive Recruitment)

  • प्रथम उमेदवारांनी ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर च्या साहाय्याने रजिस्टर करून घेणे.
  • ऑनलाईन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी खालील कागदपत्रे एकत्रित करणे.
    • सर्व शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र आणि गुणपत्र आणि Gate परीक्षेचे गुणपत्र
    • उमेदवाराची सर्व माहिती.
    • जात प्रमाणपत्र
    • माजी सैनिक असल्यास डिस्चार्ज प्रमाणपत्र
    • अलीकडील काळातील पासपोर्ट आकाराचा रंगीत फोटो ( ३ महिन्यापेक्षा जुना नसावा)
    • सही
    • ऑनलाईन शुल्क भरण्यासाठीची माहिती.
    • अर्हतेशी संबंधित कागदपत्रे
  • उमेदवारांनी ऑनलाईन अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती भरावी.
  • उमेदवारांनी अर्जामध्ये GATE -२०२४ च्या परीक्षेचा रजिस्ट्रेशन नंबर नमूद करायचा आहे.
  • ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांनी अर्जाची प्रिंट काढून घ्यायची आहे.
  • उमेदवारांनी अर्ज आणि कागदपत्रे पोस्टाने किंवा ईमेल किंवा इतर कोणत्याही पद्धतीने कागदपत्र पाठवायची गरज नाही.

अर्जाचे शुल्क ( AAI Junior Executive Recruitment)

  • वरील पदांसाठी इच्छुक उमेदवारांनी ₹३००/- अर्ज शुल्क भरायचा आहे.
  • अजा/अज/अपंग/AAI मध्ये अप्रेंटीस पूर्ण केलेल्या उमेदवारांना/महिला उमेदवारांना अर्ज शुल्क माफ राहील.
  • अर्ज शुल्क हे ना परतावा आहे.
  • अर्ज शुल्क हे ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे.
  • ऑनलाईन अर्ज शुल्क हे उमेदवारांनी इंटरनेट बँकिंग/डेबिट कार्ड/क्रेडिट कार्ड यांच्या साहाय्याने भरायचे आहे.
  • अर्ज शुल्क व्यतिरिक्त अधिकचे शुल्क हे उमेदवारांनी भरायचे आहे.
  • अर्ज शुल्क यशस्वीरित्या भरून झाल्यानंतर अर्ज भरण्याच्या पेज वर जाईल.
  • उमेदवारांनी शुल्क भरलेली पावतीची प्रिंट काढून घ्यावी.

फोटो आणि सही अपलोड करण्याच्या सूचना ( AAI Junior Executive Recruitment)

  • फोटो
    • फोटो हा अलीकडील काळातील पासपोर्ट आकाराचा रंगीत असावा (३ महिन्यांपेक्षा जास्त जुना नसावा)
    • फोटो मध्ये टोपी/गॉगल घातलेला नसावा. धार्मिक डोक्यावरील पोशाख चालेल पण त्यामुळे तोंड झाकले गेलेले नसावे.
    • स्कॅन केलेल्या फोटो ची साईज ही २० kb ते ५० kb असावी. आणि डायमेनशन २००X २३० पिक्सल असावा.
  • सही
    • उमेदवारांनी पांढऱ्या कागदावर काळ्या शाईने सही करायची आहे.
    • स्कॅन केलेल्या फाईल ची साइज १० kb ते २० kb असावी. आणि डायमेनशन १४०X ६० पिक्सल असावा.
  • पुसट दिसणारा फोटो किंवा सही असेल तर अर्ज अपात्र ठरवण्यात येईल.

निवड प्रक्रिया ( AAI Junior Executive Recruitment)

  • वय तसेच सर्व अर्हता ह्या ०१/०५/२०२४ रोजीपर्यंत असाव्यात.
  • जाहिरातीत नमूद केलेल्या ट्रेड मधील GATE -2024 परीक्षा पात्र असणाऱ्या किंवा MCA परीक्षा उत्तीर्ण असणाऱ्या अर्ज भरलेल्या उमेदवारांना भरती प्रक्रियेसाठी विचारात घेतले जाईल.
  • अर्जामध्ये भरलेल्या माहितीच्या आधारे ज्या पदासाठी उमेदवारांनी अर्ज केले असतील त्या पदाप्रमाने शॉर्टलिस्ट केले जाईल.
  • अर्ज पडताळणी बाबत ची तारीख ही उमेदवारास कळवले जाईल.
  • अर्ज पडताळणीसाठी येताना उमेदवारांनी सर्व कागदपत्रे तसेच ओळखपत्र सादर करणे आवश्यक आहे. सर्व कागदपत्रांचा सेल्फ अटेस्टेड सेट उमेदवाराकडे असावा.
  • अर्ज पडताळणी मधून शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांची यादी अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.
  • शॉर्टलिस्ट झालेल्या उमेदवारांना त्यांच्या ईमेल आयडी वर कॉल लेटर मेल केला जाईल.
  • उमेदवाराची ओळख संशयास्पद वाटल्यास किंवा उमेदवार कागदपत्र सादर करण्यास असमर्थ ठरल्यास अश्या उमेदवारास अपात्र ठरवले जाईल.
  • जे उमेदवार सरकारी / निमसरकारी संस्था किंवा कंपनी कर्मचारी असल्यास त्या विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक.
  • कागदपत्र पडताळणी वेळी मूळ कागदपत्र सादर करू शकला नाही तर अपात्र ठरवले जाईल.
  • उमेदवारांच्या GATE 2024 च्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल.
  • समान गुण असतील तर ( AAI Junior Executive Recruitment)
    • जर GATE मधील गुण समान असतील तर जो उमेदवार वयाने मोठा असेल त्याला प्राधान्य दिले जाईल.
    • GATE मधील गुण आणि वय दोन्ही समान असेल तर पदवी परीक्षेतील गुणांच्या आधारे ज्या उमेदवारास जास्त गुण असतील त्यांना प्राधान्य देण्यात येईल.

महत्वाच्या सूचना ( AAI Junior Executive Recruitment)

  • ( AAI Junior Executive Recruitment) अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पत्र असल्याची खात्री करून मगच अर्ज भरावा.
  • रजिस्टर करताना दिलेला इमेल आय डी आणि मोबाईल नंबर भरतीप्रक्रिया सुरु असेपर्यंत वैध असणे गरजेचे आहे.
  • चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास अश्या उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरवले जाईल.
  • अर्धवट भरलेला अर्ज किंवा परीक्षा शुल्क न भरलेला अर्ज असेल तर तो अर्ज अपात्र ठरवण्यात येईल.
  • उमेदवार हा भारताचा नागरिक असावा.
  • उमेदवाराच्या उमेद्वारी बाबत कोणत्याही प्रकारचा प्रचार किंवा हस्तक्षेप झाल्यास उमेदवारास तत्काळ अपात्र ठरवले जाईल.
  • वरील पदांच्या भरतीप्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा अनुभव असणे गरजेचे नाही.
  • भरतीबाबतचे सर्व पत्रव्यवहार हे इमेल आय डी द्वारे होतील. त्यामुळे उमेदवारांनी वेळोवेळी इमेल आय डी आणि अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन भरती प्रक्रीयेबाबाद updated राहणे गरजेचे आहे.
  • भरती प्रक्रीये बाबतचे पदांची संख्या कमी करणे किंवा वाढवणे,भरती प्रक्रिया पुढे ढकलणे /रद्द करणे,अर्हता या बाबतचे सर्व निर्णय हे AAI ने राखून ठेवलेले आहेत.
  • जाहिरातीत नमूद केलेल्या संख्या ह्या तात्पुरत्या आहेत त्या वाढू किंवा कमी होऊ शकतात.
  • Junior Executive (Electronics) या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारास पाहिले सहा महिने ट्रेनिंग दिले जाईल.

महत्वाच्या तारखा ( AAI Junior Executive Recruitment)

अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख ०२/०४/२०२४

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ०१/०५/२०२४

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

जाहिरातीसाठी – इथे क्लिक करा

नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून जॉईन किंवा फॉलो करा

व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

इंस्टाग्राम पेज फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा

Article

Indian Coast Gaurd (ICG) मध्ये ७० जागांवर भरती

SBI बँकेत विविध पदांसाठी १३० जागांवर भरती

प्रधान आयुक्त सीमाशुल्क(Customs) कार्यालयांमध्ये स्टाफ ड्रायव्हर पदासाठी भरती

INCOIS मध्ये विविध पदांसाठी ३९ जागांवर भरती

INDIAN AIR FORCE मध्ये अग्निविर वायू अंतर्गत अविवाहित गुणवंत खेळाडूंना नोकरीची संधी