लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मध्ये विविध पदांसाठी ३७५ जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. इच्छुक पात्र उमेदवारांनी LDCC Bank Bharti 2025 साठी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून १८/१२/२०२५ ते २१/०१/२०२६ या दरम्यान जमा करायचे आहेत. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

जाहिरात क्र.
Table of Contents
रिक्त पदांचा तपशील (LDCC Bank Bharti 2025)
| अ.क्र | पदाचे नाव | पद संख्या |
| ०१ | लिपिक (लेखनिक/क्लेरिकल) | २५० |
| ०२ | शिपाई (Subgrade/Multipurpose support Staff) | ११५ |
| ०३ | वाहन चालक (ड्रायवर) | १० |
| एकूण | ३७५ |
शैक्षणिक अर्हता (LDCC Bank Bharti 2025)
- पद क्र १-
- उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण असावा.
- उमेदवार हा मान्यताप्राप्त संस्थेची MS -CIT प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर असावा.
- पद क्र २-
- उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून इयत्ता १२ वी परीक्षा किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण असावा.
- पद क्र ३
- उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून इयत्ता १२ वी परीक्षा किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण असावा.
- उमेदवाराकडे हलके वाहन चालवण्याचा परवाना असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा(LDCC Bank Bharti 2025)
- ३०/११/२०२५ रोजी उमेदवाराची वयोमर्यादा खालीलप्रमाणे,
- पद क्र १- उमेदवाराचे किमान वय २१ वर्ष आणि कमाल वय ३० वर्ष असावे.
- पद क्र २ आणि ३ – उमेदवाराचे किमान वय १९ वर्ष आणि कमाल वय २८ वर्ष असावे.
अर्ज कसा करावा
- इच्छुक पात्र उमेदवारांनी LDCC Bank Bharti 2025 साठी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून १८/१२/२०२५ ते २१/०१/२०२५या दरम्यान जमा करायचे आहेत.
- अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.
- अर्ज करण्यासाठीच्या स्टेप्स
- रजिस्ट्रेशन- उमेदवारांनी प्रथम स्वतःला अधिकृत संकेतस्थळावर रजिस्टर करून घ्यावे.
- अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरावी.
- आवश्यक ती सर्व कागदपत्र अपलोड करून घ्यावी.
अर्ज शुल्क (LDCC Bank Bharti 2025)
अर्ज शुल्क बाबत अद्यापही जाहिरातीत कोणतीही माहिती प्रसिध्द झालेली नाही.
कागदपत्र
- सर्व शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र
- जन्म तारखेचा पुरावा
- फोटो ओळखपत्र
- जात प्रमाणपत्र
- रहिवासी प्रमाणपत्र
महत्वाच्या सूचना
- उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी LDCC Bank Bharti 2025 साठीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
- या भरतीमध्ये एकूण ७०% जागा या लातूर जिल्ह्यातील आणि ३०% जागा या इतर जिल्ह्यातील भरल्या जातील.
- इतर जिल्ह्यातील उमेदवार उपलब्ध न झाल्यास जिल्ह्यातील पात्र उमेदवारामधून निवडले जातील.
- रजिस्टर करताना दिलेला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
- चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्धवट भरलेला अर्ज रद्द करण्यात येईल.
- जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे/ वाढवणे तसेच भरतीप्रक्रिया रद्द करणे/ पुढे ढकलणे/स्थगित करणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
- भरती करण्याबाबत कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
महत्वाच्या तारखा (LDCC Bank Bharti 2025)
अर्ज करण्यासाठी सुरुवातीची तारीख – १८/१२/२०२५
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख – २१/०१/२०२५
अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा
नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा
व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा
आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा
