शेतकरी हा पाणी,अनियमित असणारी वीज आणि वीज दरवाढ या कारणांमुळे त्रस्त असतो. शेतीसाठी आवश्यक असणारे सिंचन वेळेवर न मिळाल्यामुळे पिकांचे नुकसान होते व त्याचा परिणाम उत्पादनावर होतो. यावर पर्याय म्हणून राज्य शासनाने Mukhyamantri Solar Krishi Pump Yojana सुरू केली आहे. या योजनेच्या साहाय्याने शेतकऱ्याला वीज बिलापासून मुक्ती ,२४ तास सिंचनाची सुविधा मिळते. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

Table of Contents
Mukhyamantri Solar Krishi Pump Yojana काय आहे?
ही महाराष्ट्र शासनाची शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली योजना आहे. Mukhyamamtri Solar Krishi Pump योजना ही शेतकऱ्यांना सौर ऊर्जेवर चालणारे कृषी पंप अनुदानाच्या सहाय्याने उपलब्ध करून देण्यासाठी सुरू केलेली आहे. या योजनेत डिझेल किंवा विजेवर चालणाऱ्या पंपा ऐवजी सोलर पंपाचा वापर केलेला आहे. हे पंप सूर्य प्रकाशावर चालत असल्यामुळे डिझेल किंवा वीज खर्च बंद होतील.
योजनेमागची उद्दिष्ट्ये
- शेतकऱ्यांसाठी मोफत वीज
- डिझेलचा खर्च कमी करणे
- वीज तुटवडा आणि लोड शेडिंग पासून शेतकऱ्यांची मुक्तता
- खर्च कमी झाल्यामुळे उत्पन्नात वाढ करणे
- पर्यावरणपूरक आणि शाश्वत शेतीस प्रोत्साहन देणे

Mukhyamantri Solar Krishi Pump Yojana फायदे
- वीज बिलाच्या चक्रव्यूहातून मुक्तता
- सौर पंप ही सौर ऊर्जेवर चालत असल्यामुळे वीज बिल येण्याचा प्रश्नच नाही. या मुळे शेतकऱ्यांवरील वीज बिलाचा भार मोठ्या प्रमाणात कमी होतो.
- २४ तास सिंचनाची सोय
- शेतकरी विजेवर अवलंबून असल्याकारणाने लोड शेडिंग च्या वेळेनुसार सिंचक सोय असते पण या योजनेच्या सहाय्यानं कोणत्याही वेळी सिंचन करता आल्याने पिकांना योग्य वेळी पाणीपुरवठा मिळेल.
- प्रदूषण मुक्ती
- या योजनेअंतर्गत सौर ऊर्जेचा वापर होत असल्याने डिझेल पंपामुळे होणारे प्रदूषण कमी होऊन पर्यावरण रक्षणाचे उद्दिष्ट पूर्ण होते.
- कमी खर्च
- सौर पंपांचा देखभाल खर्च कमी असतो. एकदा बसवल्यानंतर अनेक वर्ष तो सुरळीत चालतो.
- उत्पन्नात वाढ
- सिंचनाचे कार्य नियमित झाल्यामुळे उत्पन्नात वाढ होते.
Mukhyamantri Solar Krishi Pump Yojana अंतर्गत मिळणारे पंप
- या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना पुढील प्रकारचे पंप मिळतील.
- ५ एकर पर्यंत शेत असणाऱ्या शेतकऱ्यांना ३ HP सौर कृषी पंप
- ५ एकर पेक्षा जास्त शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना ५ HP आणि ७.५ HP सौर कृषी पंप
पंपाची निवड शेतजमीन ,पाण्याचा स्रोत तसेच शेतकऱ्याला शेतीसाठी आवश्यक पाणी यावर अवलंबून असते.
अनुदान (Subsidy) किती?
या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना एकूण रकमेच्या ९०% ते ९५% पर्यंत अनुदान मिळते. शेतकऱ्यांना एकूण रकमेच्या साधरन ५% ते १०% इतका खर्च येतो. अनुसूचित जाती,जमाती, अल्पभूधारक तसेच आदिवासी समाजातील शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाते.
योजनेस पात्र असण्यासाठी पात्रता
- अर्ज करणारा शेतकरी हा महाराष्ट्र राज्यातील असावा.
- शेतकरी ज्यांनी पूर्वी कोणत्याही योजनेचा फायदा घेतला असेल असे शेतकरी या योजनेस पात्र असणार नाही.
- शेतकऱ्याची स्वतःची जमीन असणे आवश्यक.
- विहीर , बोअर,तलाव यासारखा पाण्याचा स्रोत असणे आवश्यक.
- कृषी वीज कनेक्शन नसलेले किम प्रलंबित असणारे
- अर्जदार हा MahaDBT पोर्टल वर नोंदणीकृत असावा.
Mukhyamantri Solarr Krishi Pump Yojana आवश्यक कागदपत्र
- आधार कार्ड
- जमिनीचा ७/१२ उतारा किंवा फेरफार उतारा
- रहिवाशी दाखला
- बँक पासबुक
- आवश्यक असल्यास जात प्रमाणपत्र
- पाण्याच्या स्रोताचा पुरावा
- पासपोर्ट आकाराचा फोटो
अर्ज कसा करावा ?
- Mukhyamantri Solar Krishi Pump Yojana साठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
- अर्ज करण्यासाठीच्या स्टेप्स
- उमेदवारांनी प्रथम MahaDBT पोर्टलला भेट देऊन नोंदणी करून घ्यावी.
- नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पोर्टल वर लॉगिन करावे.
- लॉग इन करून झाल्यानंतर कृषी योजना निवडावी.
- Mukhyamantri Solar Krishi Pump Yojana निवडावी.
- अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरावी.
- आवश्यक ती सर्व कागदपत्रे अपलोड करून घ्यावी.
- अर्ज सबमिट करावा.
- अर्ज भरल्याची पावती सेव्ह करून घ्यावी किंवा त्याची प्रिंट काढून घ्यावी.

योजनेस पात्र असण्यासाठी निवड प्रक्रिया
- कागदपत्र पडताळणी
- पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी तयार केली जाईल.
- लॉटरी किंवा प्राधान्यक्रमानुसार शेतकऱ्यांची निवड केली जाईल.
- पात्र शेतकऱ्यांचे पंप बसवण्याचे काम सुरू केले जाईल.
Mukhyamantri Solar Krishi Pump Yojana अंतर्गत सौर पंप बसवल्यावर मिळणारे फायदे
- खर्चात बचत होते
- पुरेशा प्रमाणात पाणी मिळाल्यामुळे पिकांचे नुकसान कमी होते.
- दुबार/त्रिबार पीक काढता येते.
- लोडशेडींग पासून मुक्तता मिळाल्यामुळे वीज टंचाईपासून मुक्तता मिळते.
या योजनेचे महत्व
महाराष्ट्रातील ठरावी भाग हा मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या, दुष्काळ,पाणी टंचाई या समस्यांनी त्रस्त आहे. या परिस्थितीत Mukhyamantri Solar Krishi Pump Yojana ही शेतकऱ्यांसाठी भरपूर प्रमाणात मदतीची ठरत आहे. ही योजना केवळ आर्थिक मदत पुरवत नसून शाश्वत शेतीकडे टाकलेले महत्वाचे पाऊल आहे.
Mukhyamantri Solar Krishi Pump Yojana ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक क्रांतिकारक योजना आहे. ही योजना वीज,खर्च आणि पाणी या तीन प्रमुख समस्यांवर प्रभावी उपाय देते. तुम्ही शेतकरी असून जर या योजनेचा लाभ घेतला नसाल तर आजच या योजनेसाठी अर्ज करा.
अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा
योजनेच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा
व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा
आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा
FAQ
सौर पंप किती वर्ष टिकतो?
सौर पॅनल साधारण २०- २५ वर्ष टिकतात.
रात्री सौर पंप चालतो का?
सौर पंप मुख्यतः दिवसा चालतो.
देखभाल खर्च कोण करते?
पहिल्या काही वर्ष कंपनी करते .
