महाराष्ट्रात शिक्षण हे सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी साधन मानले जाते. पण खूप मोठ्या प्रमाणात गुणवंत विद्यार्थी हे आर्थिक संकटांमुळे उच्च शिक्षणापासून लांब राहतात. अश्या आर्थिक संकटात असणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून महाराष्ट्र शासनाने Rajarshi Chatrapati Shahu Maharaj Shikshan Shulk Shishyvrutti Yojana या योजनेची सुरुवात केली आहे.ही योजना गुणवंत विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या बाबतीत त्यांची स्वप्ने पूर्ण करण्याची संधी देते. ही योजना ही राजर्षी शाहू महाराजांच्या समाज न्याय ,समता ,शिक्षण प्रा या विचारांवर आधारित आहे.

Table of Contents
राजर्षी शाहू महाराज
राजर्षी शाहू महाराज हे कोल्हापूर संस्थाच शिक्षण , समानता या बाबतीतील दूरदृष्टी असणारे शासक होते.
राजर्षी शाहू महाराजांनी शिक्षण ही सर्वांसाठी खुले केले. त्यांचा ठाम विश्वास होता की शिक्षणाशिवाय समाजाचा विकास होणे शक्य नाही.
Rajarshi Chatrapati Shahu Maharaj Shikshan Shulk Shishyvrutti Yojana काय आहे?
आर्थिक दृष्ट्या दुर्बल गुणवंत विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने या योजनेची सुरुवात केली आहे. या योजनेत १० वी आणि १२ वी परीक्षेत चांगले गुण मिळवलेल्या तसेच पदवी ,पदव्युत्तर पदवी ,व्यावसायिक अभ्यासक्रम शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना वार्षिक शिष्यवृत्ती दिली जाते.
या योजनेची उद्दिष्ट्ये (Rajarshi Chatrapati Shahu Maharaj Shikshan Shulk Shishyvrutti Yojana)
- आर्थिक दुर्बल घटकातील गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करणे.
- गुणवंत विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे.
- ग्रामीण आणि मागास भागातील विद्यार्थ्यांना समान संधी देणे.
शिष्यवृत्तीचे फायदे
- Rajarshi Cahatrapati Shahu Maharaj Shikshan Shulk Shishyvrutti Yojana या शिष्यवृत्ती अंतर्गत शिक्षण शुल्क,पुस्तके,अभ्यास साहित्य ,राहण्याचा खर्च या साठी आर्थिक सहाय्य मिळते.
- गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला शासनाकडून प्रोत्साहन मिळते.
- विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी,वैद्यकीय, व्यवस्थापन, विज्ञान ,कला,वाणिज्य अश्या विविध अभ्यासक्रमातील उच्च शिक्षणात संधी मिळते.

पात्र अभ्यासक्रम
- इयत्ता ११ वी आणि १२ वी
- पदवी परीक्षा
- पदव्युत्तर पदवी परीक्षा
- अभियांत्रिकी पदवी
- वैद्यकीय पदवी
- व्यवस्थापन
Rajarshi Chatrapati Shahu Maharaj Shikshan Shulk Shishyvrutti Yojana पात्र असण्याच्या अटी
- विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा.
- कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे ८ लाख रुपये पर्यंत असावे.
- विद्यार्थी हे मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेत असावा.
- MahaDBT पोर्टल वर नोंदणीकृत असावा.
कागदपत्रे
- आधारकार्ड
- रहिवाशी प्रमाणपत्र
- उत्पन्नाचे प्रमाणपत्र
- मागील वर्षाचे प्रमाणपत्र
- कॉलेज प्रवेशाचा पुरावा
- बँक खात्याचा तपशील
- पासपोर्ट आकाराचा फोटो

अर्ज कसा करावा (Rajarshi Chatrapati Shahu Maharaj Shikshan Shulk Shishyvrutti Yojana)
- उमेदवारांनी प्रथम स्वतःला MahaDBT पोर्टल वर नोंदणी करून घ्यावे.
- यशस्वीरीत्या नोंदणी केल्यानंतर लॉग इन करून घ्या.
- शिष्यवृत्ती किंवा Social Justice हा पर्याय निवडा.
- राजर्षी छत्रपती शाहू महाराज मेरीट स्कॉलरशीप हा पर्याय निवडा
- अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरावी.
- आवश्यक ती सर्व कागदपत्र अपलोड करून घ्यावी.
- अर्ज जमा करावा.
शिष्य वृत्ती रक्कम
- Rajarshi Chatrapati Shahu Maharaj Shikshan Shulk Shishyvrutti Yojana या योजनेच्या अंतर्गत विद्यार्थी ज्या अभ्यासक्रमात शिक्षण घेत असेल त्या अभ्यासक्रमाचे शैक्षणिक शुल्क आणि परीक्षा शुल्क हे पुढे नमूद केल्याप्रमाणे विद्यार्थ्यांना मिळतील.
- कुटुंबाचे ०८ लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असणाऱ्या मुलांना शैक्षणिक शुल्काच्या आणि परीक्षा शुल्काच्या ५०% रक्कम या योजनेंतर्गत मिळेल.
- कुटुंबाचे ०८ लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असणाऱ्या मुलीना परीक्षा शुल्क आणि शैक्षणिक शुल्काच्या १००% रक्कम या योजने अंतर्गत मिळेल.
- ही शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात दोन हफ्त्यात जमा होतील.
- पहिला हफ्ता हा ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आणि दुसरा हफ्ता फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जमा होतील.
शिष्यवृत्ती मिळण्यासाठी पात्र उमेदवार निवडण्याची प्रक्रिया
- Rajarshi Chatrapati Shahu Maharaj Shikshan Shulk Shishyvrutti Yojana या योजनेसाठी जमा झालेल्या अर्जांची प्रथम छाननी केली जाईल.
- कागदपत्रांची पडताळणी केली जाईल.
- महाविद्यालय आणि विभागाची मंजुरी घेतली जाईल.
- पात्र ठरल्यास शिष्यवृत्तीची रक्कम ही उमेदवारांनी नमूद केलेल्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने थेट खात्यात जमा होईल.
महत्वाच्या सूचना
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी योजनेबाबतची सर्व माहिती वाचावी आणि नमूद केलेय सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून घेऊन मगच अर्ज करावा.
- अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक आणि पूर्ण भरावी. अर्धवट भरलेले अर्ज रद्द केले जातील.
- चुकीची किंवा खोटी माहिती भरल्याचे आढळल्यास उमेदवारास अपात्र ठरवले जाईल.
- आवश्यक असणारी सर्व कागदपत्र अपलोड करावी.
Rajarshi Chatrapati Shahu Maharaj Shikshan Shulk Shishyvrutti Yojana योजनेचे सामाजिक महत्व
ग्रामीण,गरीब आणि गुणवंत विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी देऊन शाहू महाराजांच्या बहुजन हिताय,बहुजन सुखाय हा विचार पुढे नेण्याचे काम ही योजना पार पाडते आहे.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज मेरीट स्कॉलरशीप ही महाराष्ट्रातील गुणवंत विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अत्यंत महत्वाची योजना आहे.जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीतील कोणी मेहनती,हुशार आणि शिक्षणासाठी जिद्दी असेल ज्याला शिक्षणासाठी आर्थिक मदतीची गरज आहे अश्या विद्यार्थ्यांना ही माहिती अवश्य Share करा.
अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा
योजनेच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून जॉईन किंवा फॉलो करा
Whats App ग्रुप लिंक – इथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा
आमच्या इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा
FAQ
ही शिष्यवृत्ती दरवर्षी मिळते का?
होय पात्रता पूर्ण केल्यास दरवर्षी अर्ज करता येईल.
एकपेक्षा जास्त शिष्यवृत्ती मिळू शकते का?
शासनाच्या नियमाप्रमाणे काही मर्यादा असतात.
अर्ज नाकारल्यास काय करावे?
MahaDBT पोर्टल वर कारण तपासावे काही तृटी असल्यास त्या दुरुस्त करून घ्याव्या.
