आजकालच्या या वाढत्या महागाईच्या काळात वैद्यकीय खर्चही वाढत आहे.या वाढत्या वैद्यकीय सुविधांमुळे समाजातील ठराविक वर्गाला योग्य उपचार मिळणे दिवसेंदिवस अवघड होत चालले आहे. कॅन्सर ,किडनी, हृदय विकार, तसेच अपघातातील उपचाराचे खर्च हे लाखोंच्या घरात जातात. Mahatma Phule Jan Arogya Yojana ही समाजातील याच वर्गासाठी राज्य सरकारने महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना चालू केली आहे. ही योजना गरीब तसेच मध्यमवर्गीय लोकांसाठी एकप्रकारे वरदान ठरत आहे.
या योजने अंतर्गत लाखो नागरिकांना 2 लाख रुपयांपर्यंत मोफत कॅशलेस उपचाराची सुविधा सरकारने दिली आहे. 800 हून अधिक सरकारी तसेच खासगी रुग्णालयांमध्ये ही योजना सुरू आहे. महाराष्ट्रातील लोकप्रिय योजनांपैकी एक असणाऱ्या या योजनेबाबतची सर्व माहिती पुढे दिलेली आहे.

Table of Contents
Mahatma Phule Jan Aarogya Yojana योजना काय आहे ?
गरीब ,श्रमिक, शेतकरी आणि दुर्बल घटकांना ₹२,००,०००/- पर्यंत कॅशलेस मोफत उपचार या योजनेअंतर्गत दिला जातो. ही योजना पूर्वी राजीव गांधी आरोग्य योजना या नावाने ओळखली जायची पण २०१७ नंतर या योजनेचे नाव बदलून महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना ठेवण्यात आले.
प्रमुख उद्दिष्ट्ये
- आर्थिक दुर्बलांना मोफत उपचार
- दर्जेदार आरोग्य सेवा वेळेवर उपलब्ध करून देणे
- नागरिकांना कॅशलेस च्या साहाय्याने मोफत उपचार देणे जेणेकरून कायदेशीर गुंतागुंत कमी होईल.
- नागरिकांना शहरी आणि ग्रामीण भागात उत्तम उपचार देणे.
लाभ
- Mahatma Phule Jan Aarogya Yojana अंतर्गत पात्र प्रत्येक कुटुंबाला २ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार केला जाईल.
- कुटुंब फ्लोटर आधारावर दरवर्षी ५ लाख रुपयांचे आरोग्य कव्हर म्हणजेच ते कुटुंबातील एक किंवा सर्व सदस्य वापरू शकतात.
- या योजनेचा फायदा घेण्यासाठी पात्र उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे Premium, विमा भरण्याची गरज नाही.
- या योजने अंतर्गत हृदयविकार, कॅन्सर,डायलिसिस , मेंदू शस्त्रक्रिया,अपघाती शस्त्रक्रिया यासारख्या १४०० पेक्षा जास्त आजारांच्या उपचारांवर लाभ मिळेल.
- सर्वच्या सर्व पूर्व अस्तित्वात असलेले आजार पहिल्या दिवसापासून कव्हर केले जातात.
- ही योजना पूर्णपणे पेपरलेस आहे.सर्व प्रोसेस ऑनलाईन पोर्टल द्वारे होईल.
- सुमारे ८०० हून अधिक सरकारी किंवा खाजगी हॉस्पिटल मध्ये या योजनेचा लाभ मिळेल.
- या योजनेअंतर्गत होणारे उपचार ही Cashless असतील. या मुळे कोणत्याही प्रकारची गुंतागुंत असणार नाही.
- Follow Up उपचार म्हणजेच ऑपरेशन नंतर १० दिवस औषध आणि उपचार मोफत असेल.
योजनेसाठी पात्र असण्याच्या अटी
- Mahatma Phule Jan Aarogya Yojana साठी उमेदवार हा पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड धारक असावा.
- उमेदवार हा अंत्योदय कार्ड धारक असावा.
- विदर्भ /मराठवाड्यातील शेतकरी किंवा कोकण , उत्तर महाराष्ट्र किंवा पश्चिम महाराष्ट्रातील संकटग्रस्त शेतकरी असावे.
- पत्रकार , बांधकाम कामगार, गरीब किंवा वंचित प्रवर्गातील उमेदवार या योजनेसाठी पात्र असतील.
- राज्यातील सर्व आर्थिकदृष्ट्या कमजोर कुटुंबे या योजनेसाठी पात्र असतील.
कागदपत्र (Mahatma Phule Jan Aarogya Yojana)
- आधारकार्ड
- रेशन कार्ड
- निवासी दाखला
- फोटो
- हॉस्पिटल ने दिलेली पेशंटची स्लिप
- शेतकरी असल्यास ७/१२ उतारा
योजनेअंतर्गत येणारे आजार
Mahatma Phule Jan Aarogya Yojana अंतर्गत १४०० हून आजारांवर अधिक उपचार केले जातात. त्यातील काही प्रमुख आजार खालीलप्रमाणे,
- Cancer वरील उपचार – उदा. केमोथेरपी, रेडिएशन, शस्त्रक्रिया
- हृदयरोग वरील उपचार – उदा. अँजिओप्लास्टी, शस्त्रक्रिया
- मेंदू संबंधित आजार – उदा. ब्रेन ट्युमर, स्ट्रोक, स्पाइन शस्त्रक्रिया
- अपघात – फ्रॅक्चर, सांधे शस्त्रक्रिया , प्लास्टिक सर्जरी
- किडनीचे आजार – डायलिसिस, किडनी स्टोन
- मातृत्वाचे आजार – सिजेरियन,गुंतागुंतीची प्रसूती
- सामान्य किंवा विशेष शस्त्रक्रिया – हर्निया, अपेंडिक्स
योजनेअंतर्गत असणारे हॉस्पिटल
- या योजनेअंतर्गत राज्यातील ८०० हून अधिक रुग्णालये नोंदणीकृत आहेत.
- सरकारी रुग्णालय
- खाजगी रुग्णालय
- जिल्हा रुग्णालय
- ट्रस्ट रुग्णालय
- मेडिकल कॉलेज
Mahatma Phule Jan Aarogya Yojana अर्ज कसा करावा
- उमेदवारांनी प्रथम नजिकच्या नेटवर्क हॉस्पिटल मध्ये जाऊन तेथील आरोग्य मित्राला भेटावे.
- रुग्ण दाखल केल्यानंतर आरोग्य मित्र सर्व मदत करतील.
- आवश्यक ती सर्व कागदपत्रे जमा करावी.
- पात्रता तपासणी – पात्रता तपासणी ही आरोग्य मित्र करेल.
- पोर्टल वर पात्रता तपासणीत रुग्ण पात्र ठरल्यानंतर रुग्णालयात कॅशलेस उपचार सुरू होईल.
- डिस्चार्ज आणि फॉलो अप
आरोग्य मित्र कोण असतात?
आरोग्य मित्र हे सरकारने नियुक्त केलेले कर्मचारी असतात जे रुग्णांना मदतीसाठी नेमलेले असतात.
आरोग्य मित्राचे काम
Mahatma Phule Jan Aarogya Yojana साठी आरोग्य मित्राच्या कामाचे स्वरूप पुढीलप्रमाणे,
- रुग्णांना योजना समजावून सांगणे.
- योजने संबंधी रुग्णांना मदत करणे.
- रुग्णांची कागदपत्र तपासणे.
- पॅकेजची निवड करणे
- गुंतागुंत कमी करण्यासाठी उपचार प्रक्रिया सुलभ करणे.
योजनेबाबतची आकडेवारी
- या योजनेच्या सुरुवातीपासून सुमारे १.५ कोटींहून अधिक लोकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.
- २०,००० हून अधिक लोकांनी कॅन्सर शस्त्रक्रियेचा लाभ घेतला आहे.
- ३ लाखांहून अधिक हृदयरोगावर उपचार झालेले आहेत.
- जवळपास ५ लाख लोकांनी डायलिसिस वर उपचार झालेले आहेत.
महाराष्ट्रातील आरोग्य सेवांमधील सर्वात अधिक प्रभावी योजना आहे Mahatma Phule Jan Aarogya Yojana ज्याला MJPJAY या नावाने ओळखले जाते. ही योजना सर्वाधील प्रभावी ,लाभदायक आणि सर्वसमावेशक योजना आहे. ठराविक वर्गातील लोकांना पैश्याच्या अडचणीमुळे उपचार घेणे थांबवावे लागणार नाही यासाठी ही या योजनेचे प्रमुख उद्दिष्ठ आहे.
अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा
योजनांच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून जॉईन किंवा फॉलो करा
Whats App ग्रुप लिंक – इथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा
आमच्या इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा
वारंवार विचारले जाणारे Common प्रश्न
ही योजना सर्वांसाठी आहे का?
नाही, फक्त केशरी किंवा केशरी रेशन कार्ड धारक गरीब किंवा कमजोर कुटुंब किंवा विदर्भ, मराठवाड्यातील शेतकरी किंवा पत्रकार ,कामगार यांना या योजनेचा लाभ मिळेल.
कार्ड काढावे लागते का ?
नाही, या योजनेसाठी आधार कार्ड आणि आधार इतकी कागदपत्रे पुरेशी आहेत.
उपचार सरकारी का खाजगी रुग्णालयामध्ये मिळतो ?
उपचार हे दोन्ही ठिकाणी मिळतील.
फॉलो अप मोफत असतो का?
हो, उपचारानंतर १० दिवस औषध आणि तपासणी मोफत असते.
उपचार हे कॅशलेस असतात का?
या योजनेसाठी पात्र असणाऱ्या रुग्णाना उपचार हे पूर्णपणे कॅशलेस असतात.
