भारतामध्ये आजही भरपूर लोक विम्यापासून वंचित आहेत. त्यामागील कारणेही तशीच आहे. जास्त विम्याचे प्रीमियम, प्रक्रियेची गुंतागुंत ,कमी उत्पन्न, माहितीचा अभाव यासारखी अजूनही भरपूर कारणे आहेत ज्यामुळे लोक विम्याकडे दुर्लक्ष करतात. पण कुटुंबातील प्रमुख जो कमावत असेल त्याला जर काय झाले तर ते कुटुंब पूर्णपणे अडचणीत येते.
या समस्येचं महत्व ओळखून भारत सरकारने प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना सुरू केली आहे. PMJJB Yojana म्हणजे काय?, प्रीमियम किती, पात्रता काय,नोंदणी कशी करायची ,फायदे,महत्वाचे नियम याबद्दलची सविस्तर माहिती नक्की वाचा.

Table of Contents
PMJJB Yojana म्हणजे काय?
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना ही भारत सरकारने सुरू केलेली योजना आहे या योजने अंतर्गत नागरिकांना ₹४३६/- च्या प्रीमियम वर ₹२,००,०००/- पर्यंत कव्हर मिळते. प्रामुख्याने ही योजना गरीब,कामगार,निम्न मध्यमवर्ग,शेतकरी या सर्वांसाठी भरपूर उपयोगाची आहे. ही योजना ही शुद्ध टर्म योजना आहे. विमाधारकाचा मृत्यू झाल्यावरच पैसे मिळतील.
मुख्य उद्दिष्ट्ये
- सर्वसामान्य नागरिकांना जीवन विम्याची सुविधा देणे.
- आर्थिक दुर्बल घटकांना सुरक्षितता देणे.
- विमाधारकाचा मृत्यू झाल्यास कुटुंबास तातडीची आर्थिक मदत देणे.
- प्रत्येक कुटुंबाला विमा कवचाखाली आणणे.
- कमी प्रीमिअम मध्ये जास्त संरक्षण
PMJJB Yojana साठी प्रीमियम किती भरावा लागतो?
- या योजने अंतर्गत विमाधारकास वर्षाला ₹४३६/- प्रीमियम भरावा लागेल.
- प्रीमियम हे विमाधारकाच्या बँक खात्यातून ऑटो डेबिट होईल.
- प्रीमियम चे वाटप कसे असेल –
- विमा कंपनी -₹ ३९५/-
- व्यवसाय प्रतिनिधी , एजंट यांचे कमिशन (फक्त नवीन नोंदणीसाठी) – ₹३०/-
- सहभागी बँकांना प्रशासकीय खर्च म्हणून – ₹११/-
PMJJB Yojana अंतर्गत मिळणारे लाभ?
- विमाधारकास अपघाती किंवा नैसर्गिक मृत्यू आल्यास ₹२,००,०००/- जीवन विमा संरक्षण मिळेल.
- सर्व प्रकारच्या बँक खातेदारास या योजनेचा लाभ घेता येईल.
- वार्षिक फक्त ₹४३६/- म्हणजेच प्रती महिना फक्त ₹३६/- इतका प्रीमियम
- भारतातील कोणत्याही राज्यातील व्यक्ती या योजनेचा फायदा घेऊ शकतो.
योजनेसाठीची पात्रता
- PMJJB Yojana साठी पात्र असण्यासाठी उमेदवारांचे किमान वय १८ वर्ष आणि कमाल वय ५० वर्ष असावे.
- बँकेत किंवा पोस्टात वैयक्तिक किंवा जॉईंट खाते असणे आवश्यक आहे.
- बँक कीहाटे ही आधार कार्डशी लिंक असावे.
- उमेदवारांचे एकपेक्षा जास्त बँक खाती असतील तरी उमेदवारांनी कोणत्याही एकाच बँकेतून नोंदणी करावी.
कागदपत्र
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- २ पासपोर्ट आकाराचे फोटो
- अर्ज (बँकेत मिळतात)
- मोबाईल नंबर
अर्ज कसा करावा?
- PMJJB Yojana साठी अर्ज करण्यास इच्छुक व्यक्तीने ज्या बँकेत त्यांचे खाते असेल त्या बँकेला भेट द्या.
- तेथे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनाचा अर्ज घ्यावा.
- अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरावी.
- आधार नंबर आणि बँक खात्याचा तपशील अचूक भरावा.
- ऑटो डेबिट ची परवानगी द्यावी.
- अर्ज जमा करावा. अर्ज जमा केल्यानंतर बँक अर्जदाराची नोंदणी प्रक्रिया सुरू करते.
विम्याचा कालावधी
- भरलेल्या प्रीमियम चा कालावधी हा एक वर्षाचा असेल.(१ जून ते ३१ मे)
- या योजनेचा लाभ हा दरवर्षी प्रीमियम भरूनच घेता येतो.
कोणत्या बँक किंवा संस्थांमध्ये ही योजना वैध आहे ?
- सर्व राष्ट्रीयकृत बँक
- सर्व खाजगी बँक
- LIC
- पोस्ट ऑफिस
इन्शुरन्स कंपनी आणि बँकेचा काय रोल असेल ?
- PMJJB Yojana LIC ,बँक किंवा पोस्ट ऑफिस यांच्या भागीदारीत सेवा देण्यास इच्छुक असणाऱ्या इतर कोणत्याही इन्शुरन्स कंपनी द्वारे प्रशासित केली जाईल.
- या यायोजनेत सहभागी असणाऱ्या बँकांची/पोस्टची विमाधारकांकडून देय तारखेला किंवा त्यापूर्वी पर्यायानुसार योग्य तो प्रीमियम एका हप्त्यात वसूल करून तो इन्शुरन्स कंपनीकडे वर्ग करावा.
- आवश्यकतेनुसार नाव नोंदणी फॉर्म ,ऑटो डेबिटचे Authorisation /संमती सह स्वयं घोषणापत्र संबंधित बँक किंवा पोस्ट ऑफिस कडून मागून घेऊन राखून ठेवला जाईल. दाव्याच्या बाबतीत LIC /विमा कंपनी ते सदर करण्याची मागणी करू शकते . LIC आणि विमा कंपनीने ही कागदपत्रे मागवण्याचे अधिकार राखून ठेवलेले आहेत.
PMJJB Yojana साठी अपात्र ठरण्याची करणे?
- बँक खाते बंद होणे
- खात्यात प्रीमियम भरण्यास पुरेशे पैसे नसणे.
- ५० वर्ष पूर्ण असतील तर
- चुकीची माहिती दिली असेल तर
मृत्यू दाव्यासाठी काय करावे?
- प्रथम बँकेला माहिती द्या.
- मृत्यू प्रमाणपत्र, लाभार्थ्यांचे ओळखपत्र ,बँक तपशील ही सर्व कागदपत्र जोडून क्लेमचा अर्ज जमा करा.
- बँक हाया अर्ज तपासून विमा कंपनीकडे पाठवते.
- क्लेम पास झाल्यावर १५ दिवसात२,००,०००/- बँकेच्या खात्यात जमा होतात.
PMJJB Yojana समाजावरील परिणाम
- या योजने अंतर्गत गरीब कुटुंबांना आर्थिक सुरक्षा मिळते.
- अपघाती मृत्यू झाल्यास तातडीची मदत मिळेल.
- ग्रामीण कुटुंबांना मदत.
- विमा या विषयाबद्दल जागरूकता वाढली.
PMJBBY का घ्यावी ?
- कोणालाही परवडणारा विमा ज्यामुळे लोक टाळाटाळ करू शकणार नाही.
- कोणतेही हेल्थ चेक अप नाही.
- सोपी क्लेमची प्रक्रिया
- या विम्या अंतर्गत प्रत्येक कुटुंबाला आर्थिक सुरक्षा
- फक्त ₹१.२०/- प्रतिदिन खर्च
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना ही नागरिकांना कमी प्रीमिअम मध्ये जीवनाला संरक्षण देणारी योजना आहे. या योजनेमुळे सामान्य, गरीब , कामगार,शेतकरी, स्वयंरोजगार करणारे ,महिला जे जास्तीच्या प्रीमियम मुळे विमा उतरण्यास टाळाटाळ करतात अश्या सर्वांना सुरक्षा देते. फक्त ₹४३६/- मध्ये सामान्यातल्या सामान्य व्यक्तीला सुरक्षिततेचा विमा मिळतो हीच या योजनेची खरी ताकद आहे. आजच तुमचे खाते असणाऱ्या नजिकच्या बँकेला भेट देऊन ही विमा योजना सुरू करा आणि तुमच्या कुटुंबाला तुमच्या नंतर मदत मिळेल याची काळजी घ्या.
अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा
योजनेच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा
व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा
आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा
FAQ
PMJJBY मध्ये किती संरक्षण मिळते?
या योजनेअंतर्गत विमाधारकास ₹२ लाख पर्यंत संरक्षण मिळते.
प्रीमियम किती आहे ?
₹४३६/-
वय किती असावे?
१८ वर्ष ते ५० वर्ष या वयोगटातील लोक या विमा योजनेस पात्र असतील.
क्लेम किती दिवसात मिळतो ?
३० दिवस
कोणत्याही बँकेतून नोंदणी करता येते का?
होय
