(Bombay High Court Bharti 2025)मुंबई उच्च न्यायालयात विविध पदांसाठी २३३१ जागांवर भरती

मुंबई उच्च न्यायालयात विविध पदांसाठी २३३१ जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. इच्छुक पात्र उमेदवारांनी Bombay High Court Bharti 2025 साठी त्यांचे अर्ज १५/१२/२०२५ ते ०५/०१/२०२६ यादरम्यान ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

Bombay High Court Bharti 2025

जाहीरात क्र –

रिक्त पदांचा तपशील (Bombay High Court Bharti 2025)

अ.क्रपदाचे नावपदसंख्या
०१लघुलेखक (उच्चश्रेणी)१९
०२लघुलेखक (निम्नश्रेणी)५६
०३लिपिक१३३६
०४वाहनचालक (स्टाफ कार ड्रायव्हर)३७
०५शिपाई/हमाल/फरश८८७
एकुण२३३१

शैक्षणिक अर्हता (Bombay High Court Bharti 2025)

  • पद क्र १-
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी उत्तीर्ण असावा.
    • शॉर्ट हॅण्ड गती १०० शब्द प्रती मिनिट
    • इंग्रजी टायपींग – ४० शब्द प्रती मिनिट
  • पद क्र २
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • शॉर्ट हॅण्ड टायपिंग गती -८० शब्द प्रती मिनिट
    • इंग्रजी टायपींग-४० शब्द प्रती मिनिट
  • पद क्र ३
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त संस्थेतून बेसिक संगणक टायपिंग प्रमाणपत्र (GCC – TBC)परीक्षा किंवा ITI इंग्रजी टायपिंग ४० शब्द प्रति मिनिट गतीसह उत्तीर्ण असावा.
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त संस्थेतून MS -CIT किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण असावा.
  • पद क्र ४
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून इयत्ता १० वी परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • उमेदवाराकडे हलके मोटर वाहन चालवण्याचा चालक परवाना असावा.
    • उमेदवारास किमान ३ वर्ष कालावधीचा अनुभव असावा.
  • पद क्र ५
    • उमेदवार हा किमान ७ वी उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा (Bombay High Court Bharti 2025)

  • ०८/१२/२०२५ रोजी उमेदवाराचे वय हे खाली नमूद केल्याप्रमाणे असावे.
    • पद क्र १ ,२,४- उमेदवाराचे किमान वय २१ वर्ष आणि कमाल वय ३८ वर्ष असावे.
    • पद क्र ३ आणि ५ – उमेदवाराचे किमान वय १८ वर्ष आणि कमाल वय ३८ वर्ष असावे.
  • राखीव प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ५ वर्ष शिथिलता राहील.

वेतन श्रेणी

  • पद क्र १- रु ५६,१००/- ते ₹१,७७,५००/- प्रति महिना वेतन अदा केले जाईल.
  • पद क्र २- ₹४९,१००/- ते ₹ १,५५,८००/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
  • पद क्र ३- ₹२९,२००/- ते ₹९२,३००/- प्रति महिना वेतन अदा केले जाईल.
  • पद क्र ४- ₹२९,२००/- ते ₹९२,३००/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
  • पद क्र ५- ₹१६,६००/- ते ₹५२,४००/- प्रति महिना वेतन अदा केले जाईल.

अर्ज कसा करावा

  • इच्छुक पात्र उमेदवारांनी Bombay Highcourt Bharti 2025 साठीचे त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून १५/१२/२०२५ ते ०५/०१/२०२६ या दरम्यान जमा करायचे आहेत.
  • अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत. इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.
  • अर्ज करण्यासाठीच्या स्टेप्स
    • रजिस्ट्रेशन- उमेदवारांनी प्रथम स्वतःला अधिकृत संकेतस्थळावर रजिस्टर करून घ्यावे.
    • अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरावी.
    • आवश्यक ती सर्व कागदपत्रे अपलोड करून घ्यावी.
    • अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करून घ्यावे.

अर्ज शुल्क

  • इच्छुक पात्र उमेदवारांनी Bombay High Court Bharti 2025 साठी ₹१०००/- अर्ज शुल्क हे SBI collect च्या साहाय्याने ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
  • इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज शुल्क स्वीकारले जाणार नाही.
  • अर्ज शुल्क हे ना परतावा असून एकदा भरलेले अर्ज शुल्क कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.
  • अर्ज शुल्क हे उमेदवारांनी SBI Collect च्या सहाय्याने ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत. इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज शुल्क स्वीकारले जार नाही.

महत्वाच्या सूचना

  • उमेदवारांनी Bombay High Court Bharti 2025 साठी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्यची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • उमेदवार हा भारताचा नागरिक असावा.
  • उमेदवाराचे चारित्र्य आणि वर्तणूक चांगली असावी.
  • उमेदवारास फौजदारी न्यायालयाने कोणत्याही प्रकारे दोषी ठरवले नसावे. तसेच उमेदवारावर कोणत्याही प्रकारचा प्रलंबित फौजदारी खटला नसावा.
  • रजिस्टर करताना दिलेले इमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरु असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
  • चुकीची किंवा खोटी माहिती माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरवले जाईल
  • अर्धवट भरलेले अर्ज तसेच अर्ज शुल्क न भरलेले अर्ज रद्द करण्यात येतील.
  • जाहिरातीत नमूद केलेल्या जगानाची संख्या कमी करणे /वाढवणे तसेच भरती प्रक्रिया रद्द करणे /पुढे ढकलणे /स्थगित करणे याबाबतचे सर्व निर्णय व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
  • भरती करण्याबाबत कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरवण्यात येईल.

महत्वाच्या तारखा

अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख – १५/१२/२०२५

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – ०५/०१/२०२६

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

जाहिरातीसाठी

पद क्र १ – इथे क्लिक करा

पद क्र २ – इथे क्लिक करा

पद क्र ३ – इथे क्लिक करा

पद क्र ४ – इथे क्लिक करा

पद क्र ५ – इथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी –

पद क्र १- इथे क्लिक करा

पद क्र २- इथे क्लिक करा

पद क्र ३- इथे क्लिक करा

पद क्र ४- इथे क्लिक करा

पद क्र ५- इथे क्लिक करा

नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून जॉईन किंवा फॉलो करा

Whats App ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

आमच्या इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा


Article

इंडियन ऑईल मध्ये अप्रेंटीस पदासाठी ५०९ जागांवर भरती

 RITES Limited मध्ये सिनिअर टेक्निकल असिस्टंट पदासाठी १५० जागांवर भरती

प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना – सर्व सामान्य लोकांना परवडणारी विमा योजना

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना -युवकांना आता मिळणार उद्योजाकांसोबत व्यवहारिक प्रशिक्षण

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (MGNREGA)- ग्रामीण बेरोजगारांना वर्षाला १०० दिवस रोजगाराची हमी

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top