आपल्या भारत देशात जगातील सर्वात जास्त संख्येत तरुण लोकसंख्या आहे. पण यातील बहुसंख्य तरुणांकडे रोजगारास आवश्यक असे कौष्याची कमी असल्याने बहुतशा लोकांच्या हाती काम नाही. या वरील उपाय म्हणून भारत सरकारने या तरुणांना आवश्यक ते कौशल्य मिळवण्यासाठी प्रधानमंत्री कौशल विकास योजनेची सुरुवात केली आहे. या योजनेला राष्ट्रीय कौशल विकास निगम म्हणजेच NSDC च्या अंतर्गत चालवले जाते. या योजनेचे प्रमुख उद्दिष्ठ हे देशातील तरुणांना उद्योगाशी निगडीत कौशल्य शिकवून त्यांना सक्षम करणे आहे. याबाबतची सविस्तर माहिती खाली नमूद केलेली आहे.
Table of Contents
(PMKVY Information)प्रधानमंत्री कौशल विकास योजना म्हणजे नक्की काय?
भारतातील तरुणांना आवश्यक ते कौशल्याचे ज्ञान देऊन त्यांना सक्षम करून त्यांच्या हाती काम देण्यासाठी २०१५ साली राष्ट्रीय कौशल विकास निगम (NSDC) अंतर्गत या योजनेची सुरुवात केंद्र सरकारने केली आहे. या योजनेच्या सहाय्याने तरुणांना नोकरी बरोबरच स्व रोजगार या दोन्ही ठिकाणी संधी उपलब्ध होतील.
PMKVY Information योजनेची उद्दिष्ठ
- या योजनेची प्रमुख उद्दिष्ठये ही खालीलप्रमाणे,
- या योजनेचे प्रमुख उद्दिष्ठ हे तरुणांना नोकरी किंवा स्व रोजगार यासाठी प्रशिक्षित करणे आहे.
- उद्योग क्षेत्रासाठी लागणाऱ्या प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करून देणे.
- तरुणांना स्व रोजगारासाठी प्रोत्साहित करणे.
- बेरोजगारी कमी करणे.
PMKVY Information योजनेसाठी पात्र असण्यासाठीची पात्रता
- उमेदवार हा भारताचा नागरिक असावा.
- या योजनेसाठी पात्र असण्यासाठी उमेदवाराचे किमान वय १८ वर्ष आणि कमाल वय ४५ वर्ष असावे.
- उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून इयत्ता १० वी तसेच काही प्रशिक्षणासाठी इयत्ता १२ वी परीक्षा उत्तीर्ण असावा.
- उमेदवाराकडे आधार कार्ड तसेच आधार कार्डशी लिंक असलेले बँक खाते असणे आवश्यक.
PMKVY Information योजनेसाठी अर्ज कसा कराल
- इच्छुक पात्र उमेदवारांनी या योजनेसाठी अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाईन किंवा नजीकच्या प्रधानमंत्री कौशल विकास योजनेच्या ट्रेनिंग सेंटर ला भेट देऊन ऑफलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठीच्या स्टेप्स
- अधिकृत संकेतस्थळावर भेट देऊन रजिस्टर करून घ्यावे.
- अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरून घ्यावी.
- आवश्यक ती सर्व कागदपत्र अपलोड करून घ्यावे.
- ऑफलाईन अर्ज करण्यासाठीच्या स्टेप्स
- नजीकच्या प्रधानमंत्री कौशल विकास योजनेच्या ट्रेनिंग केंद्राला भेट द्यावी.
- अर्जाची प्रत घेऊन अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरावी.
- आवश्यक ती सर्व कागदपत्र अर्जासोबत जोडावी.
PMKVY Information प्रधानमंत्री कौशल विकास योजनेचे फायदे
- या योजने अंतर्गत अर्ज करणाऱ्या उमेदवारांना मोफत प्रशिक्षण दिले जाते.
- प्रशिक्षणासाठी येणाऱ्या उमेदवारांना प्रती महिना नियमाप्रमाणे स्टायपंड अदा केले जाईल.
- प्रशिक्षण कालावधी पूर्ण झाल्यानंतर अधिकृत आणि सरकारमान्य घेतलेल्या कोर्स चे प्रमाणपत्र मिळेल.
- नोकरी किंवा स्वरोज्गाराची संधी निर्माण होते.
प्रधानमंत्री कौशल विकास योजनेंतर्गत दिले जाणारे प्रशिक्षण
- प्रधानमंत्री कौशल विकास योजने अंतर्गत तसे पाहायला गेले तर भरपूर कोर्स उपलब्ध आहेत आपण खाली काही लोकप्रिय कोर्स पाहणार आहोत.
- इन्फोर्मेशन टेक्नोलोजी आणि संगणक प्रशिक्षण –
- या कोर्स अंतर्गत वेब डिझायनिंग /डेटा एन्ट्री /ग्राफिक डिझायनिंग यासारख्या भरपूर कोर्सेस उपलब्ध आहेत.
- आरोग्य क्षेत्र
- या विभाग अंतर्गत नर्सिंग ,मेदिकॅल टेक्निशिअन या आणि अश्याप्रकारच्या भरपूर कोर्सेसचा समावेश आहे ज्यामध्ये वैद्यकीय विभागाविषयीचे प्रशिक्षण दिले जाते.
- मेकॅनिकल/ ऑटो मोबाईल –
- या मध्ये दुचाकी/चारचाकी दुरुस्ती,ऑटो कॅड , विविध मशीन चालवने या आणि असंख्य प्रकारचे कोर्स उपलब्ध आहेत.
- सौंदर्य आणि .आरोग्य
- मेक अप, पार्लर ,हेल्थ केअर या संबंधीचे प्रशिक्षण दिले जाते.
- बांधकाम आणि उत्पादन
- इलेक्ट्रिशिअन, वेल्डिंग ,प्लम्बिंग हे आणि असे भरपूर प्रशिक्षण पुरवले जाते.
- पर्यटन
- Hotel Management ,शेफ हे आणि असे बरेचसे प्रशिक्षण कोर्स पुरवले जातात.
- वर नमूद केलेले काही लोकप्रिय प्रशिक्षण कोर्स आहेत यासारखे अजून भरपूर कोर्स पंतप्रधान कौशल विकास योजने अंतर्गत उपलब्ध आहेत.
- इन्फोर्मेशन टेक्नोलोजी आणि संगणक प्रशिक्षण –
PMKVY Information बेरोजगारी वरील उपाय
आपल्या देशात बेरोजगारी हि एक मोठी समस्या आहे. या समस्येवर पंतप्रधान कौशल विकास योजना ही फायद्याची ठरू शकते. आपल्या देशातील पारंपारिक शिक्षणाबरोबरच Practical शिक्षण ही तरुणांना मिळाले तर त्यांना नोकरी बरोबरच स्व रोजगाराच्या संधीही मिळतील.
भविष्यातील संधी
- आजचे युग हे डिजिटल आहे त्यामुळे भविष्यात डिजिटल तसेच IT क्षेत्रातील कौशल्य असणाऱ्यांना मागणी असणार आहे.
- आरोग्य तसेच पर्यटनाच्या क्षेत्रात हि विशेष संधी असतील.
PMKVY Information निष्कर्ष
- प्रधानमंत्री कौशल विकास योजना ही तरुणांसाठी रोजगार उपलब्ध करण्यास मोलाचे योगदान देणारी ठरत आहे आणि भविष्यातही याचा उपयोग होत राहील.
- शिक्षण पूर्ण झाल्यानंतर जर रोजगार मिळण्यात अडचण येत असेल तर पंतप्रधान कौशल विकास योजना रोजगार मिळण्यासाठी नवा मार्ग तरुणांना दाखवेल.
- कौशल्याच्या मदतीनेच बेरोजगारीवर मात होऊ शकते त्यामुळे पंतप्रधान कौशल विकास योजनेच्या सहाय्याने बेरोजगारी कमी होईल.
अधीकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा
अशाच नवनविन माहीतीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
व्हाॅट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा
आमच्या इंस्टाग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा