भारतामध्ये मुलीचे पालक असणाऱ्या प्रत्येकाला असे वाटते की त्यांच्या मुलीने उच्च शिक्षण घ्यावे किंवा तिचे लग्न उत्तमप्रकारे करावे.पण आजकालच्या वाढत्या महागाईच्या काळात या कारणांसाठी पैसे साठवणे किंवा साठवले तरी याच कारणासाठी वापरले जाणे हे एक आव्हानच आहे. याप्रकारच्या अडथळ्यांवर मात करण्यासाठी भारत सरकारने बेटी बचाओ,बेटी पढाओ या अभियानांतर्गत सुकन्या समृद्धी योजना या योजनेची सुरुवात केली आहे. Sukanya Samruddhi Yojana ही एक लोकप्रिय तसेच महत्वाची बचत योजना आहे. योजनेबाबतची सर्व माहिती या लेखात आपण पाहणार आहोत.
Table of Contents
Sukanya Samruddhi Yojana इतिहास आणि उद्देश्य ?
बेटी बचाओ, बेटी पढाओ या राष्ट्रीय अभियानाचा भाग म्हणून या योजनेची सुरुवात भारत सरकारने केली आहे. मुलींच्या जन्मापासून त्यांच्या भविष्यासाठी आर्थिक तरतूद करणे , शिक्षणाचा खर्च भागवणे ही या योजनेच्या सुरू करण्याचा प्रमुख उद्देश्य आहे.
सुकन्या समृद्धी योजना काय आहे?
Sukanya Samrudhi Yojana ही एक अल्पबचत योजना आहे.जी मुलींच्या भविष्यातील खर्चापासून पालकांना आराम मिळावा यासाठी सुरु केलेली आहे. या योजनेच्या सहाय्याने पालक हे प्रामुख्याने मुलींचे उच्चशिक्षण किंवा लग्नाच्या खर्चासाठी लागणारा निधी उभा करण्यास मदत करते. ही योजना सरकारच्या अंतर्गत असल्यामुळे सुरक्षा आणि जमा केलेल्या पैशांवर चांगला परतावा ही योजना देते. म्हणूनच ही योजना सुरू झाल्यापासूनच लोकप्रिय ठरलेली आहे.

Sukanya Samruddhi Yojana वैशिष्ठ्ये
- या योजने अंतर्गत तुम्ही ₹ २५० /- पासून गुंतवणुकीस सुरुवात करू शकता.
- गुंतवणुकीची मर्यादा ही ₹१,५०,०००/- एका वर्षात इतकी आहे.
- योजना ही केंद्र सरकारच्या अंतर्गत असल्याने गुंतवणुकीची सुरक्षितता पूर्ण मिळते
- आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत कर सवलत मिळेल.
- मिळणाऱ्या व्याज आणि रकमेवर कोणत्याही प्रकारचे व्याज असणार नाही.
- खाते उघडल्यापासून १५ वर्षापर्यंत पैसे जमा करायचे आणि २१ वर्षांनी खाते Mature होते.
पात्रता
- वय -मुलीचे खाते तिच्या जन्मासून १० वर्षापर्यंत काढून घ्यावे.
- मुलीचे नैसर्गिक किंवा कायदेशीर पालक हे खाते उघडू शकतात.
- एका कुटुंबातील दोनच मुलींसाठी या योजने अंतर्गत खाते उघडता येईल. एका अपत्यानंतर जर जुळे किंवा तीळे अपत्य झाल्यास दोनपेक्षा जास्त खाती उघडता येतील.
- ह्या योजनेसाठी पात्र असण्यासाठी भारताचे नागरिक असणे आवश्यक आहे.
व्याज दर
- Sukanya Samruddhi Yojana मध्ये व्याज दर हे सरकार दर तीन महिन्यांनी ठरवते.
- आता सध्या या योजनेवर व्याज दर हे ८.२% वार्षिक इतका आहे.
- इतर सर्व मुदत ठेवी आणि अल्पबचत योजनेच्या तुलनेत हा व्याजदर जास्त आहे.
खाते कुठे काढावे ?
- उमेदवार हे जवळच्या कोणत्याही पोस्ट ऑफिस शाखेत किंवा कोणत्याही अधिकृत बँकेत Sukanya Samruddhi Yojana अंतर्गत खाते उघडू शकतील.
आवश्यक असणारी कागदपत्रे
- मुलीचा जन्माचा दाखला
- पालकाचे आधारकार्ड आणि Pan Card
- पत्त्याचा पुरावा
- मुलीचा आणि पालकाचा फोटो
अर्ज करण्यासाठीची प्रक्रिया
- जवळच्या पोस्ट ऑफिस किंवा बँकेच्या शाखेस भेट द्या.
- Sukanya Samruddhi Yojana चे अर्ज घेऊन अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरून घ्यावी.
- आवश्यक ती सर्व कागदपत्र अर्जासोबत जोडावे.
- सुरुवातील जी रक्कम भरायची आहे ती भरून घ्या.
- खाते उघडण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पासबुक मिळेल.

पैसे कधी काढता येतील
- मुलगीचे वय १८ वर्ष झाल्यावर किंवा तिने १० वी उत्तीर्ण केल्यानंतर तिच्या उच्च शिक्षणासाठी खात्यातील ५०% रक्कम काढता येईल.
- मुलगी १८ वर्षाची झाल्यावर तिच्या लग्नासाठी पूर्ण रक्कम काढता येईल.
- खाते उघडल्यापासून २१ वर्षांनी पूर्ण रक्कम व्याजासह मिळते.
व्याज कसे मोजले जाते ?
Sukanya Samruddhi Yojana अंतर्गत असणाऱ्या खात्यात महिन्याच्या शेवटी शिल्लक रकमेवर व्याज दिले जाते. ही व्याज वर्षाच्या शेवटी खात्यात जमा होते.
Sukanya Samruddhi Yojana खाते बंद करण्याचे नियम
- मुलीच्या मृत्यू नंतर खाते बंद केले जाते.
- गंभीर आजार किंवा विशेष परिस्थितीमध्ये सरकारच्या मंजुरीसह खाते बंद करता येते.
योजनेचे मर्यादा आणि तोटे
- या योजने अंतर्गत गुंतवणूक केलेले पैसे दीर्घकाळ अडकतात.
- १५ वर्ष गुंतवणूक करणे अनिवार्य आहे.
- ही योजना फक्त मुलींसाठी आहे. मुलांसाठी नाही.
- अचानक मोठी रक्कम काढणे शक्य नाही.
उदाहरण
समजा एक पालकाने दरवर्षी १ लाख प्रती वर्ष असे १५ वर्ष रक्कम जमा केली तर
- एकूण गुंतवणूक – ₹१५ लाख झाली.
- Maturity वेळी मिळणारी रक्कम (अंदाजे)- ₹४०/- ते ४५/- लाख
- व्याज दरानुसार मिळणाऱ्या रकमेत बदल होऊ शकतो.
इतर योजनांशी तुलना
| अ. क्र | योजना | जोखीम | परतावा | कर सवलत |
| ०१ | सुकन्या समृद्धी योजना | कमी | जास्त | मिळते |
| ०२ | PPF | कमी | मध्यम | मिळते |
| ०३ | FD | कमी | कमी | मर्यादित मिळते |
| ०४ | Mutual Fund | जास्त | जास्त | मर्यादित मिळते |
Sukanya Samruddhi Yojana आणि पालकांची जबाबदारी
ही योजना फक्त आर्थिक गुंतवणूक नसून मुलीच्या शिक्षण आणि स्वावलंबना बद्दलची पालकांची बांधिलकी दर्शवते. नियमित बचत , वेळेवर गुंतवणूक आणि आर्थिक नियोजन केल्यास मुलीचे भविष्य सुरक्षित करता येते. ही योजना भारतातील सर्वोत्तम आणि सुरक्षित बचत योजनांपैकी एक आहे.
Sukanya Samruddhi Yojana ही मध्यम वर्गीय पालकांसाठी त्यांच्या मुलींचे भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करण्यासाठी मदत करते. चांगला व्याज दर आणि करमुक्त परतावा असल्यामुळे ही योजना सर्वोत्तम योजनांपैकी एक आहे.योग्य नियोजन आणि शिस्तबद्ध गुंतवणूक केल्यास पालक आपल्या मुलीच्या स्वप्नांना बळ देऊ शकतील.
जर तुम्ही तुमच्या मुलीच्या उज्वल भविष्यकरिता सुरक्षित आणि करमुक्त आणि उच्च परतावा देणारी योजना शोधत असाल तर Sukanya samruddhi Yojana नक्कीच एक आदर्श पर्याय असेल.
अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा
योजनेच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा
व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा
आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा
FAQ
खाते ऑनलाईन उघडता येते का?
सध्या पूर्णपणे ऑनलाईन सुविधा ही मर्यादीत आहे. पण काही बँका ही सुविधा अंशतः ऑनलाईन उपलब्ध आहे.
गुंतवणूक थांबवली तर काय होईल?
किमान रक्कम भरली नाही तर खाते Default होते. नियमाप्रमाणे दंड भरून खाते पुन्हा सुरू करता येते.
मुलीच्या लग्नासाठी पैसे काढता येते का?
हो,२१ वर्षानंतर संपूर्ण रक्कम काढता येते.
