(SAIL Operator cum Technician Bharti) भारत सरकारची महारत्न कंपनी असलेल्या अग्रगण्य स्टील निर्माता कंपनी Steel Authority of India (SAIL) मध्ये Operator cum Technician(Trainee)-(OCTT)पदासाठी ३१४ जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने १८/०३/२०२४ पूर्वी जमा करायचे आहेत. सविस्तर माहिती खालील प्रमाणे,
जाहिरात क्र – ०१/२०२४
रिक्त पदांचा तपशील (SAIL Operator cum Technician Bharti)
अ. क्र | पदाचे नाव | पद संख्या |
१ | OCTT -METALLURGY | ५७ |
२ | OCTT- Electrical | ६४ |
३ | OCTT- Mechanical | १०० |
४ | OCTT-Instrumentation | १७ |
५ | OCTT-Civil | २२ |
६ | OCTT- Chemical | १८ |
७ | OCTT -Ceramic | ०६ |
८ | OCTT -Electronics | ०८ |
९ | OCTT -Computer/IT (For Mines only) | २० |
१० | OCTT- Draughtsman | ०२ |
एकूण | ३१४ |
शैक्षणिक अर्हता (SAIL Operator cum Technician Bharti)
- पद क्र १-उमेदवार हा १० वी सह सरकारी मान्यताप्राप्त ३ वर्ष कालावधीचा पूर्ण वेळ Metallurgy Engineering मधील Diploma परीक्षा उत्तीर्ण असावा.
- पद क्र २ – उमेदवार हा १० वी सह सरकारी मान्यताप्राप्त ३ वर्ष कालावधीचा पूर्ण वेळ Electrical /Electrical & Electronics Engineering मधील Diploma परीक्षा उत्तीर्ण असावा.
- पद क्र ३– उमेदवार हा १० वी सह सरकारी मान्यताप्राप्त ३ वर्ष कालावधीचा पूर्ण वेळ Mechanical Engineering मधील Diploma परीक्षा उत्तीर्ण असावा.
- पद क्र ४– उमेदवार हा १० वी सह सरकारी मान्यताप्राप्त ३ वर्ष कालावधीचा पूर्ण वेळ Instrumentation/Instrumentation & Electronics/Instrumentation & Control/Instrumentation & Automation Engineering मधील Diploma परीक्षा उत्तीर्ण असावा.
- पद क्र ५ – उमेदवार हा १० वी सह सरकारी मान्यताप्राप्त ३ वर्ष कालावधीचा पूर्ण वेळ Civil Engineering मधील Diploma परीक्षा उत्तीर्ण असावा.
- पद क्र ६ – उमेदवार हा सरकारी मान्यताप्राप्त ३ वर्ष कालावधीचा पूर्ण वेळ Chemical Engineering मधील Diploma परीक्षा उत्तीर्ण असावा.
- पद क्र ७– उमेदवार हा सरकारी मान्यताप्राप्त ३ वर्ष कालावधीचा पूर्ण वेळ Ceramic Engineering मधील Diploma परीक्षा उत्तीर्ण असावा.
- पद क्र ८– उमेदवार हा सरकारी मान्यताप्राप्त ३ वर्ष कालावधीचा पूर्ण वेळ Electronics /Electrical & Electronics/Electronics & Telecommunication/Electronics & Communication/Electronics & Instrumentation Engineering मधील Diploma परीक्षा उत्तीर्ण असावा.
- पद क्र ९– उमेदवार हा सरकारी मान्यताप्राप्त ३ वर्ष कालावधीचा पूर्ण वेळ Computer Science/Information Technology Engineering मधील Diploma परीक्षा उत्तीर्ण असावा.
- पद क्र १०–
- उमेदवार हा १० वी सह सरकारी मान्यताप्राप्त ३ वर्ष कालावधीचा पूर्ण वेळ Diploma in Civil Engineering /Electrical Engineering/Mechanical Engineering/Architectural Assistantship परीक्षा उत्तीर्ण असावा.
- उमेदवारास १ वर्षाचा Draughtsman/Design Assistant पदावरील Autocad चा अनुभव असावा.
- वरील सर्व पदांसाठी पात्रता परीक्षेत खुल्या/इतर मागासवर्गीय /आर्थिक मागास प्रवर्गातील उमेदवार किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण असावेत.
- अजा/अज/अपंग/विभागीय उमेदवार हे किमान पात्रता परीक्षेत किमान ४०% गुणांसह उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा (SAIL Operator cum Technician Bharti)
- वरील सर्व पदांसाठी १८/०३/२०२४ पर्यंत उमेदवाराचे किमान वय १८ वर्षे आणि कमाल वय २८ वर्षे असावे.
- अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ५ वर्षे शिथिलता राहील.
- इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ३ वर्षे शिथिलता राहील.
- खुल्या आणि आर्थिक दुर्बल घटकातील अपंग उमेदवारांना कमाल वयात १० वर्षे शिथिलता राहील तसेच अजा/अज प्रवर्गातील अपंग उमेदवारांना १५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय प्रवर्गातील अपंग उमेदवारांना १३ वर्षे कमाल वयात शिथिलता राहील.
- माजी सैनिक उमेदवारांना सरकारी नियमाप्रमाणे कमाल वयात शिथिलता राहील.
वेतन श्रेणी (SAIL Operator cum Technician Bharti)
- वरील पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांचा पहिले २ वर्ष प्रशिक्षण कालावधी असेल.
- पहिल्या वर्षासाठी ₹१६,१००/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
- दुसऱ्या वर्षासाठी १८,३००/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
- २ वर्षाचा प्रशिक्षण कालावधी यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर उमेदवारास नियमित कर्मचारी केले जाईल आणि त्यांना ₹२६,६००/- ते ₹३८,९२०/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
अर्ज शुल्क (SAIL Recruitment)
- (SAIL Recruitment 2024) वरील पदांसाठी अर्ज करण्यासाठी खुल्या/इतर मागासवर्गीय प्रवर्ग/आर्थिक दुर्बल घटक प्रवर्गातील उमेदवारांना रु ५००/- अर्ज शुल्क भरावा लागेल.
- अजा/अज/अपंग/माजी सैनिक/विभागीय उमेदवारांना रु २००/- अर्ज शुल्क भरावा लागेल.
- उमेदवार हे अर्ज शुल्क इंटरनेट बँकिंग/क्रेडीट कार्ड/डेबिट कार्ड यांच्या सहाय्याने ऑनलाईन पद्धतीने भारता येईल.
- अर्ज शुल्क हे ना परतावा आहे.कोणत्याही कारणास्तव भरलेले अर्ज शुल्क परत मिळणार नाही.
- अर्ज शुल्क व्यतिरिक्त इतर अधिकचे शुल्क हे उमेदवारांना भरावे लागेल.
अर्ज कसा कराल (SAIL Operator cum Technician Bharti)
- इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून २६/०२/२०२४ ते १८/०३/२०२४ दरम्यान भरायचा आहे.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीच्या स्टेप्स (SAIL Operator cum Technician Bharti)
- इमेल आय डी आणि मोबाईल नंबर च्या सहाय्याने उमेदवारांनी रजिस्टर करून घ्यायचे आहे.
- लॉग इन वर क्लिक करून New User वर क्लिक करून पहिल्यांदा one time Registration करून घेणे.
- जर पहिल्यापासून रजिस्टर असाल तर Registered User वर क्लिक करून User ID आणि Password च्या सहाय्याने लॉग इन करून घेणे.
- अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक आणि योग्य माहिती भरून घ्यावी.
- नमूद केलेली कागदपत्रे अपलोड करून घ्यावी.
- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरून घ्यावे.
- अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांनी त्याची प्रिंटआउट काढून घ्यावी.
निवड प्रक्रिया (SAIL Operator cum Technician Bharti)
- पात्र उमेदवारांची Computer Based Test(CBT) हिंदी /इंग्रजी भाषेत असेल.
- Computer Based Test(CBT) हि १०० वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नांची असेल.हि परीक्षा २ टप्प्यात होईल ज्यात ५० हे Domain Knowladge आणि ५० प्रश्न हे Aptitude Test अशी असेल. या परीक्षेचा कालावधी हा ९० मिनिटे कालावधीची असेल.
- Computer Based Test(CBT) मधून पात्र ठरण्यासाठी या परीक्षेत खुल्या आणि आर्थिक दुर्बल घटक प्रवर्गातील उमेदवारांना किमान ५०% तसेच अजा/अज/इतर मागास प्रवर्गातील/अपंग उमेदवार यांना किमान ४०% गुण मिळवणे अनिवार्य आहे.
- Computer Based Test(CBT) परीक्षेमध्ये किमान पात्रता गुण मिळालेल्या उमेदवारांना गुणवत्तेच्या आधारे Skill Test साठी बोलावले जाईल. Skill Test हि कंपनी च्या कोणत्याही प्लांट/कार्यालय /माइन मध्ये होईल.
- Skill Test हि फक्त पात्रता परीक्षा असेल अंतिम निवड हि Computer Based Test(CBT) मधील गुणांच्या आधारे असेल.
- Computer Based Test(CBT) मध्ये समान गुण असतील तर किमान पात्रता परीक्षेक अधिक गुण असणार्या उमेदवारास प्राधान्य दिले जाईल.
शारीरिक मानक (SAIL Recruitment 2024)
- उंची – १)पुरुष उमेदवाराची किमान उंची १५५ से.मी असावी. २)महिला उमेदवारांची किमान उंची १४३ से.मी असावी.
- वजन – १) पुरुष उमेदवाराचे किमान वजन ४५ कि.ग्रा असावे. २)महिला उमेदवाराचे किमान वजन ३५ कि. ग्रा असावे.
- छाती -१) पुरुष उमेदवारांसाठी ७५ से.मी आणि ७९ से.मी Expansion सहित. २)महिला उमेदवारांसाठी ७० सेमी आणि ७३ से मी Expansion सहित.
- दृष्टी –
- १)दूरची दृष्टी – ६/१२ चष्मा न घालता
- २)जवळची दृष्टी – J1 किंवा N6 दोन्ही डोळ्यांना. चष्म्याची शक्ती हि +/-४.०D पेक्षा जास्त नसावी.
- ३)कलर व्हिजन -Normal Lantern Test with Maximum Aperture,रातआंधळे पणा असेल तर अपात्र ठरवले जाईल.
- ऐकण्याची क्षमता- ऐक्स्न्याची क्षमता सामान्य असावी.
महत्वाची सूचना (SAIL Operator cum Technician Bharti)
- (SAIL Recruitment 2024)अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
- रजिस्टर करताना उमेदवारांनी नमूद केलेला इ मेल आय डी आणि मोबाइल नंबर दिला असेल तो भारती प्रक्रिया सुरु असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
- उमेदवारांनी चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरवले जाईल.
- CBT किंवा वैद्यकीय चाचणीस हजार राहिल्याबद्दल उमेदवारास कोणत्याही प्रकारचा भत्ता दिला जाणार नाही.
- जे उमेदवार सरकारी/निमसरकारी /विभागीय असतील त्यांनी त्यांच्या विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र सदर करणे आवश्यक आहे.
- निवड झालेल्या उमेदवारांना SAIL च्या भारतातील कोणत्याही प्लांट/युनिट/माइन मध्ये नोकरी करावी लागेल.
- निवड प्रक्रीये दरम्यान उमेद्वारणाची बायोमेट्रिक रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफीकेशन होईल.
- भरतीप्रक्रिया हि तात्पुरत्या स्वरुपाची आहे व्यवस्थापनाने भरती प्रक्रिया रद्द/प्रतिबंधित करण्याचे हक्क राखून ठेवले आहेत.
- (SAIL Recruitment 2024) जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी/जास्त तसेच भारती प्रक्रिया रद्द करणे याचे सर्व अधिकार व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
- परीक्षा केंद्र आणि परिसरात मोबाईल फोन किंवा कोणत्याही प्रकारचे इलेक्ट्रोनिक उपकरण आणण्यास सक्त मनाइ आहे.
- कोणत्याही प्रकारचा वाद हा Rourkela, Odisha न्यायालयाच्या अधीन असेल.
- अर्जाच्या वेळी उमेदवारांनी लाखात ठेवावे कि एकापेक्षा जास्त पदासाठी CBT/कौशल्य चाचणी परीक्षा तारीख एकसारखी असू शकते.
- भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर उमेदवारांनी निवडीसाठी प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचे आढळल्यास उमेदवारास अपात्र ठरवले जाईल.
- भरतीबाबत उमेदवारांशी पत्रव्यवहार हे फक्त इमेल/एस एम एस /सेल च्या अधिकृत संकेतस्थळाद्वारे केले जातील.
महत्वाच्या तारखा (SAIL Recruitment 2024)
अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख -२६/०२/२०२४
अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख -१८/०३/२०२४