(MAHAVITARAN Bharti 2025)महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी ३०० जागांवर भरती

भारतातील सर्वात मोठ्या वीज पुरवठा कंपनी असणाऱ्या महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (MAHAVITARAN) मध्ये विविध पदांसाठी ३०० जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.इच्छुक पात्र उमेदवारांनी MAHAVITARAN Bharti 2025 साठीचे त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून २९/११/२०२५ ते २२/१२/२०२५ या दरम्यान जमा करायचे आहेत. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

MAHAVITARAN Bharti 2025

जाहिरात क्र

Table of Contents

रिक्त पदांचा तपशील (MAHAVITARAN Bharti 2025)

अ. क्रपदाचे नावपद संख्या
०१अतिरिक्त कार्यकारी अभियंता ९४
०२अतिरीक्त कार्यकारी अभियंता (सिव्हिल)०५
०३उपकार्यकारी अभियंता (Dist)६९
०४उप कार्यकारी अभियंता (सिव्हिल)१२
०५वरिष्ठ व्यवस्थापक (F &A)१३
०६व्यवस्थापक (F&A)२५
०७उपव्यवस्थापक (F &A)८२
एकूण३००

शैक्षणिक अर्हता (MAHAVITARAN Bharti 2025)

  • पद क्र १-
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग शाखेची BE/B.Tech पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • उमेदवारास किमान ७ वर्ष कालावधीचा अनुभव असावा.
  • पद क्र २-
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची सिव्हिल इंजिनिअरिंग शाखेची BE/B.Tech पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • उमेदवारास किमान ७ वर्ष कालावधीचा अनुभव असावा.
  • पद क्र ३
    • उमेदवारहा मान्यताप्राप्त विद्यापीठाची इलेक्ट्रिकलइंजिनियरिंग शाखेची BE/B.Tech पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • उमेदवारास किमान ०३ वर्ष कालावधीचा अनुभव असावा.
  • पद क्र ४
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची सिव्हिल इंजिनिअरिंग शाखेची BE/B.Tech पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • उमेदवारास किमान ३ वर्ष कालावधीचा अनुभव असावा.
  • पदक्र ५-
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची CA/ICWA (CMA) परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • उमेदवारास किमान ०७ वर्ष कालावधीचा अनुभव असावा.
  • पद क्र ६
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची CA/ICWA (CMA) परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • उमेदवारास किमान ०३ वर्ष कालावधीचा अनुभव असावा.
  • पद क्र ७
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची CA/ICWA (CMA)/M.Com किंवा B.Com + MBA (Finance) परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • उमेदवारास किमान ०१ वर्षाचा अनुभव असावा.

वयोमर्यादा (MAHAVITARAN Bharti 2025)

  • २७/०६/२०२५ रोजी उमेदवाराचे वय हे खालीलप्रमाणे असावे,
    • पद क्र १,२,५ आणि ६ – उमेदवाराचे वय ४० वर्षापेक्षा जास्त नसावे.
    • पद क्र ३,४,७- उमेदवाराचे वय ३५ वर्षापेक्षा जास्त नसावे.
    • राखीव प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ५ वर्ष शिथिलता राहील.
    • विभागीय उमेदवाराचे कमाल वय ५७ वर्ष असावे.
    • अपंग उमेदवाराचे कमाल वय ४५ वर्ष असावे.
    • खेळाडू उमेदवारास कमाल वयात ५ वर्ष शिथिलता राहील.

वेतन श्रेणी (MAHAVITARAN Bharti 2025)

  • पद क्र १ आणि २ – उमेदवारास नोकरीत रुजू झाल्या नंतर ₹८१,८५०/- ते ₹१,८४,४७५/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
  • पद क्र ३ आणि ४ – उमेदवारास नोकरीत रुजू झाल्यानंतर ₹७३,५८०/- ते ₹१,६६,५५५/- प्रति महिना वेतन अदा केले जाईल.
  • पद क्र ५- उमेदवारास नोकरीत रुजू झाल्यानंतर ₹९७,२२०/- ते ₹२,०९,४४५/- प्रति महिना वेतन अदा केले जाईल.
  • पद क्र ६- उमेदवारास नोकरीत रुजू झाल्यानंतर ₹७५,८९०/- ते ₹१,६८,८६५/- प्रति महिना वेतन अदा केले जाईल.
  • पद क्र ७ – उमेदवारास नोकरीत रुजू झाल्यानंतर ₹५४,५०५/- ते ₹१,३७,९९५/- प्रति महिना वेतन अदा केले जाईल.

अर्ज शुल्क

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांनी MAHAVITARAN Bharti 2025 साठी ₹५००/- अधिक GST ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
  • राखीव प्रवर्गातील उमेदवारांना ₹२५०/- अधिक GST ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
  • अपंग उमेदवारांना अर्ज शुल्क माफ राहील.
  • अर्ज शुल्क हे ना परतावा असून एकदा भरलेले अर्ज शुल्क हे कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.
  • उमेदवारांनी अर्ज शुल्क हे क्रेडिट कार्ड /डेबिट कार्ड/ इंटरनेट बँकिंग यांच्या साहाय्याने ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
  • पोस्टल ऑर्डर/मनी ऑर्डर/कॅश आणि इतर कोणत्याही पध्दतीने अर्ज शुल्क स्वीकारले जाणार नाही.
  • कोणत्याही कारणास्तव भरती प्रक्रिया रद्द झाल्यास अर्ज शुल्क परत मिळणार नाही याची अर्जदारांनी नोंद घ्यावी.

अर्ज कसा करावा

  • इच्छुक पात्र उमेदवारांनी MAHAVITARAN Bharti 2025 साठी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून २९/११/२०२५ ते २२/१२/२०२५ या दरम्यान जमा करायचे आहेत.
  • अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.इतर कोणत्याही पद्धतीनं अर्ज स्वीकारले जाणार नाही.
  • अर्ज करण्यासाठीच्या स्टेप्स
    • रजिस्ट्रेशन – उमेदवारांनी प्रथम स्वतःला अधिकृत संकेतस्थळावर रजिस्टर करून घ्यावे.
    • अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरावी.
    • आवश्यक ती सर्व कागदपत्र अपलोड करून घ्यावी.
    • अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करून घ्यावी

निवड प्रक्रिया

उमेदवारांची निवड ही खालीलप्रमाणे होईल,

  • ऑनलाईन परीक्षा
    • प्रोफेशनल ज्ञान – ५० प्रश्न ,११० गुण
    • रिजनिंग – ४० प्रश्न ,२० गुण
    • Quantitative Aptitude – २० प्रश्न ,१० गुण
    • मराठी भाषा ज्ञान – २० प्रश्न,१० गुण
    • एकूण – १३० प्रश्न,१५० गुण ,वेळ – १२० मिनिट
  • मुलाखत

कागदपत्र (MAHAVITARAN Bharti 2025)

  • फोटो आणि सही
  • डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा
  • Hand Written Declaration
  • सर्व शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र आणि गुणपत्र
  • जात प्रमाणपत्र
  • अपंग असल्याचे प्रमाणपत्र
  • जन्म तारखेचा पुरावा
  • विभागीय उमेदवार असल्यास ना हरकत प्रमाणपत्र
  • अनुभवाचे प्रमाणपत्र
  • खेळाडू असल्यास पुरावा

महत्वाच्या सूचना

  • उमेदवारांनी MAHAVITARAN Bharti 2025 साठी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • रजिस्टर करताना दिलेला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
  • चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्धवट भरलेला अर्ज किंवा अर्ज शुल्क न भरलेले अर्ज रद्द करण्यात येतील.
  • जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे/ वाढवणे तसेच भरतीप्रक्रिया रद्द करणे/पुढे ढकलणे/ स्थगित करणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
  • भरती करण्याबाबत कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.

महत्वाच्या तारखा

अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख – २९/११/२०२५

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – २२/१२/२०२५

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

जाहिरातीसाठी –

पद क्र १ ते ४ – इथे क्लिक करा

पद क्र ५ ते ७- इथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा

नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा

व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा


Articles

परभणी जिल्हा मध्यवर्ती बँक मध्ये विविध पदांसाठी १५२ जागांवर भरती

केंद्रीय विद्यालय संघटन आणि नवोदय विद्यालय समिती मध्ये विविध पदांसाठी १४९६७ जागांवर मेगाभरती

महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकारी पदासाठी १४४० जागांवर भरती

मंत्रिमंडळ सचिवालयामध्ये डेप्युटी फील्ड ऑफिसर पदासाठी २५० जागांवर भरती

भारतीय हवाई दलामध्ये विविध पदांसाठी ३४० जागांवर भरती

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top