भारत सरकारच्या महारत्न कंपनी पैकी एक असणाऱ्या Steel Authority of India मध्ये विविध विभागांतील मॅनेजमेंट ट्रेनी पदासाठी १२४ जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.इच्छुक पात्र उमेदवारांनी SAIL Management Trainee Engineer Bharti 2025 साठी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीनं अधिकृत संकेतस्थळावरून १५/११/२०२५ ते ०५/१२/२०२५ या दरम्यान जमा करायचे आहे. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

जाहिरात क्र हाHR/REC/C-97/MTT/2025
Table of Contents
रिक्त पदांचा तपशील (SAIL Management Trainee Bharti 2025)
| अ. क्र | पदाचे नाव | पद संख्या |
| १ | मॅनेजमेंट ट्रेनी (केमिकल) | ०५ |
| २ | मॅनेजमेंट ट्रेनी (सिव्हिल) | १४ |
| ३ | मॅनेजमेंट ट्रेनी (कॉम्प्युटर) | ०४ |
| ४ | मॅनेजमेंट ट्रेनी (इलेक्ट्रिकल ) | ४४ |
| ५ | मॅनेजमेंट ट्रेनी (इन्स्ट्रुमेंटेशन ) | ०७ |
| ६ | मॅनेजमेंट ट्रेनी (मेकॅनिकल ) | ३० |
| ७ | मॅनेजमेंट ट्रेनी (मेटालर्जिकल ) | २० |
| एकूण | १२४ |
शैक्षणिक अर्हता (SAIL Management Trainee Bharti 2025)
- उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची Chemical,Civil, Computer, Electrical,Instrumentation,Mechanical , Metallurgical शाखा किंवा समतुल्य शाखेतून अभियांत्रिकी पदवी (BE) परीक्षा किमान ६५% गुणांसह(अजा /अज/अपंग/विभागीय उमेदवार किमान ५५% गुणांसह )उत्तीर्ण असावा.
- समतुल्य शाखा
- Chemical Engineering –
- Chemical Engineering/Technology,Electronics Chemical Engineering
- Civil Engineering –
- Civil Engineering
- Computer Engineering –
- Computer Science,Computer Science Engineering,Information Technology ,Computer Science & Information Technology. Or MCA
- Electrical Engineering –
- Electrical Engineering ,Electrical Machine ,Power System & High voltage Engineering ,Power Plant Engineering ,Electronics & Power Engineering ,Power Electronics/Engineering,Electrical Instrumentation & Control Engineering,Electrical & Instrumentation Engineering,Electrical & Mechanical Engineering,Power Engineering,Electrical & Power Engineering,Electrical & Electronics Engineering.
- Instrumentation –
- Electronics Engineering , Electronics & Instrumentation Engineering, Electronics & Communication, Electronics and Telecommunications, Electronics and Control,Industrial Electronics,Applied Electronics Engineering/Technology, Electronics Design & Technology, Mechatronics, Electronics & Electrical, Electronics & Power,Electronics Communication & Instrumentation,Instrumentation Engineering & Technology,Instrumentation & Control/Engineering,Robotics & Automation/Automation & Robotics, Communication Engineering,Control & Instrumentation Engineering.
- Mechanical –
- Mechanical Engineering, Mechanical & Automation Engineering, Production & Industrial Engineering,Production Engineering/Technology,Mechanical Production & Tool Engineering , Industrial Engineering/Technology,Thermal Engineering, Manufacturing Process & Automation, Mechatronics, Manufacturing Engineering/Technology, Manufacturing Science & Engineering,Energy Engineering,Machine Engineering, Mechatronics and Automation Engineering
- Metallurgical –
- Metallurgical Engineering,Material Science Engineering/Technology,Industrial Metallurgy.
- Chemical Engineering –
वयोमर्यादा
- SAIL Management Trainee Bharti 2025 साठी अर्ज करण्यास 05/12/2025 रोजी उमेदवाराचे किमान वय 18 वर्ष आणि कमाल वय 28 वर्ष असावे.
- अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ३ वर्ष शिथिलता राहील.
- खुल्या प्रवर्गातील अपंग उमेदवारांना कमाल वयात १० वर्ष ,इतर मागासवर्गीय प्रवर्गातील अपंग उमेदवारांना १३ वर्ष आणि अजा/अज प्रवर्गातील अपंग उमेदवारांना कमाल वयात १५ वर्ष शिथिलता राहील.
- विभागीय उमेदवाराचे कमाल वय ४५ वर्षापर्यंत असावे.
वेतन श्रेणी
- निवड झालेल्या उमेदवारास पहिल्या १ वर्षासाठी ट्रेनिंग कालावधीत नियमाप्रमाणे स्टायपेंड प्रती महिना अदा केले जाईल.
अर्ज कसा करावा
- इच्छुक पात्र उमेदवारांनी SAIL Management Trainee Bharti 2025 साठी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीनं अधिकृत संकेतस्थळावरून १५/११/२०२५ ते ०५/१२/२०२५ या दरम्यान जमा करायचे आहेत.
- अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील. इतर कोणत्याही पद्धतीनं अर्ज स्वीकारले जाणार नाही.
- अर्ज करण्यासाठीच्या स्टेप्स
- रजिस्ट्रेशन- उमेदवारांनी प्रथम स्वतःला अधिकृत संकेतस्थळावर रजिस्टर करून घ्यावे.
- अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरावी.
- आवश्यक ती सर्व माहिती अचूक भरावी.
- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करावा.
अर्ज शुल्क
- खुल्या/आर्थिक दुर्बल घटक/इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांनी SAIL Management Trainee Bharti 2025 साठी ₹१०५०/- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
- अजा/अज/माजी सैनिक /विभागीय उमेदवारांनी ₹३००/- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
- अर्ज शुल्क हे ना परतावा असून एकदा भरलेले अर्ज शुल्क हे कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.
- अर्ज शुल्क हे उमेदवारांनी क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड इंटरनेट बँकिंग यांच्या साहाय्याने ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
महत्वाच्या सूचना
- इच्छुक उमेदवारांनी SAIL Management Trainee Bharti 2025 साठीचे अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून घ्यावी आणि मगच अर्ज करावा.
- रजिस्टर करताना दिलेला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरू असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
- चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
- जाहिराती नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे/ वाढवणे तसेच भरतीप्रक्रिया रद्द करणे/पुढे ढकलणे /स्थगित करणे याबाबतचे सर्व निर्णय हे व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
- भरती करण्याबाबत कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्यात येईल.
महत्वाच्या तारखा
अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख – १५/११/२०२५
अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – ०५/१२/२०२५
अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा
नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा
व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा
आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा
