भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालय अंतर्गत असणाऱ्या उत्तर रेल्वे मध्ये अप्रेंटिस पदासाठी ४११६ जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. इच्छुक पात्र उमेदवारांनी Northern Railway Apprentice 2025 साठीचे त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून २५/११/२०२५ ते २४/१२/२०२५ या दरम्यान जमा करायचे आहेत. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

जाहिरात क्र – RRC/NR/05//2025/Act Apprentice
Table of Contents
रिक्त पदांचा तपशील (Northern Railway Apprentice 2025)
| अ.क्र | पदाचे नाव | पद संख्या |
| १ | अप्रेंटिस | ४११६ |
| एकूण | ४११६ |
शैक्षणिक अर्हता (Northern Railway Apprentice 2025)
- उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून इयत्ता १० वी परीक्षा किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण असावा.
- उमेदवार हा मान्यताप्राप्त संस्थेतून संबंधित ट्रेड मधून ITI परीक्षा उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा
- Northern Railway Apprentice 2025 साठी २४/१२/२०२५ रोजी उमेदवाराचे किमान वय १५ वर्ष आणि कमाल वय २४ वर्ष असावे.
- अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ५ वर्ष शिथिलता राहील.
- इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ३ वर्ष शिथिलता राहील.
- अपंग उमेदवारांना कमाल वयात १० वर्ष शिथिलता राहील.
वेतन श्रेणी
- उमेदवारांना नोकरीत रुजू झाल्यानंतर नियमाप्रमाणे प्रती महिना स्टायपंड अदा केले जाईल.
अर्ज शुल्क
- अर्ज करण्यास इच्छुक पात्र उमेदवारांनी Northern Railway Apprentice 2025 साठी ₹१००/- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
- अजा/अज/अपंग/महिला उमेदवारांना अर्ज शुल्क माफ आहे.
- अर्ज शुल्क हे ना परतावा असून एकदा भरलेले अर्ज शुल्क हे कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.
- उमेदवारांनी अर्ज शुल्क हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.अर्ज शुल्क हे कॅश/चेक/मनी ऑर्डर/IPO /डिमांड ड्राफ्ट यांच्या सहाय्यानं अर्ज शुल्क स्वीकारले जाणार नाही.
- अर्ज शुल्क यशस्वीरीत्या भरून झाल्यानंतर इ रिसिट तयार होईल ती उमेदवारांनी डाउनलोड करून त्याची प्रिंट घ्यावी.
अर्ज कसा करावा
- इच्छुक पात्र उमेदवारांनी Northern Railway Apprentice 2025 साठीचे त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून २५/११/२०२५ ते २४/१२/२०२५ या दरम्यान जमा करायचे आहेत.
- अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
- अर्ज करण्यासाठीच्या स्टेप्स
- उमेदवारांनी प्रथम Engagement of Act Apprentice या लिंक वर क्लिक करावे.
- रजिस्ट्रेशन – विचारलेली सर्व माहिती जस की नाव, वडिलांचे नाव , जन्म तारीख, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, अचूक भरून रजिस्टर पर्यायावर क्लिक करून रजिस्टर करून घ्यावे.
- Log in करून घ्यावे. अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरावी.
- आवश्यक ती सर्व कागदपत्र अपलोड करून घ्यावी
- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करून घ्यावे.
- Final Submit Button वर क्लिक करावे.
- फोटो ,सही, डाव्या हाताचा अंगठा अपलोड करावा.
- अर्जाची प्रत डाउनलोड करून प्रिंट काढून घ्यावी.
निवड प्रक्रिया
- प्रथम सर्व अर्जांची छाननी केली जाईल.
- उमेदवारांची निवड ही त्यांना मिळालेल्या १० वी आणि ITI परीक्षेतील दोन्ही मिळून सरासरी गुणांच्या आधारे केली जाईल.
- दोन किंवा अधिक उमेदवारांना समान गुण असल्यास वयाने मोठ्या असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
- जन्म तारीख समान असल्यास जो उमेदवार प्रथम १० वी उत्तीर्ण झाला असेल अशा उमेदवारास प्राधान्य दिले जाईल.
कागदपत्र(Northern Railway Apprentice 2025)
- जन्म तारखेचा पुरावा
- सर्व शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र आणि गुणपत्र
- जात प्रमाणपत्र
- अपंग असल्याचे प्रमाणपत्र
- माजी सैनिक असल्यास डिस्चार्ज किंवा सेवा प्रमाणपत्र
महत्वाच्या सूचना
- उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी Northern Railway Apprentice 2025 साठीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
- रजिस्टर करताना दिलेला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
- चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्धवट भरलेला अर्ज रद्द करण्यात येतील.
- जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे/ वाढवणे तसेच भरतीप्रक्रिया रद्द करणे/ पुढे ढकलणे/ स्थगित करणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
- भरती करण्याबाबत कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
- गॉगल,टोपी घातलेले फोटो किंवा ठळक न दिसणारे फोटो जर अर्जासोबत जोडले असतील तर असे अर्ज रद्द करण्यात येतील.
- इंग्रजी किंवा हिंदी व्यतिरिक्त इतर कोणत्याही भाषेत जमा केलेले अर्ज रद्द करण्यात येतील.
महत्वाच्या तारखा
अर्ज करण्यासाठी सुरुवातीची तारीख – २५/११/२०२५
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख -२४/१२/२०२५
अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा
नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा.
व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा
आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा
