भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालया अंतर्गत असणाऱ्या भारतीय रेल्वे मध्ये विविध पदांसाठी २५६९ जागांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून ३१/१०/२०२५ ते ३०/११/२०२५ या दरम्यान जमा करायचे आहेत. Railway JE Bharti 2025 साठीची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

जाहिरात क्र – CEN no 05/2025
Table of Contents
रिक्त पदांचा तपशील (Railway JE Bharti 2025)
एकूण पदसंख्या – २५६९
| अ.क्र | पदाचे नाव | |
| ०१ | ज्युनियर इंजिनीयर | |
| ०२ | डेपो मटेरियल सुपरीटेंडेंट | |
| ०३ | केमिकल अँड मेटलर्जिकल असिस्टंट |
शैक्षणिक अर्हता (Railway JE Bharti 2025)
- पद क्र १-
- उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून Mechanical/Electrical /Electronics/Civil/Mechanical/Production/Automobile/Instrumentation and Control/Manufacturing/Mechatronics/Industrial/Machining/Tools & Machining/Tools & Die Making/Automobile/Information Technology/Communication Engineering/Computer Science & Engineering/Computer Science/Computer Engineering शाखेतून डिप्लोमा अभियांत्रिकी परीक्षा उत्तीर्ण असावा.
- पद क्र २
- उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून कोणत्याही शाखेतून अभियांत्रिकी डिप्लोमा परीक्षा उत्तीर्ण असावा.
- पद क्र ३
- उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची फिजिक्स/केमिस्ट्री विषयासह B.Sc पदवी परीक्षा किमान ४५% गुणांसह उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा
- Railway JE Bharti 2025 साठी ०१/०१/२०२६ रोजी उमेदवाराचे वय १८ वर्ष आणि कमाल वय ३३ वर्ष असावे.
- अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ५ वर्ष तसेच इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात ३ वर्ष शिथिलता राहील.
- अपंग उमेदवार – खुल्या /आर्थिक दुर्बल घटक उमेदवारांना कमाल वयात १० वर्ष ,इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात १३ वर्ष आणि अजा/अज प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात १५ वर्ष शिथिलता राहील.
- भारतीय रेल्वे तील गट क आणि ड श्रेणीतील पदांवर किमान ३ वर्ष नोकरी असणाऱ्या विभागीय उमेदवार – खुल्या /आर्थिक दुर्बल घटक उमेदवाराचे कमाल वय ४० वर्ष ,इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवाराचे कमाल वय ४३ वर्ष आणि अजा/अज प्रवर्गातील उमेदवाराचे कमाल वय ४५ वर्ष असावे.
- विधवा, घटस्फोटीत,किंवा कायदेशीररित्या नवऱ्यापासून विभक्त ज्यांनी पुन्हा लग्न केले नाही अश्या स्त्रिया – खुल्या/आर्थिक दुर्बल घटक उमेदवाराचे कमाल वय ३५ वर्ष ,इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवाराचे कमाल वय ३८ वर्ष आणि अजा/अज प्रवर्गातील उमेदवाराचे कमाल वय ४० वर्ष असावे.
वेतन श्रेणी
उमेदवारांना नोकरीत रुजू झाल्यानंतर रु ३५,४००/- प्रती महिना वेतन अदा केले जाईल.
अर्ज कसा करावा
- इच्छुक पात्र उमेदवारांनी Railway JE Bharti 2025 साठी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावरून ३१/१०/२०२५ ते ३०/११/२०२५ या दरम्यान जमा करायचे आहेत.
- अर्ज हे उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत. इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.
- अर्ज करण्यासाठीच्या स्टेप्स
- रजिस्ट्रेशन- उमेदवारांनी प्रथम स्वतःला अधिकृत संकेतस्थळावर रजिस्टर करून घ्यावे.
- अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरावी.
- आवश्यक ती सर्व कागदपत्रे अपलोड करून घ्यावी.
- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
अर्ज शुल्क
- खुल्या/इतर मागासवर्गीय प्रवर्ग /आर्थिक दुर्बल घटक उमेदवारांनी ₹५००/- अर्ज शुल्क Railway JE Bharti 2025 साठी ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहेत.
- अजा/अज/माजी सैनिक/ट्रान्सजेंडर/EBC/महिला उमेदवारांनी ₹२५०/- अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करायचे आहे.
- पहिल्या स्टेजच्या परीक्षेस हजर असणाऱ्या उमेदवारांना रु ५००/- पैकी रु ४०० आणि रु २५०/- परत मिळतील.
- अर्ज शुल्क हे उमेदवारांनी क्रेडीट कार्ड/डेबिट कार्ड/इंटरनेट बँकिंग यांच्या सहाय्याने जमा करायचे आहेत.
निवड प्रक्रिया
- पहिली स्टेज कॉम्प्युटर बेसड परीक्षा – ९० मिनिटे १०० प्रश्न
- दुसरी स्टेज कॉम्प्युटर बेसड परीक्षा -१२० मिनिटे १५० प्रश्न
- कागदपत्र पडताळणी
- वैद्यकीय चाचणी
महत्वाच्या सूचना
- उमेदवारांनी Railway JE Bharti 2025 साठी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून नमूद केलेल्या सर्व अर्हता पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
- रजिस्टर करताना दिलेले इमेल आयडी आणि मोबाईल नंबर भरती प्रक्रिया सुरु असेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे.
- चुकीची किंवा खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरवले जाईल.
- अर्धवट भरलेले अर्ज रद्द करण्यात येतील.
- जाहिरातीत नमूद केलेल्या जागांची संख्या कमी करणे /वाढवणे तसेच भरती प्रक्रिया रद्द करणे /पुढे ढकलणे /स्थगित करणे याबाबतचे सर्व निर्णय व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहेत.
- भरती करण्याबाबत कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरवले जाईल.
महत्वाच्या तारखा
अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख – ३१/१०/२०२५५
अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – ३०/११ /२०२५
अधिकृत संकेतस्थळ – इथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी – इथे क्लिक करा
नोकरीच्या अश्याच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि जॉईन किंवा फॉलो करा
व्हाॅट्स ॲप ग्रुप लिंक – इथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप लिंक – इथे क्लिक करा
आमच्या इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी – इथे क्लिक करा
