(Thane Mahanagarpalika Bharti 2025) ठाणे महानगरपालिके अंतर्गत विवध पदांसाठी १७७३ जागांवर भरती

ठाणे महानगर पालिके अंतर्गत गट क आणि गट ड प्रवर्गातील विविध पदांसाठी १७७३ जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. Thane Mahanagarpalika Bharti 2025 साठी इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेत स्थळावरून १२/०८/२०२५ ते ०२/०९/२०२५ या दरम्यान जमा करायचे आहेत. सविस्तर माहित खालीलप्रमाणे,

Thane Mahanagarpalika Bharti 2025

जाहिरात क्र –

रिक्त पदांचा तपशील (Thane Mahanagarpalika Bharti 2025)

अ क्र पदाचे नाव पद संख्या
प्रशासकीय सेवा गट क ५५
लेख सेवा गट क ३२
तांत्रिक सेवा गट क १०८
अग्निशमन सेवा गट क ६०१
निम वैद्यकीय सेवा गट क ८१३
शिक्षण सेवा गट क ०५
सर्वजनिक आरोग्य सेवा गट क ०५
वैद्यकीय सेवा गट क 02
निम वैद्यकीय सेवा गट ड १५२
एकूण १७७३

शैक्षणिक अर्हता (Thane Mahanagarpalika Bharti 2025)

  • पद क्र १ –
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • सहाय्यक परवाना निरीक्षक पदासाठी Sanitary इन्स्पेक्टर परीक्षा उत्तीर्ण
    • लिपिक पदासाठी मराठी टंक लेखन गती ३० शब्द प्रती मिनिट आणि इंग्रजी टंक लेखन गती ४० शब्द प्रती मिनिट प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण.
  • पद क्र २
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण (B.Com )
    • मराठी टंकलेखन गती – ३० शब्द प्रती मिनिट आणि इंग्रजी टंकलेखन गती ४० शब्द प्रती मिनिट.
  • पद क्र ३
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून स्थापत्य,यांत्रिकी/ऑटोमोबाइल/विद्युत अभियांत्रिकी पदविका (डिप्लोमा) परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • M.Sc (पर्यावरणशास्त्र)/BE (Environment)
  • पद क्र ४
    • उमेदवार हा कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा/इयत्ता १० वी परीक्षा उत्तीर्ण.
    • सब ऑफिसर आणि Instructor अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा.
    • अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम उत्तीर्ण
  • पद क्र ५ (Thane Mahanagarpalika Bharti 2025)
    • मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाचा उपचार विषयातील पदवी परीक्षा उत्तीर्ण
    • मान्यताप्राप्त विद्यापीठाची मानसोपचार शास्त्र विषयातील पदवी परीक्षा उत्तीर्ण.
    • विज्ञास शाखेतील १२ वी परीक्षेसाहित जनरल नर्सिंग व मिडवाइफरी विषयाची पदविका परीक्षा उत्तीर्ण
    • बायोमेडीकल /रेडीओग्राफी / रेडीओलोजी विषयासह/इंडोस्कोपी /ऑडीओमेट्री टेक्नीशिअन विषयासह /भौतिकशास्त्र /इलेक्ट्रोनिक्स / B .Sc /LLP विषयासह कला शाखेतील पदवी/B.Sc (Statistics)/ B.O.T .H पदवी परीक्षा उत्तीर्ण
    • क्लीनिकल सायकोलोजी शाखेतून मास्टर्स ऑफ आर्ट्स परीक्षा उत्तीर्ण
    • जनराल नर्सिंग/मिडवाइफरी डिप्लोमा परीक्षा उत्तीर्ण तसेच पब्लिक हेल्थ नर्सिंग कोर्स उत्तीर्ण
    • MSW परीक्षा उत्तीर्ण
    • डिप्लोमा इन इ सी जी टेक्नोलॉजी परीक्षा उत्तीर्ण
    • डिप्लोमा इन मेडीकल Laboratory टेक्नोलॉजी प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण
    • M.Sc
    • B.Pharm
    • ग्रंथालय शास्त्राची पदवी परीक्षा उत्तीर्ण
    • फाईन आर्ट विषयातील पदवी परीक्षा उत्तीर्ण
    • १२ वी नंतर MPW प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण
    • Statistics विषयातून विज्ञ्न शाखेतील पदव्युत्तर पदवी परीक्षा उत्तीर्ण
    • १२ वी नंतर सिने प्रोजेक्शन प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण
    • रासानशास्त्र /जीवशास्त्र /सूक्ष्मजीव शास्त्र पदविसाहित DMLT परीक्षा उत्तीर्ण
  • पद क्र ६
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • अस्थिव्यंग विषयातील शिक्षण शास्त्रातील पदवी.
  • पद क्र ७ (Thane Mahanagarpalika bharti 2025)
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून इयत्ता १२ वी परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • स्वच्छता निरीक्षक अभ्यासक्रम उत्तीर्ण
  • पद क्र ८
    • मान्यताप्राप्त विद्यापीठाची फूड and न्युट्रिशिअन विषयासह होम सायन्स शाखेतील पदवी परीक्षा उत्तीर्ण.
  • पद क्र ९
    • विज्ञान शाखेतून इयत्ता १२ वी जीवशास्त्र विषयासह उत्तीर्ण. आणि ओ.टी Technology मधील पदविका (डिप्लोमा) परीक्षा उत्तीर्ण.
    • इयत्ता १० वी परीक्षेसह रुग्ण सहाय्यक प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण
    • इयत्ता १० वी सह रुग्ण वैद्यकीय प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण
    • विज्ञान शाखेतील १२ वी परीक्षा उत्तीर्ण
    • इयत्ता १० वी परीक्षा उत्तीर्ण

वयोमर्यादा (Thane Mahanagarpalika Bharti 2025)

  • ०२/०९/२०२५ रोजी उमेदवाराचे किमान वय १८ वर्ष आणि कमाल वय ३८ वर्ष असावे.
  • मागासवर्गीय/अनाथ/आर्थिक दुर्बल घटक उमेदवारांना कमाल वयात ५ वर्ष शिथिलता राहील.

वेतन श्रेणी

  • अधिक माहितीसाठी जाहिरातीची लिंक खाली दिली आहे.

अर्ज शुल्क

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांनी रु १०००/- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहे.
  • राखीव आणि अनाथ उमेदवारांनी रु ९००/- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
  • माजी सैनिक उमेदवारांना अर्ज शुल्क माफ असेल.
  • अर्ज शुल्क हे न परतावा असून एकदा भरलेले अर्ज शुल्क कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.
  • अर्ज शुल्क हे उमेदवारांनी क्रेडीट कार्ड/डेबिट कार्ड/इंटरनेट बँकिंग च्या सहाय्याने फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत. इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज शुल्क स्वीकारले जाणार नाही.

अर्ज कसा कराल

  • इच्छुक पात्र उमेदवारांनी Thane Mahanagarpalika bharti 2025 साठी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून १२/०८/२०२५ ते ०२/०९/२०२५ या दरम्यान जमा करायचे आहेत.
  • अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत. इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • अर्ज करण्यासाठीच्या स्टेप्स
    • रजिस्ट्रेशन – उमेदवारांनी प्रथम स्वतःला अधिकृत संकेत स्थळावर रजिस्टर करून घ्यावे.
    • अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरावे.
    • आवश्यक ती सर्व कागदपत्र अपलोड करून घ्यावे.
    • अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करावेत.

निवड प्रक्रिया (Thane Mahanagarpalika Bharti 2025)

  • ऑनलाईन परीक्षा –
    • उमेदवारांची निवड ही ऑनलाईन परीक्षेद्वारे होईल.
    • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना ऑनलाईन परीक्षेत किमान ५०% गुण तसेच राखीव प्रवर्गातील उमेदवारांना किमान ४५% गुण मिळणे आवश्यक आहे.
    • वरील पदासाठी अर्ज संख्या वाजवी पेक्षा जास्त असेल तर अर्ज संख्या मर्यादित करण्यासाठी विहित केलेल्या किमान अर्हतेपेक्षा जास्त तसेच अनुभव यांच्या आधारे अर्जांची संख्या मर्यादित करण्यात येईल.
  • कागदपत्र पडताळणी
  • पात्र उमेदवारांना इमेल /मोबाइल मेसेज यांच्याद्वारे कळवण्यात येईल.

कागदपत्र (Thane Mahanagarpalika Bharti 2025)

  • सर्व शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र आणि गुणपत्र
  • अनुभव प्रमाणपत्र
  • वयाचा पुरावा
  • अधिवास प्रमाणपत्र
  • नॉन क्रिमी लेयर प्रमाणपत्र
  • प्रकल्पग्रस्त दाखला
  • भूकंपग्रस्त दाखला
  • दिव्यांग प्रमाणपत्र
  • खेळाडू प्रमाणपत्र
  • माजी सैनिक प्रमाणपत्र
  • अंश कालीन उमेदवार प्रमाणपत्र
  • अनाथ असल्याचे प्रमाणपत्र

महत्वाच्या सूचना

  • उमेदवारांनी Thane mahanagarpalika Bharti 2025 साठी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • रजिस्टर करताना दिलेला इमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरु असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
  • चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरवले जाईल.
  • अर्धवट भरलेला अर्ज रद्द करण्यात येईल.
  • एकपेक्षा अधिक उमेदवारांना समान गुण असतील तर
    • आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्याचे पाल्य असल्यास प्रथम प्राधान्य दिले जाईल.
    • आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्याचे पाली नसल्यास वयाने ज्येष्ठ असणार्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
    • वरील दोन्ही अटीस पत्र उमेदवार असतील तर उच्च शिक्षण अर्हता धरण असणार्या उमेदवारास प्राधान्य दिले जाईल.
    • वरील तिन्ही अटीत समान असल्यास किमान शैक्षणिक अर्हता परीक्षेत अधिक गुण असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
    • वरील सर्व निकष समान असतील तर उमेदवारांच्या आडनावाच्या इंग्रजी अद्याक्षाराच्यानुसार निश्चित केले जाईल.
  • जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे /वाढवने तसेच भरती प्रक्रिया रद्द करणे /पुढे ढकलणे/स्थगित करणे याबाबतचे सर्व निर्णय व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
  • भरती करण्याबाबत कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास उमेदवारास कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरवले जाईल.

महत्वाच्या तारखा

अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख – १२/०८/२०२५

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – ०२/०९/२०२५

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

जाहिरातीसाठी – इथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा

नोकरीच्या अश्याच नव नवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

व्हाॅट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

टेलीग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

आमच्या इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा


Articles

Bank of Maharashtra मध्ये जनरलिस्ट ऑफिसर पदासाठी ५०० जागांवर भरती

इंडियन ऑईल लिमिटेड मध्ये अप्रेंटिस पदासाठी ४७५ जागांवर भरती

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *