अलिकडील दशकात युवकांचा कल हा नोकरीपेक्षा उद्योग करण्याकडे जास्त आहे. पण उद्योगाच्या पहिल्या पायरीवर येणारा अडथळा म्हणजे भांडवल, कर्ज मार्केटिंग, तंत्रज्ञान आणि अनुभवी लोकांच्या मार्गदर्शनाचा अभाव. या कारणामुळे अनेक चांगल्या कल्पना ह्या प्रत्यक्षात पूर्ण होत नाहीत. हीच महत्वाची अडचण दूर करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने Startup Maharashtra Scheme आणि MSME अनुदान योजना सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत भांडवल अनुदान,व्याजात सवलत, प्रशिक्षण, बाजारपेठ उपलब्ध करून देणे ही सर्व मदत सरकार तर्फे केली जाते. या लेखात आपण या योजनेबाबतची सेवा माहिती पाहणार आहोत.
Table of Contents
Startup Maharashtra Scheme काय आहे?
स्टार्टअप महाराष्ट्र ही राज्य सरकारच्या अंतर्गत असणारी अशी योजना आहे ज्या अंतर्गत तरुणांना Seed Funding,Incubation Support,Mentorship,Market ऍक्सेस,Patent/IPR Support,Government Procurement मध्ये प्राधान्य देणे ह्या सुविधा दिल्या जातात.
ही योजना ही विशेषतः टेक स्टार्टअप,Agri Startup, हेल्थ,Ed Tech,Fin Tech, यांसारख्या क्षेत्रांसाठी उपयोगाची आहे.

MSME अनुदान काय आहे?
MSME अनुदान योजना ही महाराष्ट्रातील लघुउद्योजकांना आर्थिक सहाय्य करणारी योजना आहे.
या योजनेअंतर्गत पुढे नमूद केलेल्या उद्योगांचा समावेश होतो.
- Manufaturing Unit
- Service Business
- Home Based Business
- Rural & Urban Business
- Female Businessman
- SC/ST/OBC Businessman
Startup Maharashtra Scheme योजनेची प्रमुख उद्दिष्ट्ये
- महाराष्ट्र राज्यात उद्योजकतेला प्राधान्य देणे
- नवीन रोजगार निर्मिती करणे
- ग्रामीण तसेच शहरी भागाला उद्योग वाढवण्यास चालना देणे.
- तरुणांना स्वयं रोजगाराकडे नेणे.
- महिला आणि सामाजिकदृष्ट्या दुर्बल घटकांना संधी देणे.
या योजने अंतर्गत मिळणारी मदत
- भांडवलासाठी अनुदान –
- उद्योग सुरू करताना १५% ते ३५% पर्यंत अनुदान मिळेल.
- काही मोजक्या योजनांमध्ये १० लाख ते ५० लाखांपर्यंत अनुदान.
- व्याजात सवलत
- बँकेच्या कर्जावर ३% ते ७% पर्यंत सवलत
- सीड फंडिंग (स्टार्ट अप)
- लाभार्थ्यांना १० लाख ते ५० लाख रुपयांपर्यंत अनुदान
- Incubation आणि ट्रेनिंग
- IIT,IIM,COEP,VJTI,StartUp Incubation Centre उपलब्ध आहेत.
- Business Mentorship आणि लीगल सपोर्ट मिळेल.
- मार्केटिंग आणि एक्स्पो
- प्रदर्शनात सहभागासाठी अनुदान
- Branding आणि प्रमोशन साठी मदत.
Startup Maharashtra Scheme योजनेसाठीची पात्रता
- उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
- उमेदवारचे वय १८ वर्षापेक्षा जास्त असावे.
- उद्योग हा नवीन किंवा अस्तित्वात असलेला असावा.
- उमेदवाराचे MSME/Udyam नोंदणी झालेली असावी.
- उद्योग हा कायदेशीररित्या नोंदणीकृत असावा.
- DPIT मान्यता असावी
कागदपत्रे
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- रहिवाशी दाखला
- उद्यम नोंदणी प्रमाणपत्र
- बँक पासबुक
- प्रोजेक्ट रिपोर्ट
- GST प्रमाणपत्र
- स्टार्ट अप असेल तर DPIT चे Start up Recognition
Startup Maharashtra Scheme साठी पात्र उद्योग कोणते ?

