भारतातील अग्रगण्य बँक पैकी असणाऱ्या Punjab National Bank मध्ये लोकल बँक ऑफिसर पदासाठी ७५० जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. इच्छुक पात्र उमेदवारांनी PNB LBO Bharti 2025 साठी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने ०३/११/२०२५ ते ०१/१२/२०२५ या दरम्यान जमा करायचे आहेत. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,
जाहिरात क्र –
Table of Contents
रिक्त पदांचा तपशील (PNB LBO Bharti 2025)
| अ. क्र | पदाचे नाव | पद संख्या |
| ०१ | लोकल बँक ऑफिसर | ७५० |
| एकूण | ७५० |
शैक्षणिक अर्हता
- उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
- उमेदवारास clerical किंवा ऑफिसर पदाच्या कामाचा किमान ०१ वर्ष कालावधीचा अनुभव असावा.
- उमेदवारांना स्थानिक भाषेचे ज्ञान (लिहिता,वाचता,बोलता येणे) असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
- PNB LBO Bharti 2025 साठीच्या वरील पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे किमान वय २० वर्ष तसेच कमाल वय ३० वर्ष असावे.
- अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ०५ वर्ष शिथिलता राहील.
- इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात 3 वर्ष शिथिलता राहील.
- अपंग उमेदवारांना कमाल वयात १० वर्ष शिथिलता राहील.
वेतन श्रेणी
उमेदवारान नोकरीत रुजू झाल्यानंतर रु ४८,४८० /- ते रु ८५,९२०/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
अर्ज कसा करावा
- इच्छुक पात्र उमेदवारांनी PNB LBO Bharti 2025 साठीचे त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून ०३/११/२०२५ ते ०१/१२/२०२५ या दरम्यान जमा करायचे आहेत.
- अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत. इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.
- अर्ज करण्यासाठीच्या स्टेप्स
- रजिस्ट्रेशन – उमेदवारांनी प्रथम स्वतःला अधिकृत संकेतस्थळावर रजिस्टर करून घ्यावे.
- अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरावी.
- आवश्यक ती सर्व कागदपत्र अपलोड करून घ्यावे.
- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करून घ्यावे.
अर्ज शुल्क
- इच्छुक पात्र उमेदवारांनी रु १०००/- अधिक GST १८% असे एकूण रु ११८०/- अर्ज शुल्क ओंलैन पद्धतीने जमा करून घ्यावे.
- अजा/अज/अपंग उमेदवारांनी रु ५० अधिक GST १८% असे एकूण रु ५९/- पोस्टेज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करावे.
- PNB LBO Bharti 2025 साठीचे अर्ज शुल्क हे ना परतावा असून एकदा भरलेले अर्ज शुल्क कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.
- अर्ज शुल्क हे उमेदवारांनी क्रेडीट कार्ड/डेबिट कार्ड/इंटरनेट बँकिंग यांच्या सहाय्याने ऑनलाईन पद्धतीने जमा करावे. इअतर कोणत्याही पद्धतीने अर्र्ज शुल्क स्वीकारले जाणार नाही.
निवड प्रक्रिया (PNB LBO Bharti 2025)
- वरील पदासाठी उमेदवारांची निवड ही ४ टप्प्याच्या प्रक्रियेने होईल.
- ऑनलाईन लेखी परीक्षा
- Reasoning & Computer Aptitude – २५ प्रश्न , २५ गुण , कालावधी ३५ मिनिटे
- Data Analysis and Interpretation – २५ प्रश्न ,२५ गुण ,कालावधी – ३५ मिनिटे
- English Language – २५ प्रश्न , २५ गुण , कालावधी – २५ मिनिटे
- Quantitative Aptitude – २५ प्रश्न ,२५ गुण ,कालावधी -३५ मिनिटे
- General , Economy ,Banking Awareness – ५० प्रश्न ,५० गुण , कालावधी – ५० मिनिटे
- खुल्या /आर्थिक दुर्बल घटक उमेदवारांना पात्र असण्यासाठी ऑनलाईन लेखी परीक्षेमध्ये किमान ४०% गुण मिळवणे तसेच राखीव प्रवर्गातील उमेदवारांना ३५% गुण मिळवणे आवश्यक आहे.
- स्क्रिनिंग
- स्थानिक भाषा परीक्षा
- मुलाखत
- मुलाखत ही ५० गुणांची असेल ज्यात अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना ४५% म्हणजेच २२.५० गुण तसेच इतर उमेदवारांना ५०% गुण म्हणजेच २५ गुण मिळवणे अनिवार्य असेल.
- अंतिम निवड
- ऑनलाईन लेखी परीक्षा
कागदपत्र
- फोटो आणि सही
- डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा
- Hand Written Decleration फोटो
- जात प्रमाणपत्र
- सर्व शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र आणि गुणपत्र
- अनुभवाचे प्रमाणपत्र
महत्वाच्या सूचना
- उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
- रजिस्टर करताना दिलेले इमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरतीप्रक्रिया सुरु असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
- ऑनलाईन लेखी परीक्षेमध्ये प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी १/४ नकारात्मक गुण मिळतील.
- चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरवले जाईल.
- अर्धवट किंवा अर्ज शुल्क न भरलेले अर्ज रद्द करण्यात येतील.
- PNB LBO Bharti 2025 च्या जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे /वाढवणे तसेच भरती प्रक्रिया रद्द करणे/पुढे ढकलणे /स्थगित करणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
- भरती करण्याबाबत कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास उमेदवारास अपात्र ठरवले जाईल.
महत्वाच्या तारखा
अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख – ०३/११/२०२५
अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – ०१/१२/२०२५
अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा
नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून जॉईन किंवा फॉलो करा
Whats App ग्रुप लिंक – इथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा
आमच्या इन्स्टा ग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा
