Mukhyamantri Vayoshri Yojana – ज्येष्ठ नागरिकांना आता मिळणार ३००० रुपये

(Mukhyamantri Vayoshri Yojana)२०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येच्या अंदाजे १० ते १२ टक्के ज्येष्ठ नागरिक आहेत. यापैकी बऱ्याच जणांना कोणत्या ना कोणत्या अपंगत्वाचा सामना करावा लागतो.या ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत राहण्यासाठी आणि त्यांना वयोमानानुसार येणारे अपंगत्व /अशक्तपणा यावर उपाय योजना करण्यास आवश्यक सहाय्य साधने/उपकरणे खरेदी करण्यासाठी राज्यात Mukhyamantri Vayoshri Yojana सुरू करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे.

Mukhyamantri Vayoshri Yojana

Table of Contents

Mukhyamantri Vayoshri Yojana ध्येय आणि उद्दिष्टे

६५ वर्ष आणि त्यापेक्षा अधिक वय असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानानुसार येणारे अपंगत्व ,अशक्तपणा यावर उपाय करण्यास लागणारे सहाय्य साधने /उपकरणे खरेदी करण्यासाठी आणि मनःस्वास्थ्य केंद्र ,योगोपचार केंद्र यांच्या साहाय्याने त्यांचे मानसिक स्वास्थ्य चांगले राहण्यासाठी प्रबोधन आणि प्रशिक्षणासाठी एक रक्कमी ₹३०००/- पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात थेट लाभ वितरण (D.B.T) प्रणालीच्या साहाय्याने लाभ देणे.

योजनेचे स्वरूप

  • Mukhymantri Vayoshri Yojana अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना खालील उपकरणे खरेदी करता येतील.
    • चष्मा
    • श्रवणयंत्र
    • ट्रायपॉड,स्टिक व्हील चेअर
    • फोल्डिंग वॉकर
    • कमोड खुर्ची
    • नि – ब्रेस
    • लंबर बेल्ट
    • सर्वाइकल कॉलर
  • केंद्र सरकारच्या कार्मिक विभागाद्वारे नोंदणीकृत करण्यात आलेले तसेच राज्य शासनाद्वारे नोंदणीकृत असलेल्या योगोपचार केंद्र/मनः स्वास्थ केंद्र/मनशक्ती केंद्र /प्रशिक्षण केंद्र येते सहभागी होता येईल.

Mukhymantri Vayoshree yojana निधीचे वितरण /अर्थसहाय्य

  • Mukhymantri Vayoshree yojana साठी निधीचे वितरण हे खालीलप्रमाणे असेल,
    • राज्य शासनाकडून १००% अर्थसहाय्य
    • थेट लाभ प्रणालीद्वारे रु ३०००/- निधी मिळेल.
    • शिबिराचे आयोजन करणे
      • सार्वजनिक आरोग्य केंद्र ,उप केंद्र,उपजिल्हा रुग्णालय यांच्या कडून
        • असंर्ग जन्य रोग सर्वेक्षण तसेच माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियाना अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांची सर्वेक्षण आणि स्क्रीनिंग घरी जाऊन करण्यात येईल.
    • लाभार्थ्यांची तपासणी,प्रवास,अल्पोपहार.कार्यालयीन खर्च,पात्र लाभार्थी यांची नोंदणी,दस्तावेज हाताळणी,कागदपत्र तपासणी करून लाभार्त्याना थेट लाभ वितरीत करणे.
    • लाभार्थ्यास लाभ प्रमाणपत्र वाटप करण्यास रु २००/- अंदाजे खर्च येईल.

Mukhyamantri Vayoshree yojana अंमलबजावणी

Mukhyamantri Vayoshri Yojana अंमलबजावणी न्याय व विशेष सहाय्य विभाग ,मंत्रालय,आयुक्त समाज कल्याण विभाग,पुणे आणि जिल्हा स्तरावरील अंमलबजावणी समिती यांच्या देखरेख आणि नियंत्रणात असेल.

राज्य नोडल एजन्सी कार्ये (Mukhyamantri Vayoshri Yojana)

  • राज्य नोडल एजन्सीची कार्ये खालीलप्रमाणे,
    • लाभार्थ्यांची निवड करणे.
    • लाभार्थ्यांच्या आवश्यक त्या कागदपत्रांची तपासणी करणे.
    • लाभार्थ्यांच्या आधार क्रमांक ,बँक खाते यांची माहिती गोळा करणे.
  • महानगरपालिका स्तरावर समिती
    • अध्यक्ष – आयुक्त महानगरपालिका
    • सदस्य –
      • वैद्यकीय अधिकारी, महानगर पालिका ,
      • महिला व बाल विकास अधिकारी
    • सचिव सदस्य – सहाय्यक आयुक्त ,समाज कल्याण
  • जिल्हा स्तर समिती
    • अध्यक्ष – जिल्हाधिकारी
    • सह अध्यक्ष – मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद
    • सदस्य –
      • जिल्हा आरोग्य अधिकारी ,जिल्हा परिषद ,
      • जिल्हा शल्य चिकित्सक,आरोग्य विभाग ,
      • सह संचालक /समकक्ष अधिकारी महिला व बाल विकास
    • सदस्य सचिव
      • सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण
      • जिल्हा समाज कल्याण अधिकारी

Mukhyamantri Vayoshri Yojana साठी पात्रता आणि निकष

  • ३१/१२/२०२३ अखेर पर्यंत लाभार्थ्यांचे वय ६५ वर्ष पूर्ण असावे.
  • ज्या व्यक्तीचे वय ६५ वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक असेल ती व्यक्तींना आधार कार्ड असणे अनिवार्य आहे किंवा आधारकार्डसाठी अर्ज केलेला असावा आणि नोंदणीची पावती असावी.
  • जिल्हा प्राधिकरण प्रमाणपत्र किंवा बीपीएल रेशन कार्ड किंवा राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रम अंतर्गत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन किंवा राज्य /केंद्रशासित सरकारच्या इतर कोणत्याही पेन्शन योजने अंतर्गत वृद्धापकाळ निवृत्ती वेतन मिळाल्याचा पुरावा.
  • कौटुंबिक वार्षिक उत्पन्न ₹२ लाखाच्या आत असणे आवश्यक.या बाबतचे स्वयंघोषणापत्र सादर करणे आवश्यक.
  • सदरच्या व्यक्तीने कोणत्याही सरकारी योजने अंतर्गत लागणार उपकरण घेतलेले नसावे. याबाबतचे स्वयंघोषणापत्र सादर करणे आवश्यक. उपकरण जर खराब झाले असेल किंवा कामच करत नसेल अश्या परिस्थितीत परवानगी दिली जाऊ शकते.
  • Mukhymantri Vayoshri Yojana पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात ₹३०००/- थेट जमा केले जातील. ही पैसे जमा झाल्याच्या ३० दिवसाच्या आत लाभार्थ्याने उपकरण घेतल्याचे तसेच मनःस्वास्थ्य केंद्रावर प्रशिक्षण घेतल्याची पावती अपलोड करणे आवश्यक आहे. तसे न केल्यास लाभार्थ्याकडून ही रक्कम वसूल केली जाईल.
  • लाभार्थ्यांच्या एकूण संख्येपैकी ३०% महिला असतील.

Mukhyamantri Vayoshri Yojana लागणारी कागदपत्रे

  • आधारकार्ड /मतदान ओळखपत्र
  • राष्ट्रीयकृत बँकेची बँक पासबुक झेरॉक्स
  • पासपोर्ट आकाराचा दोन फोटो
  • स्वयं घोषणापत्र
  • शासनाने ओळखपत्र पटविण्यासाठी विहित केलेली कागदपत्र

Mukhymantri Vayoshree Yojana मार्गदर्शक तत्वे

  • नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांची कागदपत्र तपासणी,आधार प्रमाणिकरण, हमीपत्र ,बँक लिंकेज तपासून शिबिरासाठी नेमणूक झालेल्या प्राधिकृत अधिकाऱ्यातर्फे प्रमाणित करून घेण्यात येईल. आणि ही माहिती ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने जतन केला जाईल.
  • मूल्यमापन पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांना इ टोकन दिले जाईल. ऑफलाईन पद्धत मध्ये नोंदणी पावती दिली जाईल.
  • जिल्हा आणि महापालिका स्तरावरील मुल्यमापन झाल्यानंतर पात्र लाभार्थ्यांची माहिती ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने आयुक्त समाज कल्याण ,पुणे /सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग ,मंत्रालय ,मुंबई यांच्याकडे PSU द्वारे सादर केला जाईल.
  • पात्र लाभार्थ्यांची यादी,नाव,फोटो आणि लिंग तसेच नाव,बँक खाते,आधार क्रमांक, बीपीएल कार्ड क्रमांक तपशीलवार माहिती आयुक्तालया मार्फत वेबसाईट वर उपलब्ध करून दिली जाईल.
  • तक्रार निवारण ,अभिप्राय साठी स्वतंत्र यंत्रणा तयार करण्यात येईल.

सहाय्य प्रदान करण्यासाठीची मार्गदर्शक तत्वे

  • आयुक्त ,समाज कल्याण जिल्हास्तरीय अंमलबजावणी समिती कडून संभाव्य लाभार्थ्यांची ओळख /शहानिशा करून सर्व मार्गदर्शक तत्वे आणि अटी इत्यादींची खात्री करून लाभार्थ्यांची अंतिम यादी तयार करतील.
  • CPSU द्वारे लाभार्थ्याकडून मिळणारी रक्कम ही नमूद केलेल्या कामास वापरण्यात येईल असे स्वयं घोषणापत्र घ्यावे आणि राष्ट्रीय किंवा केंद्र पुरस्कृत समकक्ष योजनेचा लाभ घेतला नसल्याचे त्यात नमूद करून घ्यावे.
  • योजनेच्या अंमलबजावणी ची तपासणी करण्याचा अधिकार सामाजिक न्याय विभागाकडे असेल.
  • योजनेमधून मिळणाऱ्या निधीस स्वतंत्र खते उघडले जाईल.योजने अंतर्गत कार्यान्वित होण्यासाठी निधी स्वतंत्र बँक खात्यात ठेवला जाऊ शकतो.
  • Mukhyamantri Vayoshri Yojana पात्र लाभार्थ्यांना D.B.T द्वार रक्कम प्रदान केली जाईल. अखर्चिक रक्कम ,D.B.T मध्ये अडचण आल्यामुळे लाभार्थ्यांच्या खात्यात जमा न झालेली रक्कम विभागाच्या खात्यात जमा केली जाईल.
  • आर्थिक वर्षाचे खाते आर्थिक वर्ष संपल्यावर सहा महिन्याच्या आत किंवा पुढील मंजुरी यापैकी जे आधी असेल ,जे उपयोगिता प्रमाणपत्र आणि अंमलबजावणी यंत्रणेच्या सक्षम अधिकाऱ्याने स्वाक्षरी केलेल्या लेखा परीक्षित खात्याद्वारे प्रस्तुत केले जाईल.

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

जाहिरातीसाठी – इथे क्लिक करा

अर्जासाठी – इथे क्लिक करा

योजनेच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून जॉईन किंवा फॉलो करा

व्हॉट्स अँप ग्रुप लिंक- इथे क्लिक करा

टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा


Articles

Lek Ladaki Yojana मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी सरकारची योजना

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये अप्रेंटिस पदासाठी १००७ जागांवर भरती

एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया मध्ये ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह पदासाठी ३०९ जागांवर भरती

न्युक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये एक्झिक्युटिव्ह ट्रेनी पदासाठी ४०० जागांवर भरती

कर्मचारी राज्य विमा निगम (ESIC) मध्ये स्पेशालिस्ट पदासाठी ५५८ जागांवर भरती