- Manufaturing उद्योग
- Food Processing
- Garments
- Furniture
- Engineering
- Electronics
- Service Sector
- IT /Software
- Digital Marketing
- Repair Service
- Logistics
- Education and Training
- Agri and Rural Startups
- Dairy
- Poultry
- Food Packaging
- Organic Pharming
- Cold Storage
अर्ज कसा करावा ?
- उमेदवारांनी प्रथम उद्यम पोर्टल वर नोंदणी करून घ्यावी.
- स्टार्ट अप असेल तर Startup Maharashtra Scheme पोर्टल वर नोंदणी करणे.
- महाराष्ट्र उद्योग पोर्टल वर नोंदणी करून घ्यावी.
- योजनेची निवड करावी
- अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरावी.
- आवश्यक ती सर्व कागदपत्र आणि प्रोजेक्ट रिपोर्ट अपलोड करून घ्यावी.
- अर्ज सबमिट करावा.
- बँक तसेच उद्योग विभागाकडून अर्जांची छाननी केली जाईल.
- पात्रतेप्रमाणे अनुदान आणि सवलत मंजूर होईल.
Startup Maharashtra Scheme योजनेचे फायदे
- गरजू लोकांना व्यवसायासाठी किंवा स्टार्ट अप साठी सरकारकडून थेट आर्थिक मदत मिळते.
- कर्ज मिळवण्याची सोपी पद्धत
- नेटवर्किंग आणि मार्गदर्शनाचा फायदा.
- नव उद्योजकांना आत्मविश्वास प्रदान करते.

अर्ज भरताना घ्यायची काळजी.
- सबमीट केलेले प्रोजेक्ट रिपोर्ट हे अपूर्ण नसावेत.
- उद्यम पोर्टल वर नोंदणी केलेली असावी.
- आर्थिक तसेच अर्जातील इतर माहिती अचूक भरावी.
- GST प्रमाणपत्र आणि बँक तपशील वेगळे नसावेत.
- अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरावी.
Startup Maharashtra Scheme /MSME अनुदान योजना ही महाराष्ट्रातील उद्योजकांसाठी उत्तम संधी आहे. या योजनेअंतर्गत सरकारतर्फे आर्थिक मदती बरोबरच प्रशिक्षण आणि सवलतीच्या साहाय्याने उद्योग सुरू करणे तसेच तो वाढवणे सोपे झाले आहे. तुमच्याकडे कल्पना आहे आणि तुमची मेहनत करण्याची तयारी असेल तर ही सरकारी योजना ही तुम्हाला उपयोगी पडू शकते.
अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा
इतर महत्वाच्या लिंक्स
Start Up Maharashtra – इथे क्लिक करा
उद्यम रजिस्ट्रेशन – इथे क्लिक करा
Start up India – इथे क्लिक करा
योजनांच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा
व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा
आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा
FAQ
Start Up Maharashtra योजना म्हणजे काय?
स्टार्ट अप महाराष्ट्र ही राज्य सरकारची योजना असून नवीन उद्योजक आणि स्टार्ट अप ला सीड फंडिंग,अनुदान ,प्रशिक्षण आणि मार्गदर्शन देते.
MSME योजना काय आहे?
MSME योजना ही सूक्ष्म , लघु आणि मध्यम उद्योगांसाठी भांडवली अनुदान ,व्याज सवलत ,कर्ज सहाय्य देते.
Start Up आणि MSME यात काय फरक आहे?
Start up — नाविन्यपूर्ण व्यवसाय,DPIT मान्यता आवश्यक
MSME- पारंपरिक/सेवा/उत्पादन उद्योग ,Udyam Registration आवश्यक
पात्रता काय आहे?
उमेदवार महाराष्ट्राचा रहिवाशी असावा.
वय १८ वर्षापेक्षा जास्त असावे.
व्यवसाय हा नोंदणीकृत असावा.
MSME साठी उद्यम नोंदणी असणे आवश्यक.
स्टार्टअप साठी Start Up India (DPIT) Recognition
किती अनुदान मिळते?
MSME साठी -१५% ते ३५% भांडवली अनुदान
StartUp साठी ₹१० लाख ते ₹५० लाख सीड फन्डिंग
कर्जावर व्याज सवलत मिळते का?
हो, MSME कर्जावर ३% ते ७% पर्यंत व्याज सवलत मिळते.
महिला उद्योजकांसाठी वेगळे फायदे आहेत का?
हो, महिला,OBC/SC/ST , दिव्यांग उद्योजकांना जास्त अनुदान व प्राधान्य दिले जाते.
कोणते उद्योग पात्र आहेत ?
Manufacturing,Service,Agri Startup
अनुदान थेट बँक खात्यात जमा होते का?
हो, अर्जदाराने नमूद केलेल्या बँक खात्यात थेट जमा होते.
Project Report आवश्यक आहे का?
हो. आवश्यक आहे.
