(ISRO NRSC Recruitment 2024) ISRO NRSC मध्ये विविध पदांसाठी ४१ जागांवर भरती

(ISRO NRSC Recruitment 2024) अंतराळ विभागाच्या महत्वाच्या केंद्रांपैकी एक असणाऱ्या ISRO NRSC या केंद्रात विविध पदासाठी ४१ जागांवर विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. इच्छुक उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने १२/०२/२०२४ पूर्वी जमा करायचे आहेत. सविस्तर माहिती खालील प्रमाणे

ISRO NRSC Recruitment 2024

जाहिरात क्र – एन आर एस सी:आर एम टी १-२०२४

Table of Contents

रिक्त जागांचा तपशील

अ. क्रपदाचे नाव पदसंख्या
वैज्ञानिक/अभियंता ३५
चिकित्सा अधिकारी०१
परिचारिका०२
पुस्तकालय सहाय्यक ०३
एकूण ४१
ISRO NRSC Recruitment 2024

शैक्षणिक अर्हता

  • पद क्र १-
    • कृषी- उमेदवार हा कृषी शाखेतील बी.एससी सहित रिमोट सेन्सिंग अँड जी आय एस/ जिओ इन्फॉर्मेटिक्स या शाखेतील एम. इ किंवा एम.टेक परीक्षा उत्तीर्ण असावा किंवा समतुल्य.
    • वन आणि पर्यावरणशास्त्र – उमेदवार वनस्पतीशास्त्र, वनीकरण,पर्यावरणशास्त्र या विषयातील बी.एससी सहित वनस्पतीशास्त्र, वनीकरण, या विषयातील एमएससी परीक्षा उत्तीर्ण असावा किंवा समतुल्य अर्हता धारक असावा.
    • जिओ इन्फॉर्मेटिक्स- उमेदवार भौतिशास्त्र किंवा गणित विषयातील बी.एससी सहित जिओ इन्फॉर्मेटिक्स या विषयातील एमएससी परीक्षा उत्तीर्ण असावा किंवा समतुल्य अर्हता धारक असावा.
    • जिओ इन्फॉर्मेटिक्स- उमेदवार हा कॉम्प्युटर सायन्स /जिओ इन्फॉर्मेटिक्स शाखेतील बी.ई किंवा बी.टेक सहित रिमोट सेन्सिंग अँड जी आय एस/ जिओ इन्फॉर्मेटिक्स/ आर्टिफिशियल इंटेलिजेंस अँड मशीन लर्निग या शाखेतील एम. इ किंवा एम.टेक परीक्षा उत्तीर्ण असावा किंवा समतुल्य अर्हता धारक असावा.
    • भूविज्ञान
      • उमेदवार भूविज्ञान, उपयोजित भूविज्ञान या विषयातील बी.एससी सहित भूविज्ञान, उपयोजित भूविज्ञान या विषयातील एमएससी परीक्षा उत्तीर्ण असावा किंवा समतुल्य अर्हता धारक असावा.
      • उमेदवार भौतिकशास्त्र,गणित, भूविज्ञान या विषयातील बी.एससी सहित जिओफिजिक्स या विषयातील एमएससी किंवा एमएससी.टेक परीक्षा उत्तीर्ण असावा किंवा समतुल्य अर्हता धारक असावा.
    • मृदा विज्ञान -उमेदवार कृषी या विषयातील बी.एससी सहित माती विज्ञान आणि , कृषी रसायनशास्त्र या विषयातील एमएससी परीक्षा उत्तीर्ण असावा किंवा समतुल्य अर्हता धारक असावा.
    • शहरी अभ्यास– उमेदवार हा नियोजन मधील बी ई किंवा ब.टेक किंवा आर्किटेक्ट पदवी सहित शहरी नियोजन तसेच प्रादेशिक नियोजनातील एम ई किंवा एम.टेक परीक्षा उत्तीर्ण असावा. किंवा समतुल्य अर्हता धारक असावा.
    • जल संसाधन
      • उमेदवार हा सिव्हिल किंवा कृषी अभियांत्रिकी मधील बी ई किंवा बी.टेक सहित जलस्रोत/जलविज्ञान/माती आणि जलसंधारण या विषयातील विषेशिकरणासहित एम ई किंवा एम टेक उत्तीर्ण असावा.
      • उमेदवार हा सिव्हिल किंवा कृषी अभियांत्रिकी मधील बी ई किंवा बी.टेक सहित रिमोट सेन्सिंग अँड जी आय एस/ जिओ इन्फॉर्मेटिक्स मधील एम ई किंवा एम टेक उत्तीर्ण असावा. किंवा समतुल्य अर्हता धारक असावा.

ISRO NRSC Recruitment

  • पद क्र – २
    • उमेदवार हा मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया मान्यताप्राप्त MBBS परीक्षा उत्तीर्ण असावा.
    • उमेदवारास किमान २ वर्ष कालावधीचा अनुभव असणे आवश्यक आहे.
    • उमेदवार हा मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया कडे रजिस्टर असावा.
  • पद क्र -३
    • उमेदवार हा SSC किंवा SSLC उत्तीर्ण असावा.
    • केंद्र किंवा राज्य सरकार मान्यताप्राप्त सामान्य नर्सिंग आणि मिडवाइफरी चा तीन वर्ष कालावधीची डिप्लोमा परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण असावा.
    • राज्य नर्सिंग कौन्सिल कडे नोंदणीकृत असावा.
  • पद क्र ४
    • उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा प्रथम श्रेणीतील पदवी परीक्षा + लायब्ररी सायन्स /लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स विषयातील पदव्युत्तर पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा (ISRO NRSC Recruitment 2024)

  • पद क्र १
    • (पद कोड – ६,९,१३,१४,१५,१६) उमेदवाराचे वय किमान १८ वर्षे आणि कमाल ३० वर्षे असावे.
    • (पद कोड ७,८,१०,११,१२)उमेदवाराचे वय किमान १८ वर्षे आणि कमाल २८ वर्षे असावे.
  • पद क्र २ ते पद क्र ४– उमेदवाराचे वय किमान १८ वर्षे आणि कमाल ३५ वर्षे असावे.

वेतन श्रेणी

  • पद क्र १ आणि पद क्र २– निवड झालेल्या उमेदवारांना नोकरीत रुजू झाल्यानंतर ₹८१,९०६/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
  • पद क्र ३ आणि पद क्र ४– निवड झालेल्या उमेदवारांना नोकरीत रुजू झाल्यानंतर ₹८१,९०६/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.

अर्ज शुल्क

  • वरील पदांसाठी उमेदवारांना ₹२५०/- ना परतावा परीक्षा शुल्क भरावे लागेल.
  • सुरुवातीला उमेदवारांना ₹ ७५०/- प्रोसेसिंग शुल्क भरावे लागेल त्यातील जे उमेदवार लेखी परीक्षेस हजार राहतील त्यांना प्रोसेसिंग शुल्क परत मिळेल.
  • परीक्षा शुल्क हे इंटरनेट बँकिंग,UPI, डेबिट कार्ड यांच्या साहाय्याने ऑनलाईन पद्धतीने भरता येईल.

अर्ज कसा कराल (ISRO NRSC Recruitment 2024)

  • इच्छुक उमेदवारांनी त्यांचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून विहित केलेल्या कालावधीमध्ये जमा करायचा आहे.
  • अर्ज हा फक्त ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

महत्वाच्या सूचना

  • इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
  • रजिस्टर करताना जो ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर दिला असेल तो भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
  • चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास अश्या उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरवले जाईल.

महत्वाच्या तारखा (ISRO NRSC Recruitment 2024)

अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख – २२/०१/२०२४

अर्ज करण्याची शेवटची तारीख -१२/०२/२०२४

अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा

जाहिरातीसाठी – इथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा

नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करून जॉईन किंवा फॉलो करा

व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा

इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा


Official Website – Click Here

Apply Now – Click Here

Join or Follow to satay updated about information of these type of jobs

Follow our Instagram Page -Click Here

Article

भारतीय रेल्वे मध्ये असिस्टंट लोको पायलट पदासाठी ५६९६ जागांवर भरती

सिडको सहाय्यक अभियंता पदासाठी १०१ जागांवर भरती

केंद्रीय राखीव पोलीस दलात हवालदार (कॉन्स्टेबल)या पदासाठी गुणवंत खेळाडूंना नोकरीची संधी

बँक ऑफ बडोदा मध्ये सुरक्षा अधिकारी पदासाठी भरती

एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेस मध्ये सुरक्षा कार्यकारी पदासाठी १३० जागांवर भरती