(BAVMC PMC Bharti 2025) भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय पुणे येथे विविध पदांसाठी ७८ जागांवर भरती

पुणे महानगर पालिका अंतर्गत असणाऱ्या भारत रत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय येथे विवध पदांसाठी ७८ जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. इच्छुक पात्र उमेदवारांनी BAVMC PMC Bharti 2025 साठी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून ०२/१२/२०२५ पूर्वी जमा करायचे आहेत. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

BAVMC PMC Bharti 2025

जाहिरात क्र – (PMCMET/२०२५-२६)

रिक्त पदांचा तपशील (BAVMC PMC Bharti 2025)

अ. क्र पदाचे नाव पद संख्या
०१ प्राध्यापक १०
०२ सहयोगी प्राध्यापक २२
०3 सहाय्यक प्राध्यापक ४६
एकूण ७८

शैक्षणिक अर्हता (BAVMC PMC Bharti 2025)

  • पद क्र १ –
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची MD /MS/DNB परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • उमेदवारास किमान ०८ वर्ष अनुभव असावा.
  • पद क्र २
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची MD/MS/DNB परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • उमेदवारास किमान ०५ वर्ष कालावधीचा अनुभव असावा.
  • पद क्र ३
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची MD/MS/DNB परीक्षा उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा

  • BAVMC PMC Bharti 2025 साठी अर्ज करण्यास ०२/१२/२०२५ रोजी उमेदवाराचे वय पुढे नमूद केल्याप्रमाणे असावे.
    • पद क्र १ – उमेदवाराचे किमान वय १९ वर्ष आणि कमाल वय ५० वर्ष असावे.
    • पद क्र २ – उमेदवाराचे किमान वय १९ वर्ष आणि कमाल वय ४५ वर्ष असावे.
    • पद क्र ३ – उमेदवाराचे किमान वय १९ वर्ष आणि कमाल वय ४० वर्ष असावे.
  • मागासवर्गीय /आर्थिक दुर्बल घटक /अनाथ /दिव्यांग उमेदवारांना कमाल वयात ०५ वर्ष शिथिलता राहील.
  • माजी सैनिक उमेदवारांना त्यांच्या सैनिकी सेवाच कालावधी अधिक ०३ वर्ष शिथिलता राहील.

वेतन श्रेणी

  • पद क्र १ – उमेदवारांना नोकरीत रुजू झाल्यानंतर रु १,४४,२००/- ते रु २,१८,२००/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
  • पद क्र २ – उमेदवारांना नोकरीत रुजू झाल्यानंतर रु १,३१,४००/- ते रु २,१७,१००/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
  • पद क्र ३ – उमेदवारांना नोकरीत रुजू झाल्यानंतर रु ५७,७००/- ते रु १,८२,४००/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.

अर्ज कसा करावा

  • इच्छुक पात्र उमेदवारांनी BAVMC PMC Bharti 2025 साठी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून २१/११/२०२५ ते ०२/१२/२०२५ या दरम्यान जमा करायचे आहेत.
  • अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत. इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • अर्ज करण्यासाठीच्या स्टेप्स
    • रजिस्ट्रेशन – उमेदवारांनी प्रथम स्वतःला अधिकृत संकेतस्थळावर रजिस्टर करून घ्यावे.
    • अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरून घ्यावी.
    • आवश्यक ती सर्व कागदपत्र अपलोड करून घ्यावे.
    • अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करून घ्यावे.

अर्ज शुल्क

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांनी BAVMC PMC Bharti 2025 साठी रु ६५०/- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
  • मागासवर्गीय/ आर्थिक दुर्बल घटक /दिव्यांग/ अनाथ उमेदवारांनी रु ४४९/- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करावे.
  • अर्ज शुल्क हे ना परतावा असून एकदा भरलेले अर्ज शुल्क कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.
  • अर्ज शुल्क हे उमेदवारांनी क्रेडीट कार्ड/इंटरनेट बँकिंग यांच्या सहाय्याने ऑनलाईन पद्धतीने तसेच चलनाद्वारे ऑफलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज शुल्क स्वीकारले जाणार नाही.

निवड प्रक्रिया (BAVMC PMC Bharti 2025)

  • उमेदवारांची निवड ही प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे होईल.
  • उमेदवाराने किमान शैक्षणिक अर्हता धरण केले म्हणजे मुलाखतीस बोलावले जाईल असे नाही.
  • अर्जांची संख्या जास्त असल्यास अर्जांच्या छाननीसाठी परीक्षा घेतली जाईल.
  • उमेदवारांनी मुलाखतीमध्ये किमान ४१% गुण मिळवणे आवश्यक आहे. ४१% गुण किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या उमेदवारांनाच भरती साठी पत्र ठरवले जाईल.

कागदपत्र

  • नावाचा पुरावा (१० वी प्रमाणपत्र /तत्सम शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र )
  • वयाचा पुरावा
  • सर्व शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र आणि गुणपत्र
  • जात प्रमाणपत्र
  • आर्थिक दुर्बल घटक असल्याचा पुरावा
  • नॉन क्रिमी लेयर प्रमाणपत्र
  • दिव्यांग असल्याचा पुरावा
  • माजी सैनिक असल्याचा पुरावा
  • अनाथ असल्याचा पुरावा
  • खेळाडू आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा
  • नावात बदल असल्याचा पुरावा
  • मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा
  • लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र
  • अनुभवाचे प्रमाणपत्र

महत्वाच्या सूचना

  • उमेदवारांनी BAVMC PMC Bharti 2025 साठी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • रजिस्टर करताना दिलेले इमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरतीप्रक्रिया सुरु असेपर्यंत वैध असने आवश्यक आहे.
  • चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरवले जाईल.
  • अर्धवट भरलेले अर्ज किंवा अर्ज शुल्क न भरलेले अर्ज रद्द करण्यात येतील.
  • जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे/वाढवणे तसेच भरती प्रक्रिया रद्द करणे /पुढे ढकलणे /स्थगित करणे याबाबतचे सर्व निर्णय व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
  • भरती करण्याबाबत कोणत्याही प्रकारे दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास उमेदवारास कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरवले जाईल.

महत्वाच्या तारखा

अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख – २१/११/२०२५

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – ०२/१२/२०२५

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

जाहिरातीसाठी -इथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा

नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा

Whats App ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

आमच्या इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा


Articles

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था AIIMS मध्ये विविध पदांसाठी १३०० जागांवर भरती

Punjab National Bank मध्ये लोकल बँक ऑफिसर पदासाठी ७५० जागांवर भरती

 केंद्रीय गुप्तचर खात्यात Multi Tasking Staff पदासाठी ३६२ जागांवर भरती

नाशिक महानगरपालिके अंतर्गत विविध पदांसाठी ११४ जागांवर भरती

बँक ऑफ बरोडा मध्ये अप्रेंटीस पदासाठी २७०० जागांवर भरती

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top