Bank Of India या भारतातील अग्रगण्य बँकेत विविध स्केल च्या क्रेडिट ऑफिसर पदासाठी ५१४ जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. क्रेडिट ऑफिसर ही एक महत्त्वाची पोस्ट आहे. BOI Credit Officer Bharti 2025 साठीची ही भरती ही बँकिंग क्षेत्रातील मध्य ते वरिष्ठ व्यवस्थापन पदासाठी आहे.या पदाची जबाबदारी कर्ज, आर्थिक विश्लेषण रिस्क व्यवस्थापन आणि ग्राहक संबंध या गोष्टींवर आधारित आहे. इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून २०/१२/२०२५ ते ०५/०१/२०२६ या दरम्यान जमा करायचे आहेत. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे ,

जाहिरात क्र
Table of Contents
रिक्त पदांचा तपशील
खाली नमूद केलेल्या BOI Credit Officer Bharti 2025 साठीच्या जागांची संख्या ही विविध प्रवर्गानुसार राखीव असतील.
| अ.क्र | पदाचे नाव | पद संख्या |
| ०१ | क्रेडिट ऑफिसर (SMGS -IV) | ३६ |
| ०२ | क्रेडिट ऑफिसर (MMGS -III) | ६० |
| ०३ | क्रेडिट ऑफिसर (MMGS -II) | ४१८ |
| एकूण | ५१४ |
शैक्षणिक अर्हता (BOI Credit Officer Bharti 2025)
- पद क्र १-
- उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचीकोणत्याही शाखेची पदवी परीक्षा किमान ६०% गुणांसह (SC/ST/OBC/अपंग उमेदवार किमान ५५% गुणांसह) उत्तीर्ण असावा. किंवा
- उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची MBA/PGDBM परीक्षा उत्तीर्ण असावा. किंवा
- उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची दोन वर्ष कालावधीची कोणत्याही शाखेची पदव्युत्तर पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा. किंवा
- उमेदवार हा मान्यताप्राप्त संस्थेची CA/CFA/CMA -ICWA परीक्षा उत्तीर्ण असावा.
- उमेदवारास किमान ८ वर्ष कालावधीचा अनुभव असावा.
- पद क्र २-
- उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा किमान ६०% गुणांसह (SC/ST/OBC/अपंग उमेदवार किमान ५५% गुणांसह) उत्तीर्ण असावा.
- उमेदवार किमान ५ वर्ष कालावधीचा अनुभव असावा.
- पद क्र ३-
- उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी परीक्षा किमान ६०% गुणांसह (SC /ST/OBC/अपंग उमेदवार किमान ५५% गुणांसह)उत्तीर्ण असावा.
- किमान ३ वर्ष कालावधीचा अनुभव असावा.
वयोमर्यादा (BOI Credit Officer Bharti 2025)
- पद क्र १- उमेदवाराचे किमान वय ३० वर्ष आणि कमाल वय ४० वर्ष असावे.
- पद क्र २- उमेदवाराचे किमान वय २८ वर्ष आणि कमाल वय ३८ वर्ष असावे.
- पद क्र ३- उमेदवाराचे किमान वय २५ वर्ष आणि कमाल वय ३५ वर्ष असावे.
- SC/ST प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ५ वर्ष शिथिलता राहील.
- OBC प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ३ वर्ष शिथिलता राहील.
- PwBD उमेदवारांना कमाल वयात १० वर्ष शिथिलता राहील.
- १९८४ च्या दंगलग्रस्त उमेदवारांना कमाल वयात ५ वर्ष शिथिलता राहील.
वेतन श्रेणी
- पद क्र १- उमेदवारांना नोकरीत रुजू झाल्यानंतर ₹१,०२,३००/- ते ₹१,२०,९४०/- प्रति महिना वेतन अदा केले जाईल.
- पद क्र २- उमेदवारांना नोकरीत रुजू झाल्यानंतर ₹ ८५,९२०/- ते ₹ १,०५,२८०/- प्रति महिना वेतन अदा केले जाईल.
- पद क्र ३- उमेदवारांना नोकरीत रुजू झाल्यानंतर ₹६४,८००/- ते ₹९३,९६०/- प्रति महिना वेतन अदा केले जाईल.
अर्ज कसा करावा
- इच्छुक पात्र उमेदवारांनी BOI Credit Officer Bharti 2025 साठीचे त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून २०/१२/२०२५ ते ०५/०१/२०२६ या दरम्यान जमा करायचे आहेत.
- अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.
- अर्ज करण्यासाठीच्या स्टेप्स
- रजिस्ट्रेशन – उमेदवारांनी प्रथम स्वतःला अधिकृत संकेतस्थळावर रजिस्टर करून घ्यावे.
- अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरावी.
- आवश्यक ती सर्व कागदपत्र अपलोड करून घ्यावी.
- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करून घ्यावे.
- अर्ज सबमिट करून त्याची प्रिंट काढून घ्यावी.
अर्ज शुल्क
- खुल्या/OBC/EWS प्रवर्गातील उमेदवारांनी ₹८५०/- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करून घ्यावे.
- SC/ST/PwBD प्रवर्गातील उमेदवारांनी ₹१७५/- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करून घ्यावे.
- अर्ज शुल्क हे ना परतावा असून एकदा भरलेले अर्ज शुल्क हे कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.
- अर्ज शुल्क हे उमेदवारांनी क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड इंटरनेट बँकिंग यांच्या साहाय्याने ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत. इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज शुल्क स्वीकारले जाणार नाही.
निवड प्रक्रिया
- BOI Credit Officer Bharti 2025 साठीच्या वरील पदाच्या भरतीसाठी निवडप्रक्रिया ही खालीलप्रमाणे होऊ शकते.
- ऑनलाईन परीक्षा –
- English Langauge – २५ प्रश्न,२५ गुण
- Reasoning – २५ प्रश्न,२५ गुण
- Quantitative Aptitude -२५ गुण ,२५ प्रश्न
- Professional Knowledge – ७५ प्रश्न ,७५ गुण
- एकूण – १५० प्रश्न ,१५० गुण, वेळ -१२० मिनिटे
- मुलाखत
- अंतिम निवड यादी
- ऑनलाईन परीक्षा –
कागदपत्र
- मुलाखतीच्या कॉल लेटर ची प्रिंट
- अर्जाची प्रिंट
- जन्म तारखेचा पुरावा
- फोटो ओळखपत्र
- सर्व शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र व गुणपत्र
- जात प्रमाणपत्र
- EWS असल्यास इन्कम आणि ॲसेट प्रमाणपत्र
- अपंग असल्यास प्रमाणपत्र
- माजी सैनिक असल्यास डिस्चार्ज बुक किंवा पेन्शन पेमेंट ऑर्डर
- सरकारी कर्मचारी असल्यास ना हरकत प्रमाणपत्र
- अनुभवाचे प्रमाणपत्र
- अर्हता सादर करणारे इतर कोणतेही कागदपत्र
महत्वाच्या सूचना
- अर्ज करण्यापूर्वी BOI Credit Officer Bharti 2025 साठीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
- रजिस्टर करताना दिलेला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
- चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्धवट भरलेला अर्ज तसेच अर्ज शुल्क न भरलेले अर्ज रद्द केले जातील.
- जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे/ वाढवणे तसेच भरतीप्रक्रिया रद्द करणे पुढे ढकलणे स्थगित करणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
- भरती करण्याबाबत कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
महत्वाच्या तारखा
अर्ज करण्यासाठी सुरुवातीची तारीख – २०/१२/२०२५
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख – ०५/०१/२०२५
अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा
नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा
व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा
आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा
