RITES Limited मध्ये अप्रेंटिस पदासाठी 252 जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.इच्छुक पात्र उमेदवारांनी RITES Apprentice 2025 साठीचे त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून 17/11/2025 ते 05/12/2025 या दरम्यान जमा करायचे आहेत.सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

जाहिरात क्र.
Table of Contents
रिक्त पदांचा तपशील (RITES Apprentice 2025)
| अ.क्र | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | पदवीधर अप्रेंटिस (इंजिनियरिंग) | 110 |
| 2 | पदवीधर अप्रेंटिस (नॉन इंजिनियरिंग) | 36 |
| 3 | डिप्लोमा अप्रेंटिस | 49 |
| 4 | ट्रेड अप्रेंटिस | 57 |
| एकूण | 252 |
शैक्षणिक अर्हता (RITES Apprentice 2025)
वरील पदासाठी अर्ज करण्यास पात्र असण्यासाठी उमेदवार हे पुढे नमूद केलेल्या परीक्षांमध्ये (खुल्या आणि आर्थिक दुर्बल घटक उमेदवार किमान ६०% गुणांसह/अजा/अज/इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवार तसेच अपंग उमेदवार किमान ५०% गुणांसह) उत्तीर्ण असावे.
- पद क्र 1-
- उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची Civil/Architecture/Electrical/Signal & Telecom/Mechanical/Chemical/Mettalurgical शाखेतून B E/B.Tech/B.Arch पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
- पद क्र २-
- उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची BA/BBA/B.Com /B.Sc /BCA पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
- पद क्र ३
- उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून Civil/Electrical/Mechanical/Chemical/Metallurgical शाखेतून डिप्लोमा अभियांत्रिकी परीक्षा उत्तीर्ण असावा.
- पद क्र४-
- उमेदवार हा मान्यताप्राप्त संस्थेतून Civil/Mechanical/Electrical/Welder/Fitter/Plumber/Turner शाखेतून ITI परीक्षा उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा
१७/११/२०२५ रोजी उमेदवाराचे वय १८ वर्षापेक्षा जास्त असावे.
वेतन श्रेणी (RITES Apprentice 2025)
- पद क्र १ आणि २- उमेदवारांना नोकरीत रुजू झाल्यानंतर ₹१४,०००/- प्रती महिना स्टायपंड अदा केले जाईल.
- पद क्र ३- उमेदवारांना नोकरीत रुजू झाल्यानंतर ₹१२,०००/- प्रती महिना स्टायपंड अदा केले जाईल.
- पद क्र ४- उमेदवारांना नोकरीत रुजू झाल्यानंतर ₹१०,०००/- प्रती महिना स्टायपंड अदा केले जाईल.
अर्ज कसा करावा
- इच्छुक पात्र उमेदवारांनी RITES Apprentice 2025 साठीचे त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून १७/११/२०२५ ते ०५/१२/२०२५ या दरम्यान जमा करायचे आहेत.
- अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.
- अर्ज करण्यासाठीच्या स्टेप्स
- रजिस्ट्रेशन- उमेदवारांनी प्रथम स्वतःला अधिकृत संकेतस्थळावरून रजिस्टर करून घ्यावे.
- अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरावी.
- आवश्यक ती सर्व कागदपत्रे अपलोड करून घ्यावी.
- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करून घ्यावे.
अर्ज शुल्क
वरील पदासाठी अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क असणार नाही.
निवड प्रक्रिया (RITES Apprentice 2025)
- NATS/NAPS कडून मिळालेल्या अर्ज आणि कागदपत्रांची पडताळणी करून त्यांना मिळालेल्याकीमा शैक्षणिक अर्हता परीक्षेतील गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल.
- गुणवत्ता यादीप्रमाणे निवड झालेल्या उमेदवारांना ईमेल द्वारे कळवले जाईल.
- निवड झालेल्या उमेदवारांनी नोकरीत रुजू होताना आवश्यक ती सर्व कागदपत्र सादर करावी.
कागदपत्र
- शैक्षणिक अर्हता गुणपत्र आणि प्रमाणपत्र
- जन्म तारखेचा पुरावा (१० वी प्रमाणपत्र, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स)
- ओळखपत्र (आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, निवडणूक ओळखपत्र)
- जात प्रमाणपत्र
- आर्थिक दुर्बल घटक प्रमाणपत्र
महत्वाच्या सूचना
- उमेदवारांनी RITES Apprentice 2025 साठीचे त्यांचे अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
- रजिस्टर करताना दिलेला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
- उमेदवार हा भारताचा नागरिक असावा.
- चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्धवट भरलेला अर्ज रद्द करण्यात येईल.
- जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे वाढवणे तसेच भरतीप्रक्रिया रद्द करणे पुढे ढकलणे स्थगित करणे याबाबतचे सर्व निर्णय व्यवस्थापनानेराखून ठेवलेले आहे.
- भरती करण्याबाबत कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
महत्वाच्या तारखा
अर्ज करण्यासाठी सुरुवातीची तारीख- १७/११/२०२५
अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – ०५/१२/२०२५
अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा
नोंदणी करण्यासाठी
पदवीधर/डिप्लोमा अप्रेंटिस – इथे क्लिक करा
ट्रेड अप्रेंटिस – इथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा
नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून जॉईन किंवा फॉलो करा.
व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा
आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा
