(ICG Bharati)Indian Coast Gaurd मध्ये नाविक या पदासाठी २६० जागांवर भरती

(ICG Bharati) Indian Coast Gaurd मध्ये नाविक या पदासाठी विविध ठिकाणी २६० जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. इच्छुक उमेदवारांनी त्यांचे अर्ज अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने २७/०२/२०२४ पूर्वी भरायचा आहे. सविस्तर माहिती खालील प्रमाणे,

ICG Bharati

रिक्त पदांचा तपशील (ICG Bharati)

पदाचे नाव – नाविक

अ. क्र रिजन/झोन खुलाआर्थिक दुर्बल घटक इतर मागासवर्गीय घटक अजा अज एकूण
1उत्तर /North 310817081479
2पश्चिम/West 260714071266
3उत्तर पूर्व /North East 270715071268
4पूर्व/East 130307040633
5उत्तर पश्चिम/North West 050103010212
6अंदमान आणि निकोबार /Andaman & Nicobar 000001010103
एकूण/Total 10226572847260
ICG Bharati

शैक्षणिक अर्हता (ICG Bharati)

  • उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्डचा गणित आणि फिजिक्स विषयांसह १०+२ उत्तीर्ण असावा.
  • अर्ज करताना उमेदवारांनी सर्व विषयात मिळालेले गुण ननामुड करायचे आहेत.
  • अर्जात चुकीचे गुण भरलेले असल्यास उमेदवारास अपात्र ठरवले जाईल.

वयोमर्यादा (ICG Bharati)

  • उमेदवाराचे किमान वय १८ वर्षे आणि कमाल वय २२ वर्षे असावे.
  • उमेदवाराचा जन्म हा ०१/०९/२००२ ते ३१/०८/२००६ या दरम्यान झालेला असावा.
  • अजा /अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ५ वर्षे शिथिलता राहील.
  • इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ३ वर्षे शिथिलता राहील.

वेतन श्रेणी (ICG Bharati)

  • वरील पदासाठी निवड झालेल्या उमेदवारास ₹२१,७००/- प्रती महिना बेसिक वेतन अदा केले जाईल.
  • बेसिक वेतन व्यतिरिक्त उमेदवारास महागाई भत्ता आणि इतर भत्ते नियमाप्रमाणे मिळतील.

अर्ज कसा कराल (ICG Bharati)

  • पात्र इच्छुक उमेदवारांनी त्यांचे अर्ज अधिकृत संकेतस्थळावरून फक्त ऑनलाईन पद्धतीने १३/०२/२०२४ ते २७/०२/२०२४ या दरम्यान जमा करायचे आहे.
  • उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन नमूद केलेल्या सर्व सुचनांचे पालन करून ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर यांच्या साहाय्याने रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करून घेणे.
  • २८/०२/२०२५ सुरू असेपर्यंत हा ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर वैध असणे आवश्यक आहे.
  • उमेदवाराने जर ईमेल आयडी विसरला तर त्यास लॉग इन तसेच प्रवेशपत्र आणि निकालाबाबत माहिती समजू शकणार नाही
  • उमेदवाराने जर एक पेक्षा जास्त अर्ज केले असतील तर शेवटी मिळालेला अर्ज ग्राह्य धरला जाईल.
  • तसेच परीक्षा शुल्क ही परत मिळणार नाही.

परीक्षा शुल्क (ICG Bharati)

  • उमेदवारांना ₹३००/- हे ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरावे लागेल.
  • अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना परीक्षा शुल्क माफ आहे.
  • उमेदवारांना परीक्षा शुल्क हे नेट बँकिंग/डेबिट कार्ड/UPI यांच्या साहाय्याने ऑनलाईन पद्धतीने भरता येईल.
  • E-Admit card हे फक्त परीक्षा शुल्क भरणाऱ्या तसेच ज्यांना परीक्षा शुल्क माफ असेल अश्या उमेदवारांमध्ये जाईल.
  • परीक्षा शुल्क हे ना परतावा तत्वावर आहे. कोणत्याही कारणास्तव किंवा परिस्थितीत परीक्षा शुल्क परत मिळणार नाही.

निवड प्रक्रिया (ICG Bharati)

  • उमेदवारांची निवड ही ४ टप्प्यांमध्ये होईल
    • स्टेज १- कॉम्प्युटर परीक्षा
      • अ) कागदपत्र पडताळणी – परीक्षेस येणाऱ्या उमेदवारांची ओळखपत्र तपासली जातील.
        • आधार कार्ड/पॅन कार्ड/निवडणूक ओळखपत्र/ड्रायव्हिंग लायसन्स/पासपोर्ट यापैकी एक कागदपत्र असणे आवश्यक.
        • E -Admit Card ची कलर प्रिंट
        • २ पासपोर्ट आकाराचे कलर फोटो
      • बायोमॅट्रिक रेकॉर्डस
        • डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा घेतला जाईल.
      • कॉम्प्युटर परीक्षा ही परीक्षा दोन स्टेज मध्ये असेल.
        • स्टेज १- ही परीक्षा एकूण ६० गुणांची असेल ज्यात उमेदवारास किमान ३० गुण (अजा/अज उमेदवारांना २७ गुण) मिळणे आवश्यक.
        • स्टेज -२ – ही परीक्षा एकूण ५० गुणांची असेल ज्यात उमेदवारास किमान २० गुण (अजा/अज उमेदवारांना १७ गुण) मिळणे आवश्यक.
    • स्टेज २- वैद्यकीय चाचणी –
      • लेखी परीक्षेतील गुणांच्या आधारे पात्र उमेदवारांना वैद्यकीय चाचणीस बोलावले जाईल.
      • Assesment/Adaptibility Test – बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन नंतर पात्र उमेदवारांची OMR Based लेखी परीक्षा होईल. जिचा निकाल हा एका तासात लागेल. ही परीक्षा पास होणार उमेदवाराचे पुढील फेरी साठी पात्र असेल.
      • फिजिकल फिटनेस टेस्ट – ही टेस्ट पुढीलप्रमाणे असेल.ही टेस्ट ही न थांबता पूर्ण करायची आहे.
        • धावणे-१.६ कि.मी अंतर ७ मिनिटात पूर्ण करणे.
        • उठक बैठक – २०
        • पूश अप्स – १०
      • कागदपत्र पडताळणी – ऑनलाईन अर्ज भरताना जी माहिती दिलेली आहे त्या माहितीशी संबंधित सर्व कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.
      • वैद्यकिय तपासणी – वैद्यकीय स्टँडर्ड प्रमाणे मेडिकल ऑफिसर हा उमेदवारांची तपासणी करून उमेदवार पात्र आहे की नाही ते जाहीर करतील.
      • गुणवत्ता यादी तयार करणे – स्टेज ३ साठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार केली जाईल.
    • स्टेज ३- प्रशिक्षण
      • कागदपत्र पडताळणी-ऑनलाईन अर्ज भरताना जी माहिती दिलेली आहे त्या माहितीशी संबंधित सर्व कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.
      • निवड पूर्व वैद्यकिय तपासणी – उमेदवारांची निवड पूर्व वैद्यकिय तपासणी ही INS Chilka येथे होईल.
      • मूळ कागदपत्रे , पोलिस पडताळणी आणि इतर अर्ज जमा करणे
    • स्टेज ४कागदपत्र पडताळणी-
      • स्टेज ३ मध्ये प्रशिक्षण दरम्यान जमा केलेली मूळ कागदपत्रे तपासली जातील.

लेखी परीक्षेबद्दल सविस्तर माहिती

सेक्शन १

अ. क्र विषय प्रश्न गुण
गणित /Mathematics २०२०
विज्ञान /Science १०१०
इंग्रजी/English १५१५
तर्क/Reasoning १०१०
सामान्य ज्ञान /Genral Knowladge
एकूण /Total ६०६०
ICG Bharati

सेक्शन २

अ. क्र विषय प्रश्नांची संख्या गुण
गणित /Mathematics२५२५
भौतिकशास्त्र /Physics २५२५
एकूण ५०५०

कागदपत्र (ICG Bharati)

  • ऑनलाईन अर्ज करताना अपलोड करण्याची कागदपत्रे खालील प्रमाणे
    • स्टेज १
      • पासपोर्ट आकाराचा रंगीत फोटो
        • फोटो हा तीन महिन्यापासून जास्त जुना नसावा.
        • काळी पाटी ज्यावर उमेदवाराचे नाव आणि फोटो काढलेला दिनांक असावा अशी पाटी हातात धरून फोटो काढायचा आहे.
        • टोपी,गॉगल घातलेला फोटो नसावा तसेच फोटोत उमेदवाराचे दोन्ही कान दिसावे.
        • रजिस्ट्रेशन करताना काढलेला लाईव्ह फोटो.
        • उमेदवारांनी सही,डाव्या हाताचा अंगठा स्कॅन केलेले असावेत.
        • जन्म तारखेचा पुरावा (१० वी चे गुणपत्र किंवा जन्माचा दाखला)
        • ओळखपत्र (आधार कार्ड, पॅन कार्ड, निवडणूक ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स,पासपोर्ट यापैकी एक )
        • नोकरी प्रमाणपत्र किंवा ना हरकत प्रमाणपत्र जर ICG personnel किंवा ICG Civilian नोकरी करत असाल तर.
        • डोमिसिल प्रमाणपत्र
    • स्टेज२
      • जात प्रमाणपत्र
      • १० वी चे गुणपत्र आणि प्रमाणपत्र
      • CGPA/ग्रेड चे गुणांमध्ये रुपांतर करण्याचे सूत्र.
      • १० वी चे अतीरिक्त गुणपत्र (लागू पडत असल्यास)
      • सरकारी नोकरीत असल्यास ना हरकत प्रमाणपत्र
      • १२ वी चे गुणपत्र आणि प्रमाणपत्र
      • CGPA/ग्रेड चे गुणांमध्ये रुपांतर करण्याचे सूत्र.
      • १२ वी चे अतीरिक्त गुणपत्र (लागू पडत असल्यास)

परीक्षा केंद्र

  • उमेदवारांना स्टेज १ आणि स्टेज २ च्या परीक्षेसाठी अर्जामध्ये ५ शहर निवडायची आहेत.
  • उमेदवारांनी नमूद केलेल्या पत्त्यापासून ३० की.मी अंतरावर पाहिले परीक्षा केंद्र शहर निवडावे.
  • जर ३० की.मी अंतरावर परीक्षा केंद्र नसेल तर जवळील परीक्षा केंद्र निवडावे.
  • परीक्षा केंद्र बद्दलचे सर्व हक्क हे Indian Coast Gaurd ने राखून ठेवलेले आहेत.

मेडिकल स्टँडर्ड(ICG Bharati)

  • उंची – उमेदवाराची किमान उंची १५७ से.मी असावी. आसाम,नागालँड,मिझोराम, मेघालय,अरुणाचल प्रदेश,मणिपूर,त्रिपुरा, गढवाल,सिक्कीम आणि अंदमान निकोबार बेट येथील रहिवासी उमेदवारांना ५ से.मी. शिथिलता राहील.
  • छाती – योग्य प्रमाणात असावे.किमान विस्तार ५ से.मी असावा.
  • वजन – वय आणि उंचीच्या योग्य प्रमाणात असावे.
  • ऐकणे – सामान्य

परीक्षेचे तात्पुरते वेळापत्रक

स्टेज १ स्टेज २स्टेज ३
एप्रिल २०२४ (मध्य किंवा शेवट)मे २०२४ (मध्य किंवा शेवट)ऑक्टोबर २०२४ (मध्य किंवा शेवट)

महत्वाच्या सूचना (ICG Bharati)

  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • रजिस्टर करताना जो ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर दिला असेल तो भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
  • उमेदवारावर कोणत्याही प्रकारचा गुन्हा किंवा खटला नसावा.
  • निवड प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर उमेदवाराने सर्व मूळ कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.
  • अर्ज हा फक्त ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.पोस्टाने किंवा इतर कोणत्याही पद्धतीने पाठवलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • परीक्षेदरम्यान कॉपी किंवा गैरव्यवहार करणाऱ्या उमेदवारास अपात्र ठरवले जाईल.
  • चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
  • Indian Coast Gaurd ने भरती बाबतचे सर्व निर्णय राखून ठेवले आहेत.
  • जाहिरातीत नमूद केलेल्या भरतीच्या जागा कमी करणे /जास्त करणे किंवा भरती प्रक्रिया पुढे ढकलणे किंवा रद्द करणे याबाबतचे सर्व अधिकार हे Indian Coast Gaurd ने राखून ठेवलेले आहेत.
  • परीक्षा केंद्र किंवा केंद्राच्या परिसरात मोबाईल किंवा इतर इलेक्ट्रॉनिक उपकरण वापरण्यास सक्त मनाई आहे.असे उपकरण जर उमेदवाराकडे सापडले तर उमेदवारास तत्काळ अपात्र ठरवले जाईल आणि त्याच्यावर FIR दाखल करण्यात येईल.
  • उमेदवाराने शरीराच्या कोणत्याही भागावर कायमचा टॅटू काढलेला नसावा.

महत्वाच्या तारखा

अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख – १३/०२/२०२४

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – २७/०२/२०२४

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

जाहिरातीसाठी – इथे क्लिक करा

नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून जॉईन किंवा फॉलो करा

व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा

Articles

केंद्रीय राखीव पोलीस दलात हवालदार (कॉन्स्टेबल)या पदासाठी गुणवंत खेळाडूंना नोकरीची संधी

सिडको सहाय्यक अभियंता पदासाठी १०१ जागांवर भरती

भारतीय रेल्वे मध्ये असिस्टंट लोको पायलट पदासाठी ५६९६ जागांवर भरती

National Institute Of Naturopathy विविध पदांसाठी भरती