(IOCL Apprentice 2025) Indian Oil Coprporation Limited मध्ये अप्रेंटीस पदासाठी २७५६ जागांवर भरती

भारत सरकारच्या नवरत्न कंपनी असणाऱ्या Indian oil Corporation Limited मध्ये अप्रेंटीस पदासाठी २७५६ जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. इच्छुक पात्र उमेदवारांनी IOCL Apprentice 2025 साठी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून २८/११/२०२५ ते १८/१२/२०२५ या दरम्यान जमा करायचे आहेत. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

IOCL Apprentice 2025

जाहिरात क्र

रिक्त पदांचा तपशील (IOCL Apprentice 2025)

अ क्रपदाचे नाव
०१ट्रेड अप्रेंटीस
०२टेक्नीशिअन अप्रेंटीस
एकूण

शैक्षणिक अर्हता(IOCL Apprentice 2025)

  • पद क्र १ –
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची Maths,Physics,chemistry,Industrial Chemistry विषयासह B.Sc/BA/B.Com पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा. किंवा
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त संस्थेची fitter ट्रेड मधून ITI परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून १२ वी उत्तीर्ण असावा.
  • पद क्र २
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून Chemical/Petrochemical/Chemical Technology/Refinary & Petrochemical/Mechanical/Electrical & Electronics /Instrumentation/Instrumentation & Electronics /Instrumentation & Control Engineering/Applied Electronics & Instrumentation शाखेची अभियांत्रिकी डिप्लोमा परीक्षा उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा (IOCL Apprentice 2025)

  • ३०/११/२०२५ रोजी उमेदवाराचे किमान वय १८ वर्ष आणि कमाल वय २४ वर्ष असावे.
  • अजा/आज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ०५ वर्ष शिथिलता राहील.
  • इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ०३ वर्ष शिथिलता राहील.
  • अपंग उमेदवारांना – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात १० वर्ष /इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात १३ वर्ष आणि अजा/आज प्रवर्गातील उमेदवारान कमाल वयात १५ वर्ष शिथिलता राहील.

वेतन श्रेणी

उमेदवारांना नोकरीत रुजू झाल्यानंतर नियमाप्रमाणे स्टायपंड दिले जाईल.

अर्ज कसा करावा.

  • इच्छुक पात्र उमेदवारांनी IOCL Apprentice 2025 साठीचे त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून २८/११/२०२५ ते १८/१२/२०२५ यादरम्यान जमा करायचे आहेत.
  • उमेदवारांनी अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.
  • अर्ज करण्यासाठीच्या स्टेप्स
    • रजिस्ट्रेशन – उमेदवारांनी प्रथम अधिकृत संकेतस्थळावरून रजिस्टर करून घ्यावे.
    • अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरावी.
    • आवश्यक ती सर्व कागदपत्रे अपलोड करून घ्यावी

अर्ज शुल्क

वरील पदासाठी अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क असणार नाही.

निवड प्रक्रिया

  • IOCL Apprentice 2025 साठीच्या वरील पदांच्या निवडीसाठी कोणत्याही प्रकारची लेखी परीक्षा असणार नाही.
  • NAPS /NATS पोर्टल वर नोंदणीकृत असणाऱ्या उमेदवारांचे अर्ज ग्राह्य धरले जातील.
  • उमेदवारांना किमान शैक्षणिक अर्हतेमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल.
  • पहिल्यांदा अप्रेंटिस पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना प्रथम प्राधान्य दिले जाईल.
  • दोन किंवा त्यापेक्षा अधिक उमेदवारांना समान गुण असल्यास
    • वयाने ज्येष्ठ उमेदवारास प्रथम प्राधान्य दिले जाईल.
    • जन्म तारीख समान असल्यास १० वी परीक्षेत जास्त गुण असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.

कागदपत्र

  • सर्व शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र आणि गुणपत्र
  • CGPA/OGPA यांचे percentage conversion Certificate
  • जात प्रमाणपत्र
  • अपंग असल्याचे प्रमाणपत्र
  • आर्थिक दुर्बल घटक असल्याचे प्रमाणपत्र
  • NATS/NAPS नोंदणीची प्रत

महत्वाच्या सूचना

  • उमेदवारांनी IOCL Apprentice 2025 साठीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्धवट भरलेले अर्ज रद्द करण्यात येतील.
  • रजिस्टर करताना दिलेला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
  • जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे/वाढवणे तसेच भरतीप्रक्रिया रद्द करणे/पुढे ढकलणे /स्थगित करणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
  • भरती करण्याबाबत कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.

महत्वाच्या तारखा

अर्ज करण्यासाठी सुरुवातीची तारीख – २८/११/२०२५

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख – १८/१२/२०२५

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

जाहिरातीसाठी – इथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा

नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा

व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा


Article

महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकारी पदासाठी १४४० जागांवर भरती

परभणी जिल्हा मध्यवर्ती बँक मध्ये विविध पदांसाठी १५२ जागांवर भरती

भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय पुणे येथे विविध पदांसाठी ७८ जागांवर भरती

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था AIIMS मध्ये विविध पदांसाठी १३०० जागांवर भरती

RITES Limited मध्ये Assistant Manager पदासाठी ४०० जागांवर भरती

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top