(NMC Fireman Bharti 2025) नाशिक महानगरपालिका अंतर्गत अग्निशमन विभागात १८६ जागांवर भरती

नाशिक महानगरपालिका पालिका अंतर्गत विविध पदांसाठी अग्निशमन विभागात चालक आणि फायरमन पदासाठी १८६ जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. इच्छुक पात्र उमेदवारांनी NMC Fireman Bharti 2025 साठीचे त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून १०/११/२०२५ ते ०१/१२/२०२५ या दरम्यान जमा करायचे आहेत. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

NMC Fireman Bharti 2025

जाहिरात क्र – ०२/२०२५

रिक्त पदांचा तपशील (NMC Fireman Bharti 2025)

अ .क्रपदाचे नावपद संख्या
चालक – यंत्रचालक /वाहन चालक (अग्निशमन)३६
फायरमन (अग्निशमन)१५०
एकूण१८६

शैक्षणिक अर्हता (NMC Fireman Bharti 2025)

  • पद क्र १
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून इयत्ता १० वी परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • उमेदवाराने मान्यताप्राप्त संस्थेतून राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र ,मुंबई यांचा ६ महिने कालावधीचा अग्निशमन पाठ्यक्रम पूर्ण केलेला असल्यास प्राधान्य दिले जाईल.
    • वाहन चालक या पदाचा किमान 3 वर्ष कालावधीचा अनुभव असावा.
    • उमेदवाराकडे वैध जड वाहन चालवण्याचा परवाना असावा.
    • उमेदवारास मराठी लिहिता,वाचता,बोलता येणे आवश्यक आहे.
  • पद क्र २
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून इयत्ता १० वी परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • उमेदवाराने राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र मुंबई यांचा ६ महिने कालावाढीचा अग्निशमन पाठ्यक्रम पूर्ण केलेला असावा.
    • उमेदवारास मराठी लिहिता,वाचता,बोलता येणे आवश्यक आहे.

शारीरिक पात्रता

  • पद क्र १ आणि २
    • उंची – १६५ से. मी (महिला उमेदवार – १५७ से. मी)
    • छाती – साधारण ८१ से मी फुगवून ५ से. मी जास्त (महिला उमेदवारांना लागू नाही)
    • वजन – किमान ५० कि. ग्रॅम (महिला ४६ कि. ग्रॅम)
    • दृष्टी – चांगली

वयोमर्यादा (NMC Fireman Bharti 2025)

  • ०१/१२/२०२५ रोजी उमेदवाराचे किमान वय १८ वर्ष आणि कमाल वय २८ वर्ष असावे.
  • राखीव प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ५ वर्ष शिथिलता राहील.

वेतनश्रेणी

  • पद क्र १ आणि २ – उमेदवारांना नोकरीत रुजू झाल्यानंतर रु १९,९०० /- ते रु ६३,२००/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.

अर्ज कसा करावा

  • इच्छुक पात्र उमेदवारांनी NMC Fireman Bharti 2025 साठीचे त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून १०/११/२०२५ ते ०१/१२/२०२५ या दरम्यान जमा करायचे आहेत.
  • अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत. इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • अर्ज करण्यासाठीच्या स्टेप्स
    • रजिस्ट्रेशन – उमेदवारांनी प्रथम स्वतःला अधिकृत संकेतस्थळावर रजिस्टर करून घ्यावे.
    • अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरावी.
    • आवश्यक ती सर्व कागदपत्र अपलोड करून घ्यावी.
    • अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करून घ्यावी.

अर्ज शुल्क

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांनी ₹१०००/- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने NMC Fireman Bharti 2025 साठी जमा करायचे आहेत.
  • राखीव तसेच अपंग उमेदवारांनी ₹९००/- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
  • अर्ज शुल्क हे ना परतावा असून एकदा भरलेले अर्ज शुल्क हे कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.
  • अर्ज शुल्क हे उमेदवारांनी क्रेडिट कार्ड/ डेबिट कार्ड/इंटरनेट बँकिंग यांच्या साहाय्याने ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
  • इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज शुल्क स्वीकारले जाणार नाही.

निवड प्रक्रिया

  • ऑनलाईन परीक्षा – निवडिस पात्र असण्यासाठी खुल्या प्रवर्गती उमेदवारांना किमान ५०% आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांस किमान ४५% गुण मिळवणे आवश्यक आहे.
  • ऑनलाईन परीक्षेत गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल.
  • गुणवत्ता यादीनुसार पात्र उमेदवारांना कागदपत्र पडताळणी साठी बोलावले जाईल.
  • पात्र उमेदवारांना ईमेल द्वारे किंवा मोबाईलवर मेसेज द्वार कळवले जाईल.

कागदपत्र (NMC Fireman Bharti 2025)

  • सर्व शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र आणि गुणपत्र
  • अनुभव प्रमाणपत्र
  • जात प्रमाणपत्र
  • जन्म तारखेचा पुरावा.
  • अधिवास प्रमाणपत्र

महत्वाच्या सूचना

  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी NMC Fireman Bharti 2025 साठीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • महिला उमेदवारांनी नावामध्ये बदल असल्यास (लग्नापूर्वीचे नाव आणि लग्ना नंतरचे नाव) याबाबत आवश्यक ती कागदपत्र सादर करणे आवश्यक आहे.
  • रजिस्टर करताना दिलेला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
  • चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्धवट भरलेला अर्ज रद्द करण्यात येईल.
  • पत्रव्यवहारासाठी उमेदवार स्वतःचा पत्ता इंग्रजी मध्ये स्पष्ट नोंदवावा. व्यावसायिक मार्गदर्शन केंद्र/स्वयंअध्ययन मार्गदर्शन केंद्र/वर्ग किंवा कोणत्याही मार्गदर्शक केंद्र किंवा संस्थेचा पत्ता पत्रव्यवहारासाठी देऊ नये.
  • जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे वाढवणे तसेच भरतीप्रक्रिया रद्द करणे पुढे ढकलणे स्थगित करणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
  • भरती करण्याबाबत कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.

महत्वाच्या तारखा

अर्ज करण्यासाठी सुरुवातीची तारीख – १०/११/२०२५

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख -०१/१२/२०२५

नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा

आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा


Article

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